मृत्यू पाहिलेली माणसं _ पुस्तक परिचय

 मृत्यू पाहिलेली माणसं 💙


म्हटलं तर या साध्या कहाण्या आहेत. संकटातून माणसं कशी वाचली याच्या. म्हटलं तर ही माणसंही अगदी तुमच्या-माझ्यासारखी सामान्य आहेत; पण त्यांच्यावर परिस्थितीच अशी ओढवली की त्यांना असामान्यत्व दाखवण्यावाचून इलाज राहिला नाही. या कहाण्या वाचून झाल्यावर त्यातल्या प्रत्येक माणसातलं काही तरी माझ्यामध्ये कायमचं राहून गेलं. मृत्यू पाहिलेली ही माणसं जगण्याबद्दल, स्वतःच्या क्षमता ताणण्याबद्दल खूप काही सांगून गेली. वेळ आलीच तर माणूस काहीच्या काही करू शकतो, असा विश्वास देऊन गेली.


~गौरी कानेटकर 🖤


2023 साली वाचलेलं पहिलं वहिलं पुस्तक 'गौरी कानेटकर'लिखित 'मृत्यू पाहिलेली माणसं" हे ठरलं.एकाच बैठकीत वाचून पूर्ण केलेलं हे पुस्तक फारच आवडलं. यातील प्रत्येक कहाणीने मला खूप काही शिकवलं.सुन्न,थक्क करून सोडणाऱ्या आणि अक्षरशः रडवणाऱ्या यातील प्रत्येक कथेने मला प्रेरणा देण्याचं काम केलं.या पुस्तकातील प्रत्येक कहाणीमधील प्रत्येक खरा नायक/नायिका मला खूप जवळचा वाटला.मी त्यांच्याशी एकरूप झालो,त्यांची काळजी करू लागलो.हे सर्वकाही पुर्वीच घडून गेलेलं आहे, हे ठाऊक असताना सुद्धा मला यातील नायकाची प्रकरणाच्या शेवटपर्यंत काळजी वाटत होती,एवढं मी यामध्ये गुंतून गेलो होतो.इच्छाशक्ती,सहनशक्ती इत्यादी शब्दांचा अर्थ मला या पुस्तकातील पात्राच्या कहाणीतून गवसला एवढं नक्की.


मृत्यूच्या दारातून परतलेल्या व्यक्तींच्या या एकूण 9 थरारक आणि तितक्याच प्रेरणादायी कहाण्या आपल्यातल्या प्रत्येकाला 'हरू नकोस, हा शेवट नाही', असं सांगून जातात.यातील प्रत्येक कहाणीतून आपल्याला आजच्या जगातील खऱ्या नायक/नायिकेचं परिचय होतो.यामध्ये अमेझॉनच्या जंगलात २१ दिवस भटकणारा योसी घिन्सबर्ग, युगांडामध्ये नरसंहाराची साक्षीदार असलेली व तीन महिने एका बाथरूम मध्ये लपून काढणारी इमॅक्युली इलिबागिझा, जगातील सर्वात मोठी पर्वतरांग असणाऱ्या अँडीज पर्वताततून सुखरूप बाहेर येणारे नँडो पँरेडो आणि रॉबर्ट कनेसा व इतर, एका निर्मनुष्य जंगलात दाट धुक्यामध्ये हरवून देखील कष्टाने परतणारा 12 वर्षाचा मूलगा डॉन फेंडलर, एका विमान अपघातात जंगलात येऊन पडलेली जुलियन कोपेक, १२७ तास दगडाखाली हात अडकलेला व आपला हात कापून बाहेर आलेला अँरन रॅल्स्टन, समुद्राच्या लाटांवर तब्बल १५ महिने जिवंत राहिलेला जोस सॅल्वर अल्वरेंगा, निर्जन वाळवंटात हरवलेला रिकी मेगी आणि एका बर्फाळ बेटावर ५७℃ तापमानात तग धरून राहिलेली अँडा ब्लॅकजॅक इत्यादी खरे हिरोज आपल्याला या पुस्तकातून कळतात.


लेखिका आपल्या मनोगतात म्हणतात :-


माणसामधली स्वतःचा जीव वाचवण्याची आदिम प्रेरणा कशी काम करते हे त्यातून थेट आपल्यातल्या आदिम भावनेला भिडत होतं. जीवन-मरणाच्या हिंदोळ्यावर असताना माणूस नावाच्या सजीवाचं काय होतं त्याचा आरसाच होता तो. एरवी माणसांचे अपघात होतात, त्यांना हार्ट अॅटॅक येतात किंवा आजारी पडून ती अंथरुणाला खिळून राहतात तेव्हा त्यांना जगवण्यासाठी इतर माणसं-बाह्य साधनं उपलब्ध असतात. पण इथे मात्र मृत्यूसोबतची त्यांची लढाई किंवा मृत्यूसोबतचा प्रवास हा फक्त इच्छाशक्तीच्या बळावरच पार पडला होता. या गोष्टी वाचणं हा मन ढवळून काढणारा अनुभव होता.💙


लेखिका म्हणतात ठीक त्याचं प्रमाणे खरोखरच हा एक विलक्षण आणि आगळावेगळा अनुभव ठरतो.या गोष्टी वाचतांना वाचक अंतमूर्ख होतो व आपल्या स्वतःला त्या व्यक्तींच्या जागी ठेऊन एकवेळ विचार नक्कीच करतो.त्या माणसांसारखी परिस्थिती आपल्यावर उद्धभवली असली असती तर आपण नेमकं काय केलं असतं ?आपण खरंच त्या परिस्थितीत जिवंत राहू शकलो असतो का ? इत्यादी प्रश्नांची उत्तरे शोधू लागतो.


ज्या पुस्तकांचा संदर्भ घेऊन हे पुस्तकं लिहल्या गेलं आहे त्या 9 इंग्रजी पुस्तकांची यादी..


1) Lost in the Jungle: A Harrowing True Story of Adventure and Survival ~ Yossi Ghinsberg


2)Left to Tell: Discovering God Amidst the Rwandan Holocaust ~Immaculee Ilibagiza


3)Alive: The Story of the Andes Survivors ~Piers Paul


4)Lost on a Mountain in Maine ~Joseph B. Egan


5)When I Fell From the Sky ~

Juliane Koepcke


6)Between a Rock and a Hard Place ~Aron Ralston


7)438 Days: An Extraordinary True Story of Survival at Sea ~Jonathan Franklin


8)Left for Dead: How I Survived 71 Days in the Outback ~Ricky Megee


9)Ada BlackJack: A True Story of Survival in the Arctic ~Jennifer Niven


Moin Humanist🌿

मी वाचलेली पुस्तके ♥️

__________________________________________


टीप :- हे पुस्तक तुम्हाला वाचायचं असल्यास आपल्या हक्काच्या We Read वाचन चळवळीतून सवलतीत घरपोच कुठल्याही पोस्ट खर्चाशिवाय भारतभरात कोठेही मागवू शकता...💙

https://wa.me/7066495828

Comments

Popular posts from this blog

Syllabus B.SC.I.(2024-2025)

Syllabus BCA II (2025-26)