साने गुरूजी

साने गुरूजी

११जून हा सानेगुरुजी यांचा स्मृतीदिन. महाराष्ट्रात ज्यांना ' आपले ' म्हणावे असे हे थोर व्यक्तिमत्व . आईच काळीज घेऊन आयुष्यभर परिव तयाव्यतिरिक्तर्तनवादी चळवळीत राहणारा हा एक सच्चा ' माणूस ' . प्रबोधनाची ' साधना ' आयुष्यभर करणारा हा एक प्रबोधनपुरूष.

आई जशी आपल्या पिलांना सदैव छातीशी धरते तसेच गुरूजीनी सामान्य जणांना छातीशी धरले. आईची ऊब , बापाची वत्सलता , मित्राचे प्रेम , स्नेहीजणांचा आधार , एका चांगल्या माणसाची सह्रदयता अशा विविध अंगाने हा समाज आपल्या जवळ केला. दिनदुबळ्या माणसांना आशेचा किरण दाखवला..त्यासाठी मनापासून प्रामाणिकपणे कार्य केले. कुठेही दांभिक जगणे नाही , कुठेही अहंकार नाही , कुठेही श्रेष्ठत्वाची मिजास नाही असा हा तुमच्या आमच्या काळजाला हात घालणारा माणूस.

समाजवाद...या जीवन मुल्यावर अपार निष्ठा . अहिंसा हा सर्वोच्च गुण....साहित्य हा आवडिचा प्रकार....गांधीवाद हे आवडते तत्व....साधी राहणी हा आवडता आचार....समाजाप्रती डोळे भरून वाहणारी ममता हे कायमचे दर्शन ....जगाला प्रेम अर्पावे हा सर्वोत्तम विचार .....अस विविधांगी गुण जोपासणारे हे थोर व्यक्तीमत्व .

लहानपणी या ' श्याम ' ला त्याच्या आईने एक जीवन जगण्याची साधना दिली . आई बोलली " श्याम , पायाला घाण लागू नये म्हणून जसा जपतोस तसे मनाला घाण लागू नये म्हणून जप हो ". आईने दिलेले हे जीवनाचे सारं या छोट्या श्यामने मनापासून प्रामाणिकपणे आयुष्यभर जपले. आणि यातूनच महाराष्ट्रातला अभिमान वाटावा असे ' गुरुजी ' निर्माण झाले . या गुरुजीनी ज्ञानाच्या बरोबर मायेची व ममतेची शिदोरी अखंड व अव्याहतपणे आपल्या महाराष्ट्रवासिय लेकरांना पुरविली. ही महाराष्ट्र भूमी धन्य झाली .

" खरा तो एकचि धर्म , जगाला प्रेम अर्पावे " हा गुरुजीनी दिलेला मुल्यविचार आजच्या समस्त भारतवासियांसाठी ' सांगा कसे जगावे ??' या पडलेल्या प्रश्नाचे उत्तर आहे. जगाला प्रेम अर्पण करा हा संदेश आपल्या जीवनात कृतीशील करणे हीच या सह्रदयी निर्मळ माणसाला आदरांजली ठरेल.

सानेगूरूजीना विनम्र अभिवादन .....


                                               - ॲड. नीता मगदूम

Comments

Popular posts from this blog

Syllabus B.SC.I.(2024-2025)

Syllabus BCA II (2025-26)