Posts

Showing posts from December, 2023

डॉ. आंबेडकर महापरिनिर्वाण दिन

Image
    ०६ डिसेंबर  भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो.०६ डिसेंबर १९५६ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे निधन झालं त्यामुळे त्या दिवसाला महापरिनिर्वाण दिन असं म्हटलं जात.              डॉ. आंबेडकर हे जगातील सर्वश्रेष्ठ वाचकांपैकी एक होते. इंग्लंडमध्ये शिकत असताना  ब्रिटिश म्युझियममध्ये वाचण्यासाठी ते जात असत. या ठिकाणी घडलेला सँडविच किस्सा सर्वांना परिचित आहे.काहीही न खाता दुपारी १२ तास वाचन करित असत.ज्ञानाची भूक  भागवण्यासाठी डॉ. आंबेडकर यांनी अशा प्रकारे पोटाची भूक मारून टाकली. भीमरावमध्ये वाचनाचा व्यासंग  निर्माण करून तो टिकवण्याचा पुरेपूर प्रयत्न वडील रामजी सकपाळ यांनी केला. घरची परिस्थिती अतिशय विदारक आणि दयनीय असताना आंबेडकरांनी मागितलेले पुस्तक पुरवण्याचे काम वडिलांनी केले.आंबेडकरांनी जे पुस्तक मागितले ते मिळाले नाही असं कधी झालं नाही.त्यांच्या मुंबईत राहत असलेल्या बहिणीने त्यांना पुस्तक विकत घेण्यासाठी अनेक वेळा मदत केली.काहीवेळा त्यांनी भावाच्या वाचनाच्या व्यासंगासाठी आपले दागिने गहाण ठेवण्यासाठी आपल्या वडिलांकडे सुपूर्द

डॉ. आंबेडकर महापरिनिर्वाण दिन

Image
 ०६ डिसेंबर  भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो.०६ डिसेंबर १९५६ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे निधन झालं त्यामुळे त्या दिवसाला महापरिनिर्वाण दिन असं म्हटलं जात.              डॉ. आंबेडकर हे जगातील सर्वश्रेष्ठ वाचकांपैकी एक होते. इंग्लंडमध्ये शिकत असताना  ब्रिटिश म्युझियममध्ये वाचण्यासाठी ते जात असत. या ठिकाणी घडलेला सँडविच किस्सा सर्वांना परिचित आहे.काहीही न खाता दुपारी १२ तास वाचन करित असत.ज्ञानाची भूक  भागवण्यासाठी डॉ. आंबेडकर यांनी अशा प्रकारे पोटाची भूक मारून टाकली. भीमरावमध्ये वाचनाचा व्यासंग  निर्माण करून तो टिकवण्याचा पुरेपूर प्रयत्न वडील रामजी सकपाळ यांनी केला. घरची परिस्थिती अतिशय विदारक आणि दयनीय असताना आंबेडकरांनी मागितलेले पुस्तक पुरवण्याचे काम वडिलांनी केले.आंबेडकरांनी जे पुस्तक मागितले ते मिळाले नाही असं कधी झालं नाही.त्यांच्या मुंबईत राहत असलेल्या बहिणीने त्यांना पुस्तक विकत घेण्यासाठी अनेक वेळा मदत केली.काहीवेळा त्यांनी भावाच्या वाचनाच्या व्यासंगासाठी आपले दागिने गहाण ठेवण्यासाठी आपल्या वडिलांकडे सुपूर्द केल