Posts

Showing posts from April, 2023

लोकमत

Image
 

लोकमत

Image
 

Exam Notice

Image
 Exam form notice

प्रकाशवाटा - प्रकाश आमटे

 ग्रंथ परिचय  डॉ. प्रकाश आमटे यांचे 'प्रकाशवाटा' 'प्रकाशवाटा' हे डॉ. प्रकाश आमटे यांचे गाजलेले पुस्तक आहे. चोहीकडे दिशा अंधारल्या असतांना वाट दावणारे आहे. प्रेरणा देणारे आहे जगण्याच्या दिशा बदलवणारे आहे. हे पुस्तक  कोणालाही व्यक्तिगत आयुष्यात रममान न होता स्व-परीघापलीकडे बघायला लावणारे आहे. या पुस्तकामुळे  महाराष्ट्रात अनेकांना झपाटले आहे. समाजकार्याचे छोटे मोठे प्रयोग ठिकठिकाणी उभे राहत आहेत. हेच या पुस्तकाचे मोठे यश आहे. जाणून घेऊया आज 'पुस्तकांचे जग' मध्ये 'प्रकाशवाटा' या पुस्तकाविषयी.. बाबा आमटे व्यवसायाने वकील होते. 1942 साली महात्मा गांधीजींचे विचार ऐकून ते बदलले. त्यांनी वकीली व्यवसाय सोडून कुष्ठरोग्यांसाठी काम करायला सुरुवात केली. कुष्ठरोग्यांची सेवा म्हणजे त्याकाळी साधी गोष्ट नव्हती.  कारण कुष्ठरोग्यांना समाज टाकून देत होता. नाकारत होता. तिरस्कार करत होता. या रोगाबद्दल लोकांच्या मनात गैरसमज होते. बरेचसे अजूनही आहेत.       अशा टाकून दिलेल्या आणि नाकारलेल्या लोकांसाठी बाबा आमटे यांनी आपले आयुष्य खर्च केले. कुष्ठरोग्यांची सेवा एवढेच त्यांच्या कामाच

ग्रंथ प्रेम

Image
 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर १३२ वी जयंती

 *डॉ. बाबासाहेब आंबेडकर : आधुनिक भारताचे प्रमुख शिल्पकार* - प्रा. हरी नरके   देशाचे उर्जामंत्री, पाटबंधारे मंत्री, सार्वजनिक बांधकाम खात्याचे व विमान वाहतूक खात्याचे मंत्री असलेले बाबासाहेब देशाला 'उर्जा साक्षरता व जल साक्षरतेची सर्वाधिक गरज आहे' असं १९४२ साली सांगत होते. देशातली पहिली १५ धरणं बांधणारे, देशातल्या मोठ्या नद्या एकमेकीला जोडून दुष्काळ हटवण्याची योजना करणारे, सारा देश हायवेंनी जोडणारे, भारताला विकास हवाय, बिजली, सडक, पाणी म्हणजेच विकास हे सूत्र ते मांडत होते. अशा महापुरुषाला फक्त अनुसूचित जातींपुरते  सीमित करणारे आपण करंटेच नाही काय? शंभर वर्षांपूर्वी १९१८ साली त्यांनी शेतकर्‍यांच्या व्यथा, त्यांच्यापुढच्या शेतीसमस्या मांडणारं पुस्तक लिहिलं. 'स्मॉल होल्डिंग्ज इन इंडिया ॲंड देअर रेमेडिज' ( Small holdings in India and their remedies ). त्यांचे हे पुस्तक ना भक्तांना माहिती आहे, ना विरोधकांना. शेतीवरचा बोजा कमी करा. एकच मूल शेतीत ठेवा. बाकिच्यांना तिथून बाहेर काढा नि उद्योग, व्यापार, शिक्षण, सेवा क्षेत्रात घाला. शेतीमालाला योग्य बाजारभाव, सिंचन आणि शेतीला उद्यो