Posts

Showing posts from January, 2022

रमाबाई रानडे जयंती

 भारतीय समाजसुधारणा चळवळीच्या अध्वर्यू  रमाबाई रानडे यांची आज  २५ जानेवारी जयंती  !! भारतीय प्रागतिक चळवळीचे धुरीण,थोर भारतीय अर्थशास्त्रज्ञ न्यायमूर्ती महादेव  ( माधवराव)गोविंद  रानडे यांच्या त्या सुविद्य पत्नी.त्यांचे नाते मोठे अद्भुत होते. समाजाच्या विरोधाला झुगारून न्यायमूर्ती रानडे यांनी आपल्या पत्‍नीस शिक्षित केले. रमाबाईंनी मराठी, हिंदी आणि बंगाली या भाषांमध्ये विशेष प्रावीण्य संपादन केले. न्यायमूर्ती रानडे यांचं १६ जानेवारी १९०१ रोजी निधन झालं. ते गेल्यानंतर रमाबाईंच खरं कार्य सुरु झालं. महर्षी धोंडो केशव कर्वे लोकांचा रोष पत्करून विधवांना शिक्षण देत होते. या कार्याला आपला हातभार लागावा म्हणून १२ जुलै १९०४ पासून अनाथ बालिकाश्रमाच्या व्यवस्थापनाचं अध्यक्षपद रमाबाईंनी स्वीकारलं. अल्पवयीन मुलींचं देवधर्माच्या नावाखाली केलं जाणारं लैंगिक शोषण थांबवावं, यासाठी भांडारकरांनी गव्हर्नरला जे पत्र लिहिलं त्यात काशीबाई कानिटकर आणि रमाबाई रानडे या अग्रक्रमी होत्या. याच काळात देशात स्त्रियांना मताचा अधिकार द्या, अशी चळवळ सुरू झाली होती रमाबाई रानडे यांनी ‘सर्व्हट्स ऑफ इंडिया’ या साप्ताहिकात

२६ जानेवारी

 भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त आपणास सर्वांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.. 💐💐 उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला...  नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडविला.. भारत भूमीच्या रक्षणासाठी आपल्या प्राणाची आहुती देणार्‍या सर्व वीर पराक्रमी जवानांना, हुतात्म्यांना सलाम.. 🇮🇳🇮🇳 जय हिंद..जय भारत..वंदे मातरम 🇮🇳🇮🇳🙏🙏 आपणास माहितीसाठी.. 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 🇮🇳 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी मधील  मुख्य फरक ...                                    15 ऑगस्टला पंतप्रधान यांच्या हस्ते  ध्वजारोहण केले जाते तर ...   26 जानेवारीला राष्ट्रपती यांच्या हस्ते ध्वज फडकवला जातो . कारण देश 15 ऑगस्टला स्वतंत्र झाला तेंव्हा राष्ट्रपती पद अस्तित्वातच आलेलं नव्हतं.                      ******* ******                                                                       15 ऑगस्टला झेंडा हा उघडलेल्या अवस्थेत दोरीने  वर चढवला जातो. त्याला ध्वजारोहण (flag hoiating) म्हणतात तर... 26 जानेवारीला झेंड्याची बंद घडी करून सरकफासाची दोरीची गाठ बांधून झेंडा अगोदरच वर नेलेला असतो. फक्त दोरी ओढून झेंडा फडकवला जातो. त्याला

प्रा. डॉ.एन.डी.पाटील यांचा जीवनक्रम

Image
प्रा.डॉ.एन.डी.पाटील यांचा जीवनक्रम रयत शिक्षण संस्थेचे, संपूर्ण नाव : नारायण ज्ञानदेव पाटील जन्म : १५ जुलै १९२९ – ढवळी ( नागाव ), जि.सांगली येथे अशिक्षित शेतकरी कुटुंबात जन्म शिक्षण : एम.ए. ( अर्थशास्त्र ), पुणे विद्यापीठ,१९५५; एल.एल.बी.( १९६२ ) पुणे विद्यापीठ अध्यापन कार्य १९५४- १९५७ छत्रपती शिवाजी कॉलेज,सातारा येथे प्राध्यापक तसेच ‘कमवा व शिका’ या योजनेचे प्रमुख व रेक्टर १९६० साली कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज,इस्लामपूर येथे प्राचार्य शैक्षणिक क्षेत्रातील कार्य शिवाजी विद्यापीठ – पहिल्या सल्लागार समितीचे सदस्य १९६२ शिवाजी विद्यापीठ – सिनेट सदस्य १९६५ शिवाजी विद्यापीठ – कार्यकारिणी सदस्य १९६२-१९७८ शिवाजी विद्यापीठ – सामाजिकशास्त्र विभागाचे डीन १९७६-१९७८ सदस्य, प्राथमिक शिक्षण आयोग,महाराष्ट्र राज्य १९९१ रयत शिक्षण संथेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य- १९५९ पासून रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन – १९९० पासून दक्षिण महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ ,बेळगाव अध्यक्ष – १९८५ पासून राजकीय कार्य १९४८ – शेतकरी कामगार पक्षात प्रवेश १९५७ – मुंबई गिरणी कामगार संघटनेचे सरचिटणीस १९६०-६६,१९७०-७६,१९७६-८२ अशी १८ वर्षे म

अर्थसंकल्प

अर्थसंकल्पातील प्रमुख मुद्दे आणि घोषणा  * केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज मंगळवारी अर्थसंकल्प सादर केला - त्यामध्ये देशातील जनतेसाठी कोणत्या महत्त्वाच्या सुविधा आणि योजनांची घोषणा करण्यात आली आहे  🌾 *अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काय ?* ● देशात तेलबियांचे उत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणार, तसेच पिकांवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर करणार ● जलसिंचन योजनेच्या माध्यमातून 9 लाख हेक्टर जमीन पाण्याखाली येणार, त्यासाठी नवीन योजना राबविणार ● 1 कोटी 63 लाख शेतकऱ्यांकडून विक्रमी धान्य खरेदी केली जाणार, 2.37 लाख करोड रुपये MSP Value शेतकऱ्यांच्या खात्यात जाणार ● देशात प्रचंड प्रमाणावर तेलबिया आयात केल्या जाणार, तेलबियांचे उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न करणार, शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणार ● नैसर्गीक शेतीसाठी झिरो बजेट शेतीला प्रोत्साहन देऊन नियोजन करण्यासाठी योजना राबविणार तसेच नाबार्डच्या माध्यमातून स्टार्टअपना मदत करणार ● ग्रामीण विकासासाठी प्रयत्न करणार, कृषी आधारीत स्टार्टअपसाठी प्रोत्साहन देणार, युवकांना मदत करण्यासाठी नाबार्डच्या माध्यमातून भांडवल पुरवणार *उद्योगासा