Posts

Showing posts from June, 2021

राष्ट्रीय वाचन दिन १९ जून

 आज दिनांक १९ जून २०२१ भारताचा *राष्ट्रीय वाचन दिन* या निमित्ताने   डिजिटल (फुल टेक्स्ट) पुस्तकांचे प्रदर्शन आयोजित केले असून वाचकांनी सोबत दिलेल्या  क्रांती सूर्य शाहू महाराज पीडीएफ मध्ये आहे. https://drive.google.com/file/d/1yluwv2nSUAveuR3pjCCEqXeUaU2NtO9N/view?usp=drivesdk *सर्वांना राष्ट्रीय वाचन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

1st to12th Book

 * edu.vopa.in* या निळया अक्षरावर क्लिक करा  *वर्ग ,विषय ,व धडा* निवडा डायरेक्ट त्या धड्याचा व्हिडिओ  सुरू होईल . E learning आपल्या गावातील प्रत्येक मुलांना याचा फायदा करून देता येईल

प्रल्हाद केशव अत्रे स्मृतिदनानिमित्त

Image
' जीवनाची जी चिरंतन मूल्ये आज मानव जातीच्या प्रगतीपथावर ध्रुवा ताऱ्याप्रमाणे आढळत तेजाने तळपत आहेत, ती मुल्ये आणि सत्ये ही मानव जातीला साहित्याने दिलेली लेणी आहेत. आजच्या युगात मानवी जीवनाला आवश्यक असणारे साहित्य हे सहावे महाभूत आहे. स्वतंत्र राष्ट्राला सैन्यापेक्षा आणि आरमारा पेक्षा आज साहित्याची जास्त जरुरी आहे.कारण सैन्य आणि आरमार फार झाले तर जिवंत राष्ट्राचे रक्षण करू शकेल. पण राष्ट्राला जिवंत ठेवण्याचे काम केवळ साहित्य करू शकते......असे म्हणणाऱ्या आचार्य अत्रे यांना आज रविवार ता.१३ जून २०२१ रोजीच्या त्यांच्या बावन्नव्वा स्मृतीदिनी विनम्र अभिवादन.... आचार्य अत्रे : साहित्याला सहावे महाभूत मानणारा प्रतिभावंत ----------------------------------------------------------------------- प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी  (९८ ५०८ ३० २९०) आचार्य प्रल्हाद केशव अत्रे म्हणजे विविध क्षेत्रात उत्तुंग कामगिरी केलेले एक थोर अष्टपैलू व्यक्तिमत्व. १३ ऑगस्ट १८९८रोजी जन्मलेले आचार्य अत्रे वयाच्या  एकहत्तराव्या वर्षी १३ जून १९६९ रोजी कालवाश झाले. साहित्यापासून राजकारणापर्यंत ,रंगभूमीपासून पत्रकारितेपर्य

पु.ल.देश पांडे स्मृिदिनानिमित्त

Image
पु ल. समगर्तेला व्यापणारा कलावंत ---–------------------------------------------- प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी  (९८५०८ ३०२९०) पुलं उर्फ पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे म्हणजे महाराष्ट्राच्या साहित्य, संगीत, चित्रपट, दूरदर्शन ,संस्कृती,दातृत्व अशा विविध क्षेत्रातील एक अष्टपैलू  कलावंत. ” महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व “ही उपाधी जनतेने त्याला दिली होती. ८ नोव्हेंबर १९१९ रोजी जन्मलेले पुलं १२ जून  २००० रोजी कालवश झाले. शेवटची काही वर्षे त्यांना कंपवाताच्या आजाराने घेरले होते. त्यांना जाऊन एकवीस वर्षे झाली तरीही त्यांच साहित्य सांस्कृतिक क्षेत्रातील गारुड अद्याप ओसरलेल नाही.त्यांच्यावर  दोन भागात चित्रपट काढावा लागणे हे त्याचे द्योतक आहे. ‘ ‘ ‘ ‘ समाजाच्या समग्र संस्कृतीला व्यापुन उरणारा कलावंत’ अशा शब्दात त्यांचा गौरव केला गेला होता. पुलंचे वडील हे नाट्य – संगीत प्रेमी होते. तर त्यांच्या आईचे वडील म्हणजे पुलंचे आजोबा वामन मंगेश दुभाषी हे लेखक होते. पुलंचे प्राथमिक ,माध्यमिक शिक्षण मुंबईत झाले.तर इस्माईल युसुफ कॉलेज (मुंबई), फर्ग्युसन कॉलेज ( पुणे) आणि विलिंग्डन महाविद्यालय (सांगली )याठिकाणी

साने गुरूजी (७१वा स्मृतिदनानिमित्त)

Image
  *शिक्षक म्हणून साने गुरुजी कसे होते ?*                ----------आज ११ जून साने गुरुजींचा  ७१ वा स्मृतिदिन .७१ वर्षे झाली तरी  महाराष्ट्रातील शिक्षकांना सानेगुरुजी प्रेरणादायी आहेत परंतु सानेगुरुजी असे म्हणताना गुरुजींनी शिक्षक म्हणून कुठे काम केले ? कोणते विषय शिकवले? वस्तीगृहातील विद्यार्थ्यांसोबत कोणते प्रयोग केले? विद्यार्थ्यांना कशी सामाजिक प्रेरणा दिली? या विषयी फार माहिती नसते तेव्हा साने गुरुजी हे शिक्षक म्हणून कसे प्रेरणादायी होते याविषयी आपल्याशी बोलताहेत *शिक्षकांसाठी साने गुरुजी*(मनोविकास प्रकाशन) या पुस्तकाचे लेखक हेरंब कुलकर्णी                                                                                                                      *लिंक*   https://youtu.be/cgE78dl49Rs