Posts

Showing posts from February, 2022

मराठी भाषा गौरव दिन

लता मंगेशकर

Image
  लता मंगेशकर  1929- 2022 गानसम्राज्ञी ‘भारतरत्न’ श्रीमती लता मंगेशकर यांना शिवाजी विद्यापीठाची सन्मानदर्शक “डॉक्टर ऑफ लेटर्स” ही पदवी दि. २१ नोव्हेंबर १९७८ रोजी प्रदान करण्यात आली. त्या प्रसंगी तत्कालीन कुलगुरू डॉ. भा.शं. भणगे यांनी वाचलेले गौरवपत्र...) भारतातच काय, पण जगभर जिच्या सुरांचे साम्राज्य पसरले आहे, त्या ह्या अलौकिक गायिकेला- लता मंगेशकर यांना शिवाजी विद्यापीठाच्या विधिसभेने व कार्यकारिणीने एकमुखाने ठराव करून 'डॉक्टर ऑफ लेटर्स' ही सन्मानदर्शक पदवी प्रदान करावी, अशी इच्छा व्यक्त केली आहे. 'संगीतसूर्य' कै. मास्टर दीनानाथ यांच्या लताबाई मंगेशकर या ज्येष्ठ कन्या. त्यांचा जन्म २८ सप्टेंबर, १९२९ रोजी इंदूर येथे झाला. वडिलांच्या मृत्युनंतर लताबाईंना अवघड परिस्थितीशी झगडावे लागले. ह्या झगडयातूनही त्यांनी अलौकिक यश मिळविले आहे. मा. दीनानाथांचे गाणे पहिल्यांदा ऐकल्यावर बालगंधर्व म्हणाले होते, 'हा मुलगा जर माझ्या हाती लागला, तर मंगेशी ते मुंबई असा रूपयांचा गालीचा अंथरून, त्यावरून वाजत गाजत मी याला माझ्या मंडळीत आणला असता.' जे त्यांच्याबाबतीत घडू शकले नाही, ते त्

सांगलीची माहिती वैशिष्टे

सांगलीची२२ वैशिष्टे  एक काळ होता पुण्या-मुंबईत MH10 गाडी दिसली की पोलीस गाडी अडवायचे नाहीत. चुकून कुठली गाडी अडवलीच तर समोरचा थेट कॅबिनेट मंत्र्याला फोन लावायचा. एका वेळी तीन कॅबिनेट खिश्यात ठेवणारा हा जिल्हा. कॉंग्रेसी परंपरेतून आलेला पुढाऱ्यांचा जिल्हा. बाहेरचा माणूस सांगलीत आला की त्याला माणसं कमी आणि पुढारी जास्त दिसायचे. वसंतदादा पाटलांमुळे या जिल्ह्याला मुख्यमंत्रीपद मिळालं.  काही वर्षांपर्यन्त एकाच वेळी आर.आर.आबा, पतंगराव कदम, जयंत पाटील हे तिघे मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये असायचे. मध्यंतरीच्या काळात मदन पाटील यांना राज्यमंत्री पद होतं तर प्रतिक पाटील केंद्रात राज्यमंत्री होते. म्हणजे एकाच वेळी पाच मंत्रीपद या जिल्हात होती. महामंडळ तर तालुक्यात दोन असतील. बाकी समित्या वगैरे तर कोण मोजत पण बसायचं नाही.  सगळं काही भरपूर मिळण्याचं कारण आहे ते इथलं पाणी. इथं पाणी पण भरपूर येतं. पाण्याचा हाच स्वभाव सांगलीच्या मातीत विरघळला आणि सांगलीकर जन्माला आला.  आत्ता सुरू करुया सांगलीच्या दमदार अशा पंचवीस वैशिष्टांकडे.  १) सांगलीत पुर्वी सहागल्या होत्या म्हणून या गावाचं नाव सहागल्ली वरून सांगली झ

B.A I. Exam 2020-2021

Image
 

B. A.I Exam 2021-2022

Image
 

अर्थसंकल्प

 अर्थसंकल्पातील प्रमुख मुद्दे आणि घोषणा  * केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन : 🌾 *अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काय ?* ● देशात तेलबियांचे उत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणार, तसेच पिकांवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर करणार ● जलसिंचन योजनेच्या माध्यमातून 9 लाख हेक्टर जमीन पाण्याखाली येणार, त्यासाठी नवीन योजना राबविणार ● 1 कोटी 63 लाख शेतकऱ्यांकडून विक्रमी धान्य खरेदी केली जाणार, 2.37 लाख करोड रुपये MSP Value शेतकऱ्यांच्या खात्यात जाणार ● देशात प्रचंड प्रमाणावर तेलबिया आयात केल्या जाणार, तेलबियांचे उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न करणार, शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणार ● नैसर्गीक शेतीसाठी झिरो बजेट शेतीला प्रोत्साहन देऊन नियोजन करण्यासाठी योजना राबविणार तसेच नाबार्डच्या माध्यमातून स्टार्टअपना मदत करणार ● ग्रामीण विकासासाठी प्रयत्न करणार, कृषी आधारीत स्टार्टअपसाठी प्रोत्साहन देणार, युवकांना मदत करण्यासाठी नाबार्डच्या माध्यमातून भांडवल पुरवणार *उद्योगासाठी काय ?* ● सौरऊर्जा निर्मितीसाठी 19,500 कोटी रुपयांची तरतूद, देशात सौरऊर्जेसाठी सौर पॅनेल आधारित ऊर्जा प्रकल्प विकसित करण्यावर भ