Posts

Showing posts from August, 2023

चांद्रयान - 3

 इस्रो.. बेस्ट लक 🙂❤️ आज संध्याकाळी 5:45 पासून 18 मिनिटांचा थरार आपल्याला अनुभवायचा आहे. त्या 18 मिनीटातले अत्यंत कठीण टप्पे जे तुम्ही लाईव्ह बघाल ते पुढील प्रमाणे .. 5:47 मिनिटांनी ही प्रक्रिया चालू होईल. अत्यंत क्लिष्ट गोष्टी किंवा algorithm न पाहता सोप्या भाषेत उद्या जे होणार आहे ते समजून घेऊ. वरील तक्ता ज्यांना समजेल त्यांना हे वाचण्याची गरज नाही.  1.  *रफ ब्रेकिंग फेज* :*  25x134 km कक्षेत फिरणारे चांद्रयान जेव्हा 30 km उंचीवर असेल तेव्हापासून त्याचा प्रचंड  Horizontal वेग 1.68km/sec वरून almost 0.2km/sec इतका  कमी करण्यात येईल. चांद्रयानावरील 12 पैकी 4 इंजिन  800 न्यूटनचा thurst यासाठी वापरतील. ह्या मध्ये यान 30 km उंची वरून  7.42 km उंचीवर येईल. आणि त्याच वेळी लँडिंग साईट कडे 713.5 km सरकेल. साधारण 690 सेकंदाची ही फेज असेल .  2. *Atitude Holding फेज* "Atitude" not "Altitude" .. जेव्हा यान 7.42km उंचीवर येईल तेव्हा ही 10 सेकंदाची फेज असेल. यात पहिल्यांदा Hotizontal Lander हा Vertical position मध्ये आणण्यात येईल. यात यान 3.48 km सरकेल आणि त्याची उंची चंद्राच्य

Reading Therapy

Image
 12 ऑगस्ट हा डॉ. एस .आर. रंगनाथन यांचा जन्मदिवस ग्रंथपाल दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून ग्रंथालय विभाग, हिंदी विभाग आणि मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वाचन चळवळीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी  Reading Therapy एक अभिनव उपक्रम सुरू करीत आहोत या उपक्रमाचे उद्घाटन शुक्रवार दि. 11 ऑगस्ट रोजी करण्यात येत आहे.

अण्णा भाऊ साठे जयंती

 अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन आणि सर्वांना खूप खुप शुभेच्छा 💙 कामगार,कष्टकरी,शेतकरी,श्रमिक,मजूर,दलित/वंचित आणि दिनदुबळ्यांचे प्रश्न आणि कष्टमय जीवन आपल्या साहित्यातून मांडणारे अण्णाभाऊ साठे हे अनेक बाबतीत महान ठरतात.फक्त दीड दिवसाची शाळा शिकलेल्या अण्णांभाऊंनी ३५ कादंबऱ्या,१३ कथासंग्रह,८ पटकथा,१ प्रवासवर्णन,३ नाटके,१० पोवाडे व १४ लोकनाट्ये आणि १२ उपहासात्मक लेख एवढं भरमसाठ लिखाण करून समाजाला आरसा दाखवण्याचं काम केलंय..अण्णाभाऊ साठे यांचे जीवन एकंदरीत खूपच संघर्षमय/कष्टमय होते.संघर्षाचे दुसरे नावच अण्णाभाऊ साठे होते असे आपण म्हणू शकतो कारण त्यांच्या वाटेला आलेला संघर्ष हा शब्दांत मांडता येण्यासारखा नाही अथवा दुःख जणू त्यांच्या पाचवीलाच पुजलेला होता..दुःखाची सुद्धा एक मर्यादा असते पण अण्णाभाऊच्या आयुष्यात ही म्हण अजिबात लागू होत नाही जन्मापासून तर मृत्यूपर्यंत त्यांच्या मागे दुःख हे लागलेलेच होते.संघर्ष हेच त्यांच्या जीवनाचे सूत्र होते.त्यांचे एकंदरीत जीवन हे जीवन नसून मरणच अधिक होते..त्यांचे दुःख हे त्यांच्या मृत्यूसोबतच संपले !! आयुष्यात कधीही संघर्षाची जाणीव करून