Posts

Showing posts from June, 2022

लोक राजे - शाहू महाराज - प्रसाद कुलकर्णी

 सामाजिक न्यायादर्शी लोकराजे  शाहू  महाराज ----------------------------------- प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी  ( ९८ ५०८ ३० २९० ) लोकराजे छत्रपती शाहू महाराज यांच्या १४८ व्या जन्मदिनी त्यांना विनम्र अभिवादन.२६ जून १८७४ रोजी शाहूमहाराजांचा जन्म झाला आणि ६ मे १९२२ रोजी ते कालवश झाले.युगकर्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर आपल्या कार्याचा आणि विचारांचा ठसा पुढील अनेक पिढ्यांवर आजतागायत जे उमटवत राहिले आहेत त्यात लोकराजे शाहू महाराज यांचे नाव घ्यावे लागेल.सामाजिक न्यायाच्या प्रस्थापनेला अग्रक्रम देणारे ते जाणते राजे होते.’एक वेळ गादी सोडून देईन पण बहुजनोद्धाराचे कार्य सोडणार नाही असे म्हणणारे ते दुर्मिळ राजे होते. छत्रपती शाहू महाराजांना उत्तरप्रदेशातील कानपुर येथे कुर्मी समाजाने २५ एप्रिल १९१९ रोजी ‘राजर्षी ‘ही पदवी दिली.तसेच शाहू महाराज प्रमुख पाहुणे आणि पुढे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार व भारतरत्न ठरलेले डॉ.बाबासाहेब आंबेडकर अध्यक्ष असलेल्या ‘माणगाव ‘परिषदेचेही हे शताब्दी वर्ष झाले. शाहूरायांच्या कोल्हापूर संस्थानातील ‘माणगाव’येथे २१ व २२ मार्च १९१९ रोजी अखिल महाराष्ट्र अस्पृश्य वर्गाच

Shivaji University Question Bank

  Shivaji University Question Bank Click below http://sukapps.unishivaji.ac.in/questionbank/#/dashboard

शिराज्याभिषेक ०६/०६/२०२२

Image
  ६ जून १६७४ हा दिवस म्हणजे मराठ्यांच्या इतिहासातील सुवर्ण अक्षराने लिहुन ठेवावा असाच दिवस अर्थात शिवराज्याभिषेक दिन. मराठयांच्या या सार्वभौमत्वाच्या सोहळ्याचे यथार्थ असे वर्णन सभासदकाराने आपल्या बखरीत केलेले आहे, सभासद बखरीमध्ये आलेले शिवराज्याभिषेकाचे वर्णन, सभासदकार म्हणतात - " तक्तारूढ व्हावे म्हणून, तक्त सुवर्णाचे, बत्तीस मणाचे, सिद्धं करविले. नवरत्ने अमोलिक जितकी कोषांत होती. त्यामध्ये शोध करून मोठी मोलाची रत्ने तक्तास जडाव केली. जडित सिंहासन सिद्धं केले, रायरीचे नाव रायगड म्हणून ठेविले. तक्तास स्थळ तोच गड नेमीला. गडावरी तक्ती बसवावे असे केले. सप्तमहानदियांची उदके व थोर थोर नदियांची उदके व समुद्राची उदके, तीर्थक्षेत्रे नामांकित तेथील तीर्थोदके आणिली. सुवर्णाचे कलश केले व सुवर्णाचे तांबे केले. आठ कलश व आठ तांबे यांनी अष्टप्रधानांनी राजियांस अभिषेक करावा असा निश्चय करून, सुदिन पाहून मुहूर्त पाहिला. शालीवाहन शके १५९६, ज्येष्ठ मासी शुद्ध १३ स मुहूर्त पाहिला. ते दिवशी राजियानी मंगलस्नाने करून श्रीमहादेव व श्रीभवानी कुलस्वामी व उपाध्ये प्रभाकर भटांचे पुत्र बाळभट कुलगुरू व भट गोसाव