Posts

Showing posts from December, 2021

मेधा पाटकर जन्मदिन

 *मेधा पाटकर* .... *समर्पणाचे दुसरे नाव*  (१ डिसेंबर मेधा पाटकर यांच्या ६७ व्या वाढदिवसानिमित्त मेंधाताईंचे मोठेपण कशात आहे यावर हेरंबकुलकर्णी यांनी लिहिलेला लेख) --------------------------------------------------------- मेधा पाटकर हे एका अस्वस्थतेचे नाव आहे  मेधा पाटकर हे एका समर्पणाचे नाव आहे  मला मेधा का भावते ?  मेधाने माझ्यावर नेमके काय गारुड केले आहे ?  मनाच्या तळाशी रुतून बसलेली मेधा मला सारखी का हाकारत असते ?  ती मला माझ्या सुखवस्तू आयुष्याला अपराधीभावाची चौकट देत राहते  मेधाचा बायो डाटा तिच्या आयुष्यातील सगळे प्रसंग यावर आजपर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून अनेकदा लिहिले गेले आहे. त्यामुळे मेधाचे आयुष्य पुन्हा सांगण्यापेक्षा मेधा मला का हाकारते ? याचा आज शोध घ्यावासा वाटतो.  घरातील सामाजिक पार्श्वभूमी, कामगार चळवळीतील वडील,आजूबाजूचे सामाजिक वातावरण, घरी येणारे सगळे महत्त्वाचे कार्यकर्ते आणि विद्यार्थिदशेत शाळेतील विविध उपक्रम, महाविद्यालयातील व्यासंग फुलवणारे वातावरण, टाटा समाज विज्ञानने दिलेली संशोधकीय नजर आणि विविध सामाजिक प्रकल्पात काम करण्याची मिळालेली संधी ही जडणघडण याचा नक्कीच