Posts

Showing posts from May, 2020

कथा - लाँकडाऊन - सौ.शुभांगी लेले

                              लाँकडाऊन    टीव्हीवर बातम्या सुरु होत्या.त्याबरोबरीनं बघणाऱ्यांची चर्चाही सरु होती.कुठे कुठे लाँकडाऊन उठले याची प्रत्येकालाच उत्सुकता होती.      अनुनं हळूच हाँलमधे डोकावून विचारलं "अहो...कर्नाटकचं लाँकडाऊन उठलं का?त्यावर त्यानं वाईट तोंड करत नन्नाची मान  डोलवली.तसं अनुनं एवढसं तोंड करुन स्वयंपाकात लक्ष घालण्याचा प्रयत्न केला.तेवढ्यात तिचा मुलगा आत येऊन म्हणाला " आज काय करतीयंस जेवायला? "  तसा तिचा आवरुन धरलेला राग बाहेर पडला."रोज काय नवीन करायचं असतं?आता मलाच खा." असं म्हणत ती रागानं खोलीत निघून गेली.नवऱ्याच्या ते लगेचच लक्षांत आलं. तिच्या पाठोपाठ तोही खोलीत गेला.तशी ती भडकली.म्हणाली "सगळं करुन ठेवलंय ते खा.मला भूक नाही.जा तुम्ही.तसा तो म्हणाला " पण इतकं झालंय तरी काय? आत्तापर्यततर ठीक होतीस.हे ही खरं आहे म्हणा,छोट्या छोट्या कारणानं रुसुन बसण्यातली अनु कधीच नव्हती.डोळे पुसत पुसत अनु म्हणाली, या कोरोनालासुद्धा आत्ताच यायचं होतं का!नेमका मार्च गाठलानं.अगदी आँडीट टाईम.मेला जूनमध्ये आला असता तर काय बिघडत होतं.तो समजूत काढ

कथा - सुपरवुमन - डॉ. मृदुला बेळे

                     "  सुपरवुमन "               आपल्या सुपरवुमनच्या प्रतिमेत बायका स्वत:च इतक्या अडकतात, की माणूस म्हणून जगायलाच विसरतात.काटकोन त्रिकोण’ या नाटकातलं एक वाक्य मला फार आवडतं. ‘लग्न झाल्यावर नव्या नवरीनं तेवढंच चांगलं वागावं जितकं आयुष्यभर वागायला जमेल’ किती खरं आहे हे!        कौतुक करून घेण्यासाठी माणूस एक-दोन दिवस जास्त कष्ट करू शकतो, स्वभाव नसला तरी गोड गोड वागू शकतो.        आयुष्यभर कसं वागणार असं? त्याचा ताण यायला लागतो. शरीरावरही. मनावरही.       शिवाय बाकीच्या जबाबदाऱ्या वाढतात, वय वाढतं, तशी तब्येत ढासळते (कारण तिच्याकडे लक्ष द्यायला वेळच झालेला नसतो).      स्वत:वर पैसे किंवा वेळ खर्च करणं हा गुन्हा आहे या समजातून आपण बायका कधी बाहेर येणार आहोत?       जो माणूस आधी स्वत:ला खुश ठेवतो तो आणि तोच दुसऱ्यालाही आनंदात ठेऊ शकतो हे आम्हाला कधी कळणार *‘सुपरवुमन’* या आपल्या पदवीचा त्याग करायला हवा. आपल्या इतरांनी केलेल्या कौतुकात रमण्यापेक्षा आपल्याला काय हवंय हे आधी समजून घ्यायला हवं.     शिवाय स्वत:ला आनंदी ठेवणं ही आपली जबाबदारी आहे हेही समजून घ्यायला हवं

कथा - फ्रन्टलाइन - डॉ.सूरज चौगुले

                 "फ्रन्टलाइन"          डॉ सुरज चौगुले, इस्लामपूर       ओ.पी.डी. मध्ये दाखल झालेल्या प्रत्येक पेशंटची पहिली सलामी 'शारदा, आणि 'आरिफा' या दोघींशी व्हायची, येणाऱ्या प्रत्येक पेशंटची मेडिकल हिस्टरी व  अन्य माहिती घेऊनच त्या दोघी या पेशंटना पुढे डॉक्टर कडे पाठवीत होत्या. खरंतर हे उलट व्हायला हवं होतं अगोदर पेशंट डॉक्टरकडे जायला हवा होता पण कोरोणाच्या धामधुमीत या सरकारी दवाखान्यात शारदा अन आरिफा  या 'फ्रन्टलाइन'झाल्या होत्या. कोरोनाशी लढणारे आमचे डॉक्टर प्रथम आपल्या हाताखालची ढाल समोर करीत होते आणि या दोघी मोठ्या उत्साहाने याला सामोरे जात होत्या. अर्थात बाकीच्या नर्सही होत्या परंतु या दोघी जणू कोरोना स्पेशालिस्ट सारख्या वावरत होत्या. मुख्य डॉक्टर आणि सहाय्यक डॉक्टरही या दोघींचं तोंड भरून कौतुक करत होते, तर तर सहकारी डोळे मोडित त्यांच्या तोंडावर हसू आणि माघारी कटू गीत गात होते.     शारदाचा विवाह दीड वर्षापूर्वी झालेला परंतु दुर्दैवाने एका मोटरसायकल अपघातात तिच्या पतीचा मृत्यू झाला होता. पोटाला पोर नाही. तरीही पतीच्या आठवणी मात्र तिने जन्म

कथा - तिचा समुद्र - डॉ. सूरज चौगुले

                   "तिचा समुद्र"                  डॉ. सूरज चौगुले        आज माझी चिमुरडी पोर मला विचारू लागली," बाबा रत्न, माणिक, मोती कुठे सापडतात?" मी म्हटलं," खोल समुद्रात सापडतात ते. समुद्र तळाला, करावं  लागत त्याला समुद्रमंथन,    धुंडाळावी लागते सारी रेती- माती. मग लागतात हाती कधी तरी पण त्याहीआधी सापडतील तुला विद्रूप आकाराची शिल्प आणि पचवाव  लागेल कदाचित 'हलाहल' ही तुला जागोजागी सांडलेलं आणि अनेकांनी उष्ट केलल." तिने विचारलं," कुठे असतो समुद्र ?" मी म्हटलं," तो ही तुलाच शोधावा लागेल, अन्यथा तूच बनव तुझा समुद्र.अनेकांनी आपापले बनविले आहेत समुद्र अन डुबक्या मारत शोधताहेत त्याची अथांगता! पण अजून झर्याचाही तळ गाठू शकले नाही ते, तरीही त्यांना आनंद असतो समुद्रात शु..शु केल्याचा, निलाजरेपणाने वाट बघत बसतात भरतीची. तेव्हा तु ही शोध तुझा समुद्र अथवा बनव तुझ्या इवल्याश्या हातांनी, त्या साठी हवं तर आभाळाची निळाई घे ,आसमंताची हिरवाई घे आणि हो हिरवा आला तर भगवा पण घे कारण इथं रंगा रंगांना धर्मांनी विभागून घेतल आहे. पण एक लक्षात ठेव, हे

कथा - अवघा रंग एकचि झाला

            *अवघा रंग एक झाला* सावळी आज येणार नाही आजीच्या बहिणीच्या नातीने शेजारच्या गॅलरीतून ओरडून  निरोप दिला,... ते ऐकून आजी अस्वस्थ झाल्या,...पडल्या पडल्या डोळ्यातून पाणी गळायला लागलं आता आपलं नॅपकिन कोण बदलणार ..?खरंतर सावळीमुळे आपण एवढं व्यवस्थित राहू शकतो आणि सावळी येणार नाही म्हणते पण का काय झालं,..?अगतिक होऊन चिडून ओरडून आजींनी विचारलं ,..त्यावर  नात म्हणाली,.. आजी कर्फ्यु लागला आहे रस्त्याने जीवावर उदार होऊन येते ती गेल्या 15 दिवसांपासून तुम्हाला काय माहिती?? हो बाहेर काय वातावरण आहे ते,...एवढं बोलून ती नात आत निघून गेली,...आजीला जाणवायला लागलं खुपच उष्ण पाणी आपल्या गालावरून ओघळतंय आपल्याला आता खरंतर मरून जावं वाटतंय,..देवा काय खेळ लावला आहेस रे ह्या जीवाचा..? लवकर सम्पव तरी अरे आमच्या सारखी मरण मागणारी माणसं सोडून तरुण लोक घेऊन चालला न्याय कुठे तुझा,...?तेवढ्यात आजीला लॅच उघडल्याचा आवाज आला,..आजी ओरडली ,..भयभीत होऊन कारण चावी फक्त सावळीकडेच असते,..आणि आताच तर निरोप असा आजी विचार करत होती तर समोर गोड हसणारी सावळी,.. आजी म्हणाली," काय गम्मत करतेस का ग माझी म्हातार

कथा - ना कलंक लग जाए

              *ना कलंक लग जाए…* *लॉकडाऊन वाढणार अशी चर्चा चालू झाली आणि आज कुठे तरी वाचलेली एक कथा आठवली* कोणातरी देशाचा एक राजा होता. बरेच वर्ष राज्य त्याने भोगले. केस पांढरे झाले, वय झाले तरीही त्याने राज्याचा त्याग केला नव्हता. त्याच्या राज्यरोहण समारंभाच्या दिनानिमित्त त्याने एक उत्सव करायचे ठरवले. देशोदेशीच्या सर्व राजांना व आपल्या गुरूंना आमंत्रणे पाठवली. उत्सवाची सांगता आणि मुख्य आकर्षण होते एक जगप्रसिद्ध नर्तकीचा नृत्याविष्कार. राजाने या उत्सवा निमित्ताने आपल्या गुरूंना जरा जास्तच दक्षिणा दिली जेणे करून जर गुरुजींना नर्तकीला काही बक्षीस द्यावेसे वाटले तर त्यांच्याकडे पुरेसे पैसे असावेत. संपुर्ण रात्रभर नर्तकी नृत्य करीत होती. प्रत्येक प्रेक्षक मंत्रमुग्ध होऊन नृत्य पहात होता. इतक्यात त्या नर्तकीचे लक्ष आपल्या तबलजी कडे गेले आणि तिच्या लक्षात आले की तो पेंगत आहे आणि त्याला सावधान करणे गरजेचे आहे नाहीतर आत्तापर्यंत केलेल्या सर्व अविष्कारावर पाणी पडेल, प्रेक्षकांचा रसभंग होईल आणि राजा शिक्षा करेल ते वेगळे. त्याला जागे करण्यासाठी ती एक दोहा म्हणते _*बहू बीती, थोड़ी रही, प

कथा - परतफेड

               "परतफेड" कसे आहात..??" एवढा एकच प्रश्न तिने विचारला.. आणि रोज दिसणाऱ्या पण जास्त परिचय नसणाऱ्या त्या बाईसमोर मी मनसोक्त रडलो.. ती म्हणाली.. "भरपूर रडून घ्या.. मला वेळ आहे. आजच रडायचं आणि नंतर कधी सुध्दा डोळ्यांतून पाणी काढायचं नाही.." त्या नंतर तिने जे काही सांगितलं.. त्या मुळे माझा अंतरबाह्य असा  कायापालट झाला..! "तिनं काय सांगितलं..??" ती शांतपणे म्हणाली.. "की आपण हा जो मनुष्य जन्म घेतलाय तो आपल्या अपेक्षांपूर्तीं करिता नाही किंवा नसावा.. कारण  आयुष्यात आपण नेहमी दुसऱ्यांकडूनच अपेक्षा ठेवत असतो आणि बरयाचदा त्या पूर्ण होत नाहीत.. त्या मुळे उरतात त्या फक्त जाळणाऱ्या व्यथा..!" "माझ्या मते हा जन्म आपल्या अपेक्षांपूर्तीं करिता नाहीच आहे, तर हा आहे कुठे तरी, केव्हा तरी राहुन गेलेल्या दुसऱ्यांच्या परतफेडीसाठी..." जसं तुमच्या सौभाग्यवती गेल्या, तुम्ही त्यांचा संसार पूर्ण केलात, तुम्ही त्यांचा संसार पूर्ण करण्याकरिता हा जन्म घेतला, ह्याचा अर्थ कोणत्यातरी एका जन्माची परतफेड तुमच्या कडुन झाली.. तो  अकाउंट तुमचा

कथा - नॉनव्हेज - सचिन देशपांडे

 *सचिन देशपांडे* 'नाॅनव्हेज' गुळ - तुप पोळी खाऊन ऊठला अभय ताटावरुन. आज सलग तिसरा दिवस होता अनुयाने भाजी, आमटी, भात वैगरे काहिच न करण्याचा. काल शिकरण पोळी खाल्लेली त्याने... तर परवा दही - साखर पोळी. मुळात अभयचा कटकट्या स्वभाव अजिबातच नव्हता... आणि जेवणाबाबतीत तर अगदीच चोखंदळ नव्हता तो. दुपारी डबा ऊघडल्यावर... नी रात्री ताट समोर आल्यानंतर कळत असे त्याला, की स्वैपाक काय आहे. कधी कुठली फर्माईशही अभयने केली नव्हती अनुयाकडे, लग्नाच्या गेल्या बारा - तेरा वर्षांत. अनुया मुळातच प्रचंड सुगरण होती... मुख्य म्हणजे स्वैपाकात, मनापासून रस असणारी होती. त्यामुळेच तिच्याकडून आत्तापर्यंत... कधीच हेळसांड झाली नव्हती, घरच्यांच्या जेवणा - खाण्याची. अभयने भले एकदाही कौतुक केलं नसेल, अनुयाच्या स्वैपाकाचं... पण कधी एका शब्दाने खोडीही काढली नव्हती, तिने केलेल्या जेवणात. ऊदर भरणाला खर्‍या अर्थाने, यज्ञ कर्म जाणणार्‍यातला होता अभय. ही कौतुकं, खोड्या, फर्माईशींची आघाडी सांभाळत असत, त्यांचे दोन लेक... आणि लेकांच्या आडून त्यांची आजी, म्हणजेच अभयची आई... रोहिणी. रोहिणीबाई प्रचंड 'फुडी' कॅटेगर

कथा - मोहराचा आंबा - डॉ.सूरज चौगुले

'मोहराचा आंबा'        डॉ. सूरज चौगुले, इस्लामपूर     शिवराम अण्णांचं  आंब्याचं झाड म्हणजे साऱ्या गावातील मुलांसाठी माहेर घरच होतं. गावापासून काही अंतर दक्षिणेला लोणार ओढा पार करून पुढे गेलं की सुतारकीचा  पांदीचा रस्ता थेट शिवराम अण्णांच्या मळ्यात पोहोचायचा. लोणार ओढ्याचं पाणी सहा महिने तरी टिकून असायचं त्यामुळे ओढ्याच्या दोन्ही बाजूंनी असलेली गर्द हिरवाई पाखरांसाठी पर्वणीच असायची, ओढ्याच्या गावाकडच्या बाजूला मराठी शाळा, शिकणारी मुलं शाळेत आणि शिकण्यासाठी म्हणून शाळेत आलेली मुलं एकतर ओढ्यात नाहीतर सुतारकीच्या पांदीतून सरळ शिवराम अण्णांच्या आंब्याखाली सर्रास दिसून येत असत.  अण्णांच्या आंब्याच्या झाडाची ओढ मुलांना इतकी लागायची की रविवारचा संपूर्ण दिवस त्या झाडावर मुलांची किलबिलाट असायची, ते झाड सुद्धा तितकच लेकुरवाळ होतं लांबून पाहिलं तर काळ्याभोर धर्तीवर एखादी हिरवीगार अर्धगोलाकार डेरेदार शीला ठेवावी असा त्याचा आकार होता. लांबून झाडाचा बुंधा कधी दिसलाच नाही. सर्कशीतील तंबूप्रमाणे आकाशात उंच जाऊनही पुन्हा मातीची ओढ घेत त्याच्या फांद्या जमिनीकडे झुकलेल्या, जमिनीपासून सहा-सात

कथा - मला भेटलेली एक सुंदर स्त्री - डॉ. अभिजित

*डॉ.अभिजीत यांची एक उत्कृष्ट कथा* *मला भेटलेली एक सुंदर स्त्री* एका संध्याकाळी सगळी कामं  आटोपुन मंदिराबाहेरील एका आडबाजुच्या बाकड्यावर बसलो होतो, अंधार पडत चालला होता, वर्दळही फारशी नव्हती.  घरी जायच्या आधी कोणाचे काही कॉल्स, व्हॉट्स अप बघावं म्हणुन मोबाईल काढला.... बघतो तो हँग झालेला... बापरे बरेच महत्त्वाचे कॉल्स आता कसे  करायचे? मोबाईल चालु करण्याचा खटाटोप चालु झाला... वैताग आला... मोबाईल काही सुरु होईना .... काय करावं या विचारांच्या  तंद्रीत असतांनाच खांद्यावर कुणीतरी हात ठेवला आणि घोगर्या आवाजात कुणीतरी विचारलं, कोण हाय ...? मी तंद्रीतुन जागा होत एकदम दचकलो आणि वर पाहिलं तर बघुन भिती वाटावी अशा विचित्र चेहऱ्याची एक बाई शेजारी उभी.... आधी घाबरलो पण नंतर चिडुन विचारलं , काय बाई हि काय पद्धत आहे का ? दिसतंय का नाही तुला ? फटकन येवुन अशी अंगावर हात ठेवतेस ... घाबरलो ना मी...! तशी म्हणाली, आवो मला दिसत नाय, हितंच मी भायेर भीक मागती, या टायमाला मी हितंच बसुन भाकर खाती... मापी करा, मी जाती दुसरीकडं ... मी ओशाळलो, म्हटलं, नाही बाई बसा इथंच , मी चाललोच आहे... तिला बघुन अंगातल

कथा - मुलगी शाप की वरदान

Image

Coivid 19

https://drive.google.com/file/d/1DHwYu_TDQXPIGhcjHjqayxgt3wX8fMvt/view?usp=drivesdk

मातृदिन

*आज माणिक सीताराम गोडघाटे ऊर्फ कवी ग्रेस यांचा जन्मदिन.* जन्म. १० मे १९३७ कवी ग्रेस हे मराठी कवितेच्या प्रांतावर मौलिक ठसा उमटवून गेलेले कवी...'ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता' या काव्याने घरोघरी पोहचलेले माणिक गोडघाटे ऊर्फ कवी ग्रेस. कवी ग्रेस यांची मर्ढेकरोत्तर नव कवींच्या दुसऱ्या पिढीतील प्रमुख कवींमध्ये गणना होते. ग्रेस मूळचे नागपूरचे. त्यांचे वडील सैन्यात होते. नागपुरातील कर्नल बाग परिसरात त्यांचं बालपण हलाखीच्या परिस्थितीत गेलं. आईच्या अकाली निधनामुळे नोकरी व शिक्षण यांच्यात मेळ साधत त्यांना आपली प्रतिभा जपावी लागली. १९६६ मध्ये ते नागपूर विद्यापीठातून मराठीमध्ये एम.ए. झाले. त्यानंतर दोन वर्षं त्यांनी धनवटे नॅशनल कॉलेजमधे अधिव्याख्याता म्हणून नोकरी केली. १९६८ पासून १९९७ साली निवृत्त होईपर्यंत ते नागपूरमधील वसंतराव नाईक समाजविज्ञान संस्थेत (मॉरिस कॉलेज) मराठीचे प्राध्यापक होते. निवृत्तीनंतर काही काळ ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या मराठी विभागात सौंदर्यशास्त्र या विषयाचं अध्यापनही करत होते. ग्रेस यांच्या लिखाणाला सुरुवात झाली १९५५ सालापासून. 'छंद&