Posts

Showing posts from November, 2020

महात्मा जोतिबा फुले

Image
  महात्मा फुले पुण्यतिथीनिमित्त    * शिक्षणतज्ज्ञ महात्मा फुलेंचे*   *शैक्षणिक चिंतन*   *नेमके काय आहे ....?*                                प्रा. हरी नरके     (अभ्यासक व विचारवंत) यांची महात्मा फुलेंचा शिक्षणविचार, अभ्यासक्रम, शिक्षणाची  उद्दिष्ट्ये, व्यावसायिक शिक्षण, गळती, यावर फुलेंचा दृष्टिकोन अशा अनेक मुद्द्यांवर हेरंबकुलकर्णी यांनी  घेतलेली सविस्तर मुलाखत  लिंक  https://youtu.be/qGM26EyCWvw -----------------------------------------

संविधान दिन

Image
संविधान दिन  किंवा  राष्ट्रीय विधी दिन  हा  २६ नोव्हेंबर  रोजी भारतभर साजरा केला जातो.  २९ ऑगस्ट   १९४७  रोजी  डॉ. बाबासाहेब आंबेडकर  यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी मसूदा समिती स्थापन झाली. अनेक बैठका व चर्चासत्रांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा  २६ नोव्हेंबर   १९४९  रोजी संविधान सभेने स्वीकारला. त्सामुळे २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. भारतीय संविधान आणि घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सन्मानार्थ भारतीय संविधान दिन साजरा केला जातो. भारत सरकारने आंबेडकरांचे १२५वे जयंती वर्ष साजरे केले जात असताना त्यांना एक प्रकारची श्रद्धांजली वाहण्यासाठी २६ नोव्हेंबर २०१५ रोजी पहिला अधिकृत संविधान दिन साजरा केला. संविधानाबाबत जनजगृती करण्यासाठी आणि आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने देशभरात २६ नोव्हेंबर हा दिवस 'संविधान दिन' म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने २४ नोव्हेंबर २००८ ला आदेश काढून '२६ नोव्हेंबर' हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्याचे घोषित केले होते.