Posts

Showing posts from January, 2023

Padma Awards 2023

Image
 Palam Kalyanasundaram Librarian selected for Padmasri Award for 2023 Social Work  Below see the list 1) Padma Vibhushan - 06  2) Padma Bhushan - 09 3)Padma Shri - 91 https://in.docworkspace.com/d/sIG7848coq6TIngY?sa=00&st=0t

मृत्यू पाहिलेली माणसं _ पुस्तक परिचय

 मृत्यू पाहिलेली माणसं 💙 म्हटलं तर या साध्या कहाण्या आहेत. संकटातून माणसं कशी वाचली याच्या. म्हटलं तर ही माणसंही अगदी तुमच्या-माझ्यासारखी सामान्य आहेत; पण त्यांच्यावर परिस्थितीच अशी ओढवली की त्यांना असामान्यत्व दाखवण्यावाचून इलाज राहिला नाही. या कहाण्या वाचून झाल्यावर त्यातल्या प्रत्येक माणसातलं काही तरी माझ्यामध्ये कायमचं राहून गेलं. मृत्यू पाहिलेली ही माणसं जगण्याबद्दल, स्वतःच्या क्षमता ताणण्याबद्दल खूप काही सांगून गेली. वेळ आलीच तर माणूस काहीच्या काही करू शकतो, असा विश्वास देऊन गेली. ~गौरी कानेटकर 🖤 2023 साली वाचलेलं पहिलं वहिलं पुस्तक 'गौरी कानेटकर'लिखित 'मृत्यू पाहिलेली माणसं" हे ठरलं.एकाच बैठकीत वाचून पूर्ण केलेलं हे पुस्तक फारच आवडलं. यातील प्रत्येक कहाणीने मला खूप काही शिकवलं.सुन्न,थक्क करून सोडणाऱ्या आणि अक्षरशः रडवणाऱ्या यातील प्रत्येक कथेने मला प्रेरणा देण्याचं काम केलं.या पुस्तकातील प्रत्येक कहाणीमधील प्रत्येक खरा नायक/नायिका मला खूप जवळचा वाटला.मी त्यांच्याशी एकरूप झालो,त्यांची काळजी करू लागलो.हे सर्वकाही पुर्वीच घडून गेलेलं आहे, हे ठाऊक असताना सुद्धा मल

पत्रकार दिन ०६ जानेवारी

Image
  बाळशास्त्री गंगाधर जांभेकर जन्म  : ०६ जानेवारी १८१२                                               मृत्यु  : १८ मे १८४६                 पहिले वृत्तपत्र 'दर्पण'      :  ६ जानेवारी १८३२       महाराष्ट्र शासनाने पत्रकार दिन हा ०६ जानेवारी रोजी बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनानिमित्त घोषित केला. महाराष्ट्र राज्यात हा दिवस साजरा केला जातो .बाळशास्त्री जांभेकर मराठी भाषेतील अध्यपत्रकार आहेत. त्यांनी मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र   दर्पण ०६जानेवारी १८३२ रोजी सुरू केले होते .जुलै १८४० मध्ये दर्पण चा शेवटचा अंक प्रकाशित झाला दर्पण ला सुरुवातीला मोठ्या संख्येने वर्गणीदार मिळाले नाहीत मात्र ही संकल्पना तशी रुचली तसेच त्यातील विचार ही रुजले आणि प्रतिसाद वाढत गेला. ब्रिटिश काळामध्ये वृत्तपत्र चालवणे आणि त्याला वाचक मिळवणे हे मोठे कठीण काम होते मात्र याही काळात कुठल्याही नफा तत्वाचे तत्व न स्वीकारता या काळामध्ये सुधारक आणि आपले वृत्तपत्र चालवले त्यामध्ये बाळशास्त्री जांभेकर यांचे दर्पण हे वृत्तपत्र अग्रणी होते. पहिले वृत्तपत्र दर्पण: ६ जानेवारी १८३२

सावित्रीबाई फुले जयंती (बालिका दिन)

Image
 महाविद्यालयामध्ये अंतर्गत तक्रार समिती आणि मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त बालिका दिनाचे आयोजन केले होते. प्रतिमेचे पूजन प्रा. एस. ए. गिरी आणि प्रा. एस व्ही इंगळे यांच्या हस्ते करण्यात आले .     प्रमुख व्याख्याते  डॉ. एस. बी. चौगुले यांनी सावित्रीबाईंचा इतिहास आणि बालिका दिनाचे महत्त्व याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले या  कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. एस. एम. वाळके आणि आभार प्रा.  सौ.पी के. कांबळे यांनी केले. या कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थी आणि प्राध्यापक उपस्थित होते.