पत्रकार दिन ०६ जानेवारी
बाळशास्त्री गंगाधर जांभेकर जन्म : ०६ जानेवारी १८१२
मृत्यु : १८ मे १८४६
पहिले वृत्तपत्र 'दर्पण' : ६ जानेवारी १८३२
महाराष्ट्र शासनाने पत्रकार दिन हा ०६ जानेवारी रोजी बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनानिमित्त घोषित केला. महाराष्ट्र राज्यात हा दिवस साजरा केला जातो .बाळशास्त्री जांभेकर मराठी भाषेतील अध्यपत्रकार आहेत. त्यांनी मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र दर्पण ०६जानेवारी १८३२ रोजी सुरू केले होते .जुलै १८४० मध्ये दर्पण चा शेवटचा अंक प्रकाशित झाला दर्पण ला सुरुवातीला मोठ्या संख्येने वर्गणीदार मिळाले नाहीत मात्र ही संकल्पना तशी रुचली तसेच त्यातील विचार ही रुजले आणि प्रतिसाद वाढत गेला. ब्रिटिश काळामध्ये वृत्तपत्र चालवणे आणि त्याला वाचक मिळवणे हे मोठे कठीण काम होते मात्र याही काळात कुठल्याही नफा तत्वाचे तत्व न स्वीकारता या काळामध्ये सुधारक आणि आपले वृत्तपत्र चालवले त्यामध्ये बाळशास्त्री जांभेकर यांचे दर्पण हे वृत्तपत्र अग्रणी होते.
पहिले वृत्तपत्र दर्पण: ६ जानेवारी १८३२
Comments
Post a Comment