Posts

Showing posts from June, 2020

E resource

Image

E- Resources PDF book

जर कोणाला पुढील पैकी कोणती ऐतिहासिक पुस्तके PDF स्वरुपात हवी असतील तर दिलेल्या लिंक वर जाऊन प्राप्त करावीत https://drive.google.com/folderview?id=0ByJTEJ0GPuGyLVduSGZEblNDbFk&usp=sharing 1. अफझलखानाचा वध 2. अशोक आणि मौर्यांचा ऱ्हास 3. आज्ञापत्र 4. आसे होते मोगल 5. इस्ट इंडिया कंपनीचा पेशवे दरबाराशी फारशी पत्रव्यवहार 6. उत्तरकालीन मुघल खंड दुसरा 7. औरंगजेबाचा इतिहास 8. क्षत्रियकुलावतंस छत्रपती शिवाजीमहाराज यांचे चरित्र 9. क्षत्रियांचा प्राचीन इतिहास 10. खरे जंत्री ( शिवकालीन संपूर्ण शकावली ) १६२९ ते १७२८ 11. घोरपडे घराण्याचा इतिहास 12. छत्रपती शिवाजी महाराज 13. तंजावरचे मराठे राजे 14. ताराबाई आणि संभाजी १७३८ – १७६१ 15. तेरा पोवाडे 16. दंडनीती 17. दिन-विशेष 18. दिल्लीच्या शहाजहानचा इतिहास 19. निजाम पेशवे संबंध १८ वे शतक 20. पवनाकाठचा धोंडी 21. पानिपतची बखर 22. पुणे अखबार भाग १ 23. पुणे अखबार भाग 2 24. पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी भाग २ 25. पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी भाग ३ 26. पेशवाईचा मध्यान्ह 27. पेशवाईची प्राणप्रतिष्ठा 28. पेशवाईचे दिव्य तेज 29. पेशवाईच्

श्री.प्रसाद कुलकर्णी :राजर्षी शाहू महाराज

Image
           श्री.प्रसाद कुलकर्णी : राजर्षी शाहू महाराज  शुक्रवार ता.२६ जून २०२० हा लोकराजे छत्रपती शाहूमहाराजांचा १४६ वा जन्मदिन.युगकर्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर आपल्या कार्याचा आणि विचारांचा ठसा पुढील अनेक पिढ्यांवर आजतागायत जे उमटवत राहिले आहेत त्यात लोकराजे शाहू महाराज यांचे नाव घ्यावे लागेल.सामाजिक न्यायाच्या प्रस्थापनेला अग्रक्रम देणारे ते जाणते राजे होते.’एक वेळ गादी सोडून देईन पण बहुजनोद्धाराचे कार्य सोडणार नाही असे म्हणणारे ते दुर्मिळ राजे होते. छत्रपती शाहू महाराजांना उत्तरप्रदेशातील  कानपुर येथे कुर्मी समाजाने २५ एप्रिल १९१९ रोजी ‘राजर्षी ‘ही पदवी दिली.त्याला गतवर्षी शंभर वर्षे पूर्ण झाली. तसेच शाहू महाराज प्रमुख पाहुणे आणि पुढे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार  व भारतरत्न ठरलेले डॉ.बाबासाहेब आंबेडकर अध्यक्ष असलेल्या ‘माणगाव ‘परिषदेचेही हे शताब्दी वर्ष झाले.  शाहूरायांच्या कोल्हापूर संस्थानातील ‘माणगाव’येथे २१ व २२  मार्च १९१९ रोजी अखिल महाराष्ट्र अस्पृश्य वर्गाची परिषद झाली होती. फुले,शाहू व आंबेडकर ही विचारपरंपरा मानवतेच्या सूत्राने गुंफलेली आहे.माणगाव परिषदे

कथा-अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी..

#...अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी ..# ...अखेर कोर्टाने निर्णय दिला... दोघांना डिव्होर्स हवा होता तो... निकालाची प्रत हाती पडली... मागची तीन काळी कुट्ट वर्षावर पडदा पडला... गुंता झाला पण गुंतवून घेण्याआधीच तो सुटला... सुटला कि तोडला.. आता काही म्हटले तरी त्यात काय फरक पडणार म्हणा... एक बरं  होतं गुंतायला इश्यू कुठं होता... इश्यू.. तेच तर कारण होतंना याचं... हे ..हे कारण कसं असेल...हे ट्रम कार्ड नव्हते ना त्याच्या जवळ ... नाहीतर  डिव्होर्स  मिळणं जरा गुंतागुंतीच होउन बसलं असतं....  पण पण आता कशाला या गोष्टीचा विचार आपण करतोय... झालाना सोक्षमोक्ष कायमचा... आता मोकळा श्वास घ्यायचा आणि पुढं चालायचं... जणू काही मागं घडलचं नाही अशा आर्विभावात... निकालाची प्रत तर तेच सांगतेय कि तू स्वतंत्र झाली आहेस... आता कुणाचीही पत्नी नाहीस... तु तुझा पुढील निर्णय घेण्यास मुक्त आहे....पाठीमागचे कुठलेच पाश नाहीत... माणूस म्हणून तुला जगण्याचा हक्क मिळाला आहे... तसंच तू जग.. आता कुणाचीही तू गुलाम होऊ नकोस... पुढचा निर्णय घेशील तेव्हा हि गोष्ट विसरू नकोस... आर्थिक स्वातंत्र आहे... सक्षम आहेस.. तेव्हा येथू

कहाणी पोलीस उपाधिक्षक -अमर मानसिंग मोहिते

Image
अधिक माहितीसाठी - खालील लिंक वर क्लिक करा https://www.esakal.com/paschim-maharashtra/parents-are-laborers-grandmother-sells-vegetables-grandson-became-deputy

कथा : खांद्याला-खांदा - डॉ. सुरज चौगुले

                    " खांद्याला - खांदा "                  डॉ.सूरज चौगुले इस्लामपूर        संध्याकाळी चार वाजता रमा प्राचार्यांच्या केबिन मध्ये गेली. आत जाताच तिने विचारले," सर उद्याची बऱ्यापैकी सर्व कामे पूर्ण केलीत, थोडं साहित्य खरेदी करायचा आहे ते मी करते, नाहीतर 'चौधरी'सरांना सांगते. आणि हो ! उद्या मी थोडं लेट आले तर चालेल का?" प्राचार्यांनी डोळ्यावरचा चष्मा डोक्यावर चढवत तिच्याकडे पाहीले आणि म्हणाले," मॅडम वेळ सर्वांसाठी सारखीच, अन तुम्ही तर सांस्कृतिक विभागाचे प्रमुख आहात.सारा कार्यक्रम तुमचा आहे अन तुम्हीच लेट..?" " हो पण आज मी बराच वेळ थांबले ना! उद्या थोडी सवलत द्या घरी काही माझी काम आहेत." रमा विनवणीच्या स्वरात म्हणाली. गोलंदाजाचा चेंडू बरोबर बैटवर यावा अंन त्याला फटकारायला संधी मिळावी या आवेशात  प्राचार्य उद्गारले," पगार घेताना सवलत मागता का?घरची कामे आहेत म्हणून चार पैसे कमी घेता का ? का   प्राचार्याला देता?तिथे समानता..!अन  जबाबदारी आली की मात्र सवलत...! ते काही नाही नियम सर्वांना सारखाच...या तुम्ही..!" दिवसभराच्

अनोखी रंगावली - सौ. निता मगदुम ( वकिल)

Image
परसदारातील अनोखी रंगावली 

कथा - पहिला चहा - श्री. नंदकुमार वडेर

                             * पहिला चहा * ... परवा म्हणे मातृदिनचा ईव्हेंट साजरा होऊन गेला... असा असतोच म्हणतात तो दरवर्षाला... मग त्या दिवशी  झुंबडच उडते सगळया डिजिटल माध्यमावर ... आई या विषयावर स्तुतीसुमनांची खैरात होते... हळवे शब्द पिळवटून टाकते हृदयाला नि डोळे वाहतात घळा घळा... मग ती आई कुणाची का असेना तन वेगळे असले तरी मायेची भावना एकच असतेना... म्हणतात ना घार हिंडते आकाशी परी चित्त तिचे तिच्या पिलापाशी... ... पण पण खरं सांगू मला तर आई रोजच आठवते.. किंबहुना मला ती दिसते .. माझ्याशी बोलते... लहान असताना लाडावून ठेवलेला मला आता ती कान उघाडणी करते... माझं लेकरू लहान आहे मोठं झाल्यावर त्याला भरपूर काम आहे... घरचं काम  करायला आताच नको सांगायला.. ते त्याची बायकोच बघून घेईल त्याला... शिकवून मोठा सायेब होईल..नि गरीब आईचं पांग फेडील... ... साहेब मी झालो खरा.. पण आईनंच खाल्ल्या होत्या खस्ता साऱ्या... पण पांग फेडण्यासाठी आई कुठे राहिली जवळी ..ती तर केव्हाच होती दूर गेली...  त्यानंतर आसवांचे मोती ओघळतच राहिले... आईची छबी नि शब्द मनात गुंजले... मी असेन अवतीभवती सदोदित तुझ्या जवळी...मन सा

कथा - हि.अनोखी गाठ कुणी बांधली - श्री. नंदकुमार वडे र

                    हि अनोखी गाठ कुणी बांधली.. ..."हॅलो! , दिपक, मी वृद्धाश्रमातून सेक्रेटरी काळे बोलतोय... आपल्या वडिलांनी इथं बराच गोंधळ घातलाय..आपण थोडा वेळ काढून लवकरच इकडे आलात तर सविस्तर बोलून काय तो निर्णय घेउया... ... आज सकाळी ते आणि त्या मिसेस अॅना मॉर्निंग वाॅकला बाहेर पडले ते वृद्धाश्रमात परत आलेच नाहीत... आम्ही दोघांच्याही सेलवर बरेच काॅल केले... मेसेजेस पाठवले... पण तिकडून काही ही रिसपाॅन्सच नाही... फिरायला जाण्याच्या त्यांच्या वाटेवरून चांगली दोघातिघांनी शोधाशोध केली... त्यावेळी तिथे दिसणाऱ्यांच्या कडे सुद्धा विचारपुस केली... पण ठोस उत्तर मिळालं नाही... काही विपरित घडलं की काय असे सारखं वाटत आलयं.... म्हणून तुम्हाला लगोलग कळवलं... बरं पोलिस ठाण्यात तक्रार करावी म्हटलं तर तुमचा,त्यांचा आणि या वृद्धाश्रमाचा प्रतिष्ठेचा प्रश्न येतो... तो एक वेळ तुम्हाला परवडेल पण आश्रमाला परवडणारा नाही.... ... त्यांच्या रुममध्ये तुमच्या नावे असलेला हा लिफाफा मिळाला....पण तुम्हाला सांगतो अलिकडे दोघांचं गुळपिठ फारच जमलेलं दिसत होतं... सगळया आश्रमातले लोक त्यांच्या कडे पाहून आनंदीत रा

कथा - अशीच अवचित येऊन जा - श्री. नंदकुमार वडेर

अशीच अवचित येउन जा, अलगद मिठीत मिटून जा--- काँलेजच्या शेवटच्या वर्षात असताना आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेसाठी "तुम्हीच माझे प्राणनाथ" हि एकांकिका आमच्या काँलेजने बसविली होती. काँलेजमधील दिसायला सुंदर असणाऱ्या  काही मुलं मुलींची निवड त्या करीता झाली होती. मी हडकुळा, उंच  आणि काळा सावळा होतो ,तरीही त्या एकांकिकेच्या दिग्दर्शकाने माझी निवड पक्की केली होती. सबंध एकांकिकात शेवटच्या प्रवेशात फक्त काही मिनिटाचा माझा रोल होता. प्रचंड मोठ्या आगीतून मूर्च्छित नायिकेला आपल्या जीवावर उदार होऊन, मी तिला त्यातून  वाचवितो.चेहरा आगीने नि काळ्या धूराने रापून गेलेला, हातापायाला ठिक ठिकाणी भाजलेल्या जखमा ,अंगावरच्या कपड्यांची लक्तरे लोंबत असलेली असा मी ,ती शुद्धीत येईपर्यंत तिथेच उभा राहतो.तिला शुद्ध येते, आपले प्राण या तरुणाने वाचवले हे जेंव्हा तिला कळते त्या वेळेस कोणताही किंतु मनांत न आणता मला चक्क मिठी मारते व म्हणते, " तुम्हीच माझे प्राणनाथ"..वगैरे वगैरे... मग हळूहळू पडदा पडत जातो. एकांकिका संपते. ...या एकांकिकेच्या स्पर्धेपूर्वी जवळजवळ दोन अडीच महिने रोज सकाळ संध्या

पु. ल. देशपांडे - स्मृतीदिन

Image
                लेखक पु. ल. देशपांडे यांचा आज स्मृतिदिन तू गेलास उद्या मीही नाहीशी होणार.पण आपल्या मायबोलीचा एक कंठमणी झालेला तुझा शब्द, मराठी भाषा जिवंत असेपर्यंत स्वत:च्या तेजानं चमकतच राहील ना ? - सुनीताबाई देशपांडे

साने गुरुजींची पुण्यतिथी - ११ जून

साने गुरुजींची पुण्यतिथी Click here... https://youtu.be/vZ9Xj_QyfBI

साने गुरूजी

साने गुरूजी ११जून हा सानेगुरुजी यांचा स्मृतीदिन. महाराष्ट्रात ज्यांना ' आपले ' म्हणावे असे हे थोर व्यक्तिमत्व . आईच काळीज घेऊन आयुष्यभर परिव तयाव्यतिरिक्तर्तनवादी चळवळीत राहणारा हा एक सच्चा ' माणूस ' . प्रबोधनाची ' साधना ' आयुष्यभर करणारा हा एक प्रबोधनपुरूष. आई जशी आपल्या पिलांना सदैव छातीशी धरते तसेच गुरूजीनी सामान्य जणांना छातीशी धरले. आईची ऊब , बापाची वत्सलता , मित्राचे प्रेम , स्नेहीजणांचा आधार , एका चांगल्या माणसाची सह्रदयता अशा विविध अंगाने हा समाज आपल्या जवळ केला. दिनदुबळ्या माणसांना आशेचा किरण दाखवला..त्यासाठी मनापासून प्रामाणिकपणे कार्य केले. कुठेही दांभिक जगणे नाही , कुठेही अहंकार नाही , कुठेही श्रेष्ठत्वाची मिजास नाही असा हा तुमच्या आमच्या काळजाला हात घालणारा माणूस. समाजवाद...या जीवन मुल्यावर अपार निष्ठा . अहिंसा हा सर्वोच्च गुण....साहित्य हा आवडिचा प्रकार....गांधीवाद हे आवडते तत्व....साधी राहणी हा आवडता आचार....समाजाप्रती डोळे भरून वाहणारी ममता हे कायमचे दर्शन ....जगाला प्रेम अर्पावे हा सर्वोत्तम विचार .....अस विविधांगी गुण जोपासणारे हे थोर व

कथा - घार - श्री. नंदकुमार वडेर

Image
                         घार - श्री.नंदकुमार वडेर ...कुठं गेली होतीस ..रात्र वाढत चालली आहे हे तुला कळलंच नाही... आता घरट्यात तुला घेतील असं वाटतंय का... रवी अस्ता नंतर कुणी असं बाहेर पंख पसरून विहार करतंय का... सगळीकडे कसं चिडीचूप शांतता पसरली आहे... आणि तशात तुझं हे उशिरानं येणं... तुझे घरचेच काय पण तुझ्या बिरादरीतले सुद्धा सहन करणार नाहीत असलं तुझं बेताल वागणं.. बहिष्कृत करतील.. बिरादारीला कलंक लागला म्हणून तुला चोच मारून घायाळ करतील.. कदाचित तुला मुक्ती देतील... याची कशा कशाची च तुला भिती वाटली नाही.... .... हे शशांका आज मी खऱ्या अर्थाने मुक्त झालेय... मीच माझं घरदार कधीच सोडून आलेय... बिरदारीच काय घेऊन बसलास... मला त्यांच्या सारखं चार काटक्या गोळा करून सुरक्षित घरटं बांधून नरमादी सारखा चुल मुलं बोळक्याचा टुकार संसार करायचा नाही... मी एक घार स्वतंत्र पक्षी म्हणून या मोकळ्या आकाशात विहार करायचा आहे.. मनमौजी सारखं जगायचं... हि माझी दृष्टी आहे...  आता मला कुठच थांबायचं नाही.. तू फक्त माझ्यासाठी तुझ्या चंद्र प्रकाशात मला मात्र चमचमता मार्ग दाखव  सकाळी रवी येईपर्यंत.. मला माझा म

कविता - पिंपळ - इंदिरा संत - माधुरी घारपुरे

आठवणीतील कविता - सौ.माधुरी घारपुरे                         पिंपळ - इंदिरा संत आज माझ्या अत्यंत आवडत्या कवयित्री इंदिरा संत यांची कविता घेऊन आले आहे. अत्यंत तरल,आणि भाव स्पर्शी कविता लिहिणाऱ्या इंदिरा बाईंचे बालपण तवंदी या खेड्यात गेले. त्याकाळी लोकमानसात लेखन,वाचन,कला या दैनंदिन जीवनापेक्षा स्वतंत्र नव्हत्या.व्यवहारात मिसळून गेलेल्या असायच्या. त्या कलांची जीवनाशी असलेली निकटता आणि त्यांचा उत्स्फूर्त आणि सहज असा आविष्कार ,त्या लयपूर्णतेचा आणि सहज-साधेपणाचा गाढ परिणाम इंदिराबाईंच्या मनात कोरला गेला.पुढे तोच कवितेच्या गाभ्याशी राहिला. ----------------------------- पिंपळ दारासमोर अंगणात उभा पिंपळ तोल देतो इथे माझ्या खिडकीशी हिरवे मायाजाळ होतो उन्हें झुलती पानांतून फांदीमधून खेळे वारा झिळमिळत्या पिंपळाची गाज गंभीर, चमकी ल्हारा असे खिडकीशी येतां हिरवा सागर झेपावतो माझे आनंदाचे पक्षी लाटांवरती खेळवितो वारा मिटतो पानांतून फांदीफांदीत काळोखते झाकोळत्या पिंपळाचे पंखमिटले शिल्प होते असे खिडकीशी येतां मायाजाळात गुंतवितो, हात धरून चालवितो, दुजे माहेर भेटवितो. - इंद

कथा संग्रह : बंध - श्री. सचिन देशपांडे

* बंध * सुन्न झाला होता विराज... डोकं गच्च धरुन बसला होता. अचानक फ्युज उडून, घनदाट काळोख पसरला होता त्याच्या डोक्यात. त्याच्या आजुबाजूने बागडणारी त्याची मुलं, त्याला दिसेनाशी झालेली... आणि त्यांचा हसण्या - खिदळण्याचा आवाज कमी कमी होत, ऐकू येईनासा झाला होता. एप्रिल महिन्याचा पगार रडत खडत मिळालेला... मे महिन्याच्या पगाराबद्दल अनिश्चितताच होती... आणि आता बाॅस चा हा मेसेज. मुंबईचा पुर्ण सेट-अप बंद करुन, संपुर्ण बिझनेस चेन्नईला मुव्ह करत असल्याबद्दलचा. थोडक्यात जाॅब जाणार असल्याचा, अप्रत्यक्ष ईशाराच. बारावीनंतर कोहिनुरमध्ये कुठलासा डिप्लोमा केला होता विराजने. दोन - चार नोकर्‍या बदलत... पाच वर्षांपुर्वी त्याला, ही बरी नोकरी मिळालेली. काहीतरी उरतंय महिनाअखेरीस हातात, हा दिलासा देणारी. आयुष्यात जरासं स्थैर्य आलं होतं... आणि तेवढ्यात उद्भवलेली ही परिस्थीती. पंचेचाळीसचं आडनीडं वय... घरी बसावं तर कमी, आणि बाहेर पडावं तर जास्त ठरणारं. विराजला सुचतच नव्हतं काय करावं नेमकं आता. त्याची बायको विनिता... अत्यावश्यक सेवेत असल्याकारणाने, रोज आॅफिसला जात होती... दमून - भागून येत होती. हा तिच्यापाठी

कथा संग्रह - श्री.नंदकुमार वडेर

                         * पहिला चहा * ... जिंकलसं बरं का प्रमिला, इतकी वर्ष वाट पाहून  हवं तसंच बेबीला स्थळ मिळालं.. अगदी घराशेजारचं... तुझीच अट होती ती... आणि ती पूर्णत्त्वाला आली बरं का... .. बेबीच्या लग्नात  जवळजवळ सर्वच जण प्रमिलाचं कौतुक करत होते ,बेबीचं अभिनंदन करत होते.. .. मागची पाच सहा वर्ष स्थळ बघण्याचा नि नाकारण्यातच गेली होती.. डोंबिवल्यातल्या डोंबिवलीतील च जावई प्रमिलेला हवा होता.. लाडू बाई बेबी आई पासून दूर राहायला तयार नव्हती... ... विवाह मंडळाने हात टेकले , सगेसोयरे मित्रपरिवाराने नंतर नंतर नादच सोडला स्थळ सुचवायचा... कुणी तरी  आता घरजावई च करून घेण्याचा प्रस्तावही दिला... पण प्रमिलेला आपली प्रायव्हसी हवी होती... (नवरा गिळल्यावर कसली आलीयं डोंबलाची प्रायव्हसी.. अशी चेष्टा कानावर पडून सुद्धा..) .. संसारात राहिलं होतं काय असं.. इनमीन दोघी मायलेकी तर होत्या चार खोल्यांच्या आलिशान घरात.. इंजिनिअर झालेली, रुपगर्विता ,उपवर मुली ला तिच्या पसंतीने उजवले असते तर काय बिघडले असते... पण नाही सासरी गेल्यावर बेबीने आईची काळजी घ्यायची नाही तर मग कुणी... ... कुणी तरी लॅव्हिश वृद

अनोखी रंगसंगती - सौ. निता मगदूम(वकिल)

Image
परासदारातील पाना फुलांपासून रेखाटलेल्या अप्रतिम रंगावली                        सौ.निता मगदूम ( वकिल)

शिवराज्य अभिषेक

Image
*राज्याभिषेक हा केवळ सोहळा नाही तर आपल्या रयतेला दिलेला ठाम विश्वास म्हणजे राज्याभिषेक...* *आपला एक त्राता आहे, आपला एक रक्षणकर्ता आहे...* *आपलं एक तख्त आहे.. याची चिरंजीवी व्हावी म्हणून राज्याभिषेक...!* 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

कथा - पिंपळाची पिल्ले - अनंत गद्रे

Image
पिंपळाची पिल्ले ठाण्यात आमच्या सोसायटी पासून पाव ते अर्ध्या किमी इतक्या कमी अंतरावर मखमली, सिद्धेश्वर व कचराळी हे तीन तलाव आहेत. इमारतीच्या मागच्या कंपाऊंडला लागून नाला आहे. जो पावसाळयात येऊर पासून उतारावरून वहात येणाऱ्या पाण्याने खुप फुगतो. या सगळ्यामुळे आमच्या परिसरांत खुप विवीध झाडे आहेत. पिंपळ आहेत. इतरही बरीच झाडे आहेत. जांभळाची, आंब्याची, जंगली बदामाची आहेत. वड, उंबर आहेत. शहिद उद्यानात ताडाची खुप आहेत.भरपूर ताडगोळे काढतात सिझनमधे इथले स्थानिक. नव्याने लावलेले सोनंमोहोर, रेन ट्री आहेत. साग, सप्तपर्णी, करंज आहेत. या सगळ्या झाडांमुळे या भागात कावळे, चिमण्या, कबुतरे, बुलबुल आहेत. सकाळी व संध्याकाळी शेकडो पोपट येतात अन जातात. साळुंक्या आहेत. दयाळ, नाचण नियमित हजेरी लावतात. फुलचुखे येत असतात. तांबटाची टुकटुक ऐकू येते दिवसभर. वसंतात कोकीळेची साद नेहमी कानी पडते. मागच्या ओढ्यामुळे त्याच्याकाठी गायबगळे, पाॅंड हेराॅन, नाईट हेराॅन यांचा रोजचा वावर असतो. इथे दोन तीन पाणकोंबड्यांच्या जोड्या देखील आहेत. ओढ्याच्या भिंतीतल्या पाईपांमधे खंड्याची घरटी आहेत. त्यांची पिल्ले नाल्या काठच्या फ

पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

आपणास पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

.....आणि म्हातारी अमर झाली

... आणि म्हातारी अमर झाली लेखक :-मनवंतराव साळुंखे 💐💐💐💐💐💐 रात्री बराच वेळ झाला होता. देवगडला जाणारी शेवटची बस वेळ होऊनही सुटत नव्हती. बस स्थानक तसे संपुर्ण रिकामे झाले होते. दोन चार प्रवाशी इकडे तिकडे रेंगाळत होते. या बसचे दहा बारा प्रवाशी मात्र तळमळ करीत होते की बस अजुन का सुटत नाही. तेवढयात एकाने निरोप आणला की बसचे एक चाक पंक्चर आहे. तो काढला की गाडी सुटेल. बरोबर दहा वाजता बस निघाली. जवळ जवळ सर्वच प्रवाशी देवगडला जाणारे होते. एका हातात बोचके धरुन बसलेल्या म्हातारी जवळ मात्र जेव्हा वाहक तिकिट फाडण्यास आला तेव्हा रस्त्यावर कातवन फाटा असलेल्या व तेथुन तीन चार किलोमिटर दूर असलेल्या गावाचे तिकिट मागु लागली. बस वाहक विचारात पडला. या म्हातारीचे वय झालेले, एकटीच उतरणारी, पावसाळ्याची गर्द अंधारी रात्र ही म्हातारी घरी कशी पोहचेल? तो थोडासा म्हातारीवर रागावलाच की, 'तु एकटी, तुला नीट दिसत नाही, चालता येत नाही, एवढा उशीर का केला ? लवकर उजेडात निघुन जायचे ना ?' म्हातारीला नीट ऐकु पण येत नव्हते. काही तरी उत्तर तीने दिले. वाहकाने तिला त्या गावाचे तिकिट दिले व आपल्या स्थानावर

"स्वप्न…. त्याचं आणि….. तिचं …!

 “स्वप्न…. त्याचं आणि….. तिचं …!                                                                                                                                                                                डॉ. सूरज चौगुले. इस्लामपूर               चिमुकल्या हातांनी जेव्हा तिने आपल्या बाबांच बोट पकडलं त्याच वेळी तिने स्वप्नांनाही आपल्या इवल्याश्या तळहातावर घेतलं होतं. फुल-पाखरांनी अलगद तळहातावर आपले रंगीबेरंगी रंग सांडावेत तशी तिची स्वप्न तिच्या मनात घर करून बसली आणि मग तिच्या प्रत्येक पावला बरोबर एक नवं स्वप्न तिच्या इवल्याश्या मनावर आपला नवा रंग ठेवून जात होतं. स्वप्न ही किती आरपार जाणारी आणि पारदर्शक असणारी. कधी दुधा सारखी दुधाळ पांढरी तर कधी इंद्रधनुष्याच्या रंगा सारखी. ती स्वतःहून विरून  जायची पांढऱ्या धुक्यात, तर कधी स्वतःचाच इंद्रधनुष्य करायची तयार. आपल्याला हवा तो रंग घेऊन. ! तिच्या इंद्रधनुष्यामध्ये तिचेच रंग ! हवे ते हवे तसे, तिच्या स्वप्नांचे पेटंटही तिचं होतं, त्यावर आणखी कोणाचा अधिकार नव्हता. स्वप्नात यायची-  फुलपाखरं, चॉकलेटचा बंगला, परिचा दरबार आणि खूप काही. रंगून ज

कथा - सत्य कथा

अंजली झरकर - सत्य घटना ( हत्ती) निसर्गासाठी छोट्या मुंगी पासून ते अजस्त्र हत्तीपर्यंत, छोट्या पक्षा पासून ते माणसा पर्यंत सगळे प्रिय असतात. सृष्टी हीच शक्ती आणि सगळी तिची लेकरे तिच्यासाठी समान. हा न्याय निसर्गातील सगळे प्राणी पाळतात फक्त माणूस सोडून! कुठलाही प्राणी मादीच्या इच्छेशिवाय तिचा उपभोग घेत नाही , कुठलाही प्राणी भूक नसताना दुसऱ्या प्राण्यावर हल्ला करत नाही पण स्वतःच्या महत्वाकांक्षे साठी आई बापाच्या डोक्यात दगड घालणारी क्रूर हंडगी जात फक्त माणसाची असते!त्याला  हत्तीच्या जीवाचं काय पडतंय! नदीच्या मधोमध निश्चल उभी राहिलेल्या हत्तीचा फोटो सोशल मीडियावर फिरतोय. त्या फोटोबाबतची कहाणी अत्यंत करूण आहे. केरळच्या पलक्कड जिल्ह्यातील वेल्लीयार नदीत उभा राहिलेल्या गर्भवती हत्तीणीचा तो फोटो आहे. 27 में 2020 ला केरळ राज्याच्या एका फॉरेस्ट ऑफिसर ने मोहन कृष्णन ने माफ कर बहिणी म्हणून एक पोस्ट त्याबद्दल शेअर केली! सायलेंट वॅली मधुन एक हत्तीण पलक्कड जिल्ह्यात भुकेने व्याकुळ होऊन फिरत होती. तिला कुणीतरी फटाक्यांनी भरलेला अननस खाऊ घातला. फटाके तोंडात फुटल्यामुळे तिचे तोंड आणि जीभ फाटल

कथा - ऋणानुबंध

                           * ऋणानुबंध *         दुपारचं जेवण करून मी  बाहेर कट्ट्यावर पुस्तक वाचत बसलो झाडाखाली,  लॉकडाऊन मुळे सगळे घरातच होते मी थोडं आजू बाजूला पाहिलं सर्व शांत होत भर दुपार होती चांगलच कडक ऊन होत, नाक्यावरून एक बाई डोक्यावर कापड घेऊन तोंडावर पदर ठेवून चालत येताना दिसली कोण असेल जरा जवळ आल्यावर बघितलं तर अंदाज आला माझी चुलती होती मी बघून न बघितल्या सारखे केले आणि पुस्तकात डोकं घातलं चुलती माझ्यासमोरून हळू चालत गेली हे मला जाणवलं, पण मी काय लक्ष दिले नाही, गेले पंद्रह एक वर्षांपासून आमचं बोलणं नाही चुलतीने बोलणं टाकलं होतं, आमच्या ह्या वडिलोपार्जित वाड्यावरून वाद होता चुलत्यात आणि वडीलात, वडील जाऊन पाच वर्षे झाली घराच्या वाटणीत अर्धा वाडा त्यांना आणि अर्धा आम्हाला आला होता आम्ही वरती बांधून प्रशस्त, व्यवस्थित केले होते, शेजारी चुलता आणि चुलती राहायची दोन घराच्या मधोमध भिंत बांधली होती चुलत्यानं, नंतर वाटणीच खूळ चुलतीन काढलं होत, भावकीतुन कळले होते , आम्ही दोन्ही भाऊ कधी लक्ष देत नसत आम्ही आणि आमचं घर एवढंच कधी येणं जाणं नाही बोलणं नाही, पण वडील जाताना एकच सांगून गेलत

कथा - माणसं मनातली...... व. पू. काळे

                             *माणसं मनातली......* मोगऱ्याचं फूल ओंजळीत घेतलं की त्याचा गंध मनाला, शरीराला प्रसन्न करून जातो. सहवासातील माणसाचं देखील असंच असतं. काही माणसं काही क्षणातच मनाला खूप आवडतात, आपली होऊन जातात. तर, काही कितीही सहवासात राहिली, तरी त्यांची आतून ओढ नसतेच... चेहरा बघण्यापेक्षा नेहमीच समोरच्याच्या मनात उतरून बघावं. शोधूनही तिथं माणूसपण सापडत नसेल, तर त्याचं सुंदर दिसणंही मग किळसवाणं वाटतं... शरीराची सुंदरता वया बरोबर संपते, तर मनाची सुंदरता शेवटपर्यंत टिकून राहाते. शरीराला वय असतं, मनाला ते कधीच नसतं... शेवटी काय, आपण व्यक्तीच्या स्वभावाच्या प्रेमात असतो, शरीर तर निमित्त मात्र असतं. माणसाच्या स्वभावात गोडवा, शालीनता, प्रामाणिकपणा, आणि विनयशीलता असेल, तर त्याची काही क्षण जरी सोबत मिळाली तरी ती हवीहवीशी वाटते... म्हणूनच बाहेर लक्ष दिव्याची सुंदर आरास असूनही, देवघरातील समईच्या तेजापुढं आपण नतमस्तक होतो... आयुष्यात अशी माणसं कधी भेटली तर त्यांच्यावर जीवापाड प्रेम करावं!! आपल्या आवडत्या माणसाचं आपल्या सोबत असणं, ही आयुष्यातील सगळ्यात मोठी कमाई... ती

कथा: चिमणी

Image

कथा- पहिला चहा

                              #  पहिला चहा  #                       मला पूर्वी चे  चाळीत राहायला असतानांचे ते दिवस आठवले... तो सामायिक व्हरांडा आणि त्याच्या समोर अकरा खोल्यांची उघडी दारं.. तळमजला आणि पहिला मजला बस इतकंच.. खाली अकरा आणि वरही अकराच... लाकडी जिना एका बाजूला भिंती ला पाली सारखा चिकटलेला... इतर चाळी सारखीच काही महत्त्वाच्या गोष्टी सामायिक होत्याच... मालकि हककाची ती भाडेकरु चाळ... ब्रिटीश कालीन ऐतिहासिक वास्तू... अजूनही दणकट... हं आता कुठे कुठे प्लॅस्टर निम्या हुन निखळले असल्याने भिंतीची अब्रु उघड्यावर पडली आहे.. पण स्वातंत्रोत्तर काळातील  बिल्डर कडून थोडीफार  शंकास्पद डागडुजी मात्र दर वर्षी होतेय.. चाळीचा कायापालटच्या नावाखाली तो स्व ताची काया पालट करून घेत आलाय... ... आपला तो विषय नाही... चाळीचे जीवन कसं होतं ते सांगायचं... सगळी बिऱ्हाडं  कामगार वर्ग होता... सगळा कारभार  खुल्लम खुलला... घरोघरी मातीच्या च चुली असल्या सारखा... कोणाच्या घरी कसलाही कार्यक्रम असला तरी तेवीस घरटी आपल्या च घरातलं कार्य समजून घरात घुसत.. मदत न मागता मिळे.. काही अडतच नसायचं... किरकोळ  मतभिन्नते