डॉ. आंबेडकर महापरिनिर्वाण दिन



 ०६ डिसेंबर  भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो.०६ डिसेंबर १९५६ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे निधन झालं त्यामुळे त्या दिवसाला महापरिनिर्वाण दिन असं म्हटलं जात.

             डॉ. आंबेडकर हे जगातील सर्वश्रेष्ठ वाचकांपैकी एक होते. इंग्लंडमध्ये शिकत असताना  ब्रिटिश म्युझियममध्ये वाचण्यासाठी ते जात असत. या ठिकाणी घडलेला सँडविच किस्सा सर्वांना परिचित आहे.काहीही न खाता दुपारी १२ तास वाचन करित असत.ज्ञानाची भूक  भागवण्यासाठी डॉ. आंबेडकर यांनी अशा प्रकारे पोटाची भूक मारून टाकली. भीमरावमध्ये वाचनाचा व्यासंग  निर्माण करून तो टिकवण्याचा पुरेपूर प्रयत्न वडील रामजी सकपाळ यांनी केला. घरची परिस्थिती अतिशय विदारक आणि दयनीय असताना आंबेडकरांनी मागितलेले पुस्तक पुरवण्याचे काम वडिलांनी केले.आंबेडकरांनी जे पुस्तक मागितले ते मिळाले नाही असं कधी झालं नाही.त्यांच्या मुंबईत राहत असलेल्या बहिणीने त्यांना पुस्तक विकत घेण्यासाठी अनेक वेळा मदत केली.काहीवेळा त्यांनी भावाच्या वाचनाच्या व्यासंगासाठी आपले दागिने गहाण ठेवण्यासाठी आपल्या वडिलांकडे सुपूर्द केले. दोन बहिणी आणि वडील सर्वप्रकारे मदत करून पुस्तकाचा हटट पूर्ण करत.                                                                                            दहावीत पहिला  नंबर आला म्हणून त्यावेळी केळुसकर नावाच्या गुरुजींनी त्यांना गौतम बुद्धांची चरित्र भेट दिले.त्यावेळी मुंबईत असणारे भीमराव चरणी रोडवरील बागेत जाऊन पुस्तके वाचत असत. केळुस्कर गुरुजी संध्याकाळी तिथे फेरफटका मारण्यासाठी येत. त्यांना वाचनात गुंग असणारा भिमराव पाहून  विलक्षण कौतुक वाटे.असा हा वाचन व्यासंग आयुष्यभर जोपासला.                  दादरच्या हिंदू कॉलनीत राजगृह हे दुमजली घर बाबासाहेबांनी बांधून घेतले होते. राजगृह या घरात खालच्या मजल्यावर माणसे वरचा संपूर्ण मजला पुस्तकांसाठी राखीव होता. आचार्य अत्रे राजगृह या घराविषयी त्यांच्या नियतकालिकात लिहतात, आंबेडकर घरात नव्हे तर ग्रंथालयात राहतात. पुस्तकांच्या गराड्यात राहणारा डॉ.आंबेडकरांसारखा  पुस्तकवेडा माणूस  हिंदुस्थानात शोधून सापडणार नाही .                                          भारताला अधिक राजकीय अधिकार देण्याच्या संदर्भात विचारविर्माश करण्यासाठी इंग्लंडचे प्रधानमंत्री यांनी एक आयोग नियुक्त करण्याची घोषणा केली. या सात सदस्याच्या समितीमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची सदस्य म्हणून ०५ ऑगस्ट १९२८ ला मुंबई विधिमंडळातून निवड झाली. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा अर्थशास्त्र आणि कायदा या विषयाचा सखोल व सूक्ष्म अभ्यास होता. त्यांनी राजकारणावर काही पुस्तक वाचली होती.डॉ.बाबासाहेबाना जाणीव झाली की, आता भारतीय राजकारणात संविधानाचा विषय फार मोठ्या प्रमाणात चर्चेत येणार  अशा वेळी मौन धारण करणे धोक्याचे आहे. बाबासाहेबांनी ०६ ऑगस्ट आणि ०७ ऑगस्टला सआपल्या काही मित्राकडून ४०० रुपये उधार घेतले.०८ ऑगस्टला तारापूरवाला बुकसेलच्या दुकानातून ८५० रुपयाची संविधानाशी संबंधित काही पुस्तके विकत घेतली. ४५० रुपयांची उधारी ठेवली.०९ऑगस्ट पासून सकाळी आपल्या कार्यालयाच्या दरवाजाला बाहेरून कुलूप लावून  डॉ. बाबासाहेब आंबेडकर सतत दोन आठवडे व १५ ते २० ग्रंथांचा अभ्यास केला.संविधानाच्या अभ्यासाची सुरुवात अशा प्रकारे केली. अनेक नवीन पुस्तक खरेदी केली पुढे या दुकानाची  उधारी इतकी झाली की त्यांना उधारीचे पैसे भरण्यासाठी १९३६ मध्ये चारमिनार हे घर अक्षरशः विकावे लागले.

                      फिरोज शहा मेहता यांचे स्मारक पुतळा उभारून मुंबई येथे करणार असल्याचे अमेरिकेत असलेल्या आंबेडकरांना कळवले.तेव्हा त्यांनी हॉल  अमेरिकेतून पत्र लिहून सार्वजनिक ग्रंथालय उभारून फिरोज शहा मेहता यांचे स्मारक करावा असं सुचवलं होतं. १७ मार्च १९१६ ला बॉम्बे क्राँनिकल वृत्तपत्रास पत्र लिहिले होते.समाजात बौद्धिक आणि सामाजिक उन्नती करता ग्रंथालयाची आवश्यकता या पत्रातून त्यांनी मांडली होती.अमेरिकेत असताना त्यांनी ग्रंथांच प्रचंड वाचन केले. या वाचनातून जो थोडा वेळ त्यांना मिळायचा त्यावेळी ते रस्त्यावरून फिरून  ग्रंथ गोळा करायचे. असे त्यांनी २००० ग्रंथ अमेरिकेतून आणले होते. आंबेडकरांचा वाचन व्यासंग आणि ग्रंथप्रेम  आपण या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने सुरु करूया. 






Comments

Popular posts from this blog

अण्णा भाऊ साठे जयंती

महात्मा बसवेश्वर Work is Worship

शाहू महाराज - आरक्षणाची नीती