कथा - तिचा समुद्र - डॉ. सूरज चौगुले
"तिचा समुद्र"
डॉ. सूरज चौगुले
आज माझी चिमुरडी पोर मला विचारू लागली," बाबा रत्न, माणिक, मोती कुठे सापडतात?" मी म्हटलं," खोल समुद्रात सापडतात ते. समुद्र तळाला, करावं लागत त्याला समुद्रमंथन, धुंडाळावी लागते सारी रेती- माती. मग लागतात हाती कधी तरी पण त्याहीआधी सापडतील तुला विद्रूप आकाराची शिल्प आणि पचवाव लागेल कदाचित 'हलाहल' ही तुला जागोजागी सांडलेलं आणि अनेकांनी उष्ट केलल." तिने विचारलं," कुठे असतो समुद्र ?" मी म्हटलं," तो ही तुलाच शोधावा लागेल, अन्यथा तूच बनव तुझा समुद्र.अनेकांनी आपापले बनविले आहेत समुद्र अन डुबक्या मारत शोधताहेत त्याची अथांगता! पण अजून झर्याचाही तळ गाठू शकले नाही ते, तरीही त्यांना आनंद असतो समुद्रात शु..शु केल्याचा, निलाजरेपणाने वाट बघत बसतात भरतीची. तेव्हा तु ही शोध तुझा समुद्र अथवा बनव तुझ्या इवल्याश्या हातांनी, त्या साठी हवं तर आभाळाची निळाई घे ,आसमंताची हिरवाई घे आणि हो हिरवा आला तर भगवा पण घे कारण इथं रंगा रंगांना धर्मांनी विभागून घेतल आहे. पण एक लक्षात ठेव, हेच रंग माणसांना बेरंग करीत आहेत, तेव्हा तुझ्या बापजाद्यांनी कोणता रंग पोसला हे न बघता तुझ्या सोयीचा रंग घे. पण रंगाची पुताई ही वरवरची असून पांढरा कापूस शाश्वत आहे हे ध्यानी ठेव आणि मग तुझ्या समुद्रात उतर".
दुपारी तिने एका निळ्या प्लास्टिकच्या टफ मध्ये काठोकाठ पाणी भरलं, माती वाळू आणि हाताला येईल ते सर्वकाही बुडणार अन तरंगनार, तिच्या हातामध्ये सापडेल ते ते त्या टफ मध्ये टाकून दिलं. समुद्र खारा म्हणून पाण्याचा गोडवा मारत तिने मूठभर मीठ टाकलं आणि तिच्या डोळ्या मध्येच साकारला तिने आपला समुद्र. प्लस्टिकच्या टपा बाहेरचे तिचे क्षितिज आता दूर गेलं आणि ती मनसोक्त किवचू लागली आपल्या समुद्राला. त्यामध्ये उठणाऱ्या लाटांना अनुभवू लागली. तिचे ईवलेशे हात आता शोधू लागले समुद्रतळाला पण अंत लागत नव्हता तिच्या हातांना. शेकडो वर्षाचा साचलेला गाळ तिला आत पोहोचुच देत नव्हता.समता स्वातंत्र्य समानता याची टरफलं वर दिसली तिला पण तरीही परंपरेच्या मनुच्या जटेत तिचा हात पुन्हा पुन्हा अडकत होता आणि पुन्हा पुन्हा ती सोडवत होती आपल्या चिमुरड्या हातांनी मनूच्या जटा. अचानक न जन्मलेल एक स्त्रीभ्रून तिच्या हाताला लागलं अन ती मोठ्याने किंकाळली पण ती किंकाळी कोणाच्याच कानी पडली नाही फक्त आभास आणि एक रत्न न जन्माला आलेलं पुन्हा एका शिंपल्यात स्थिरावलं, तिने तो शिंपला पुन्हा हाताने बाजूला केला तर अचानक तिला दिसला एक राजकुमार घोड्यावरून येताना, गाळाच्या मातीची जणू आपल्या तळहातावर कुणी मेहंदी काढल्याचा आभास तिला झाला आणि मग ती हरवली सोनेरी स्वप्नात तो राजकुमार, ती राजकुमारी कथेतील परी आली आणि तिला परी बनवून गेली, मग ती आसमंतात विहरू लागली पण एक हात समुद्राच्या तळाशी. अचानक तो राजकुमार आपला बेफाम घोडा उधळत निघून गेला आणि त्याच्या घोड्यांच्या टापा मधून उडालेल्या ज्वालेचा भडका तिच्याभोवती पसरला आणि मग ती दुसऱ्यांदा किंकाळी. खरंतर अशा तिच्या अनंत किंकाळ्या त्या तिच्या समुद्राच्या पात्रात अपवित्राना पवित्र करुन स्वत: विटाळलेल्या नद्या प्रमाणे मिसळत होत्या अन तिच्या समुद्राला भरती ओहोटी येत होती.खर तर प्रत्येक नदी एक विचाराच रत्न होत हे तिला मला सांगायलाच हव होत.या विचाराचाच पुढे प्रवाह झाला होता.तो प्रवाह होता गीता सांगणारया कृष्णाचा.गौतमाचा ,महविराचा,मोहम्मदाचा,येशू अन जोसेफचा पण पुढे त्यांच्याच अनुयायानी तो प्रवाह गाळउन टाकला. खरंतर नदी प्रवाहातून तिने उलटे पोहत त्या नदी मुखापर्यंत जायला हवं आणि मग नदी मुखावर सापडतील तिला रत्ने, सापडेल तिला कृष्ण, बुद्ध,महावीर आणि मोहम्मद ,जीजस ,जोसेफ पण ती पचवायची ताकद हवी तिच्याकडे. खरं तर माझंच चुकलं, तिला समुद्राच नाव उगीचच सांगितलं मी. पण किमान तिच्या बापाने तिला शोधायची मुभा तरी दिली, माझ्या बापाला जेव्हा मी मुभा मागितली तेव्हा तो म्हणाला," बेट्या भाकरी शोध आधी, रत्नांनी पोट नाही भरत." परंपरेच्या नद्यांना अडवणं आता तिच्या हातात नव्हतं पण प्रत्येक नदी बरोबर एक एक किंकाळी तिच्या समुद्रात मिसळत होती अन तिलाही त्या जीवघेण्या किंकाळ्याची सवय झाली होती. कदाचित त्यामुळेच आता तिच्या समुद्राला देवपण प्राप्त होणार होतं.
मी लांबून एकसारखे हे सारं पाहत होतो तिच्या हातांना गवसत होतं त्यावरून तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत होते. परंपरेच्या चिखलात लोकलज्जेसाठी पोटच्या गोळ्याला पाण्यात सोडणारी कुंती तर डोळ्यावर अंधत्वाची पट्टी बांधणारी गांधारी,भर सभेत नागवली गेलेली द्रौपदी तर रावणाकडून छळलेलीअन रामा कडून त्यागलेली सीता तिच्या छोट्याशा बोटांना स्पर्शून गेल्या असाव्यात. अशातच आत्ता पर्यंत माझ्या कडे बाप म्हणून पाहताना अचानक तिच्या नजरेत मला अविश्वास जाणवू लागला, तिच माझ्याकडे शंकेने बघणं यावरच मी ओळखलं कदाचित तिच्या हाती "यायाती" आणि "परशुराम" लागला असेल, मी तिला नजरेनेच धीर दिला. तिला हवी होती जिजाऊ,सावित्री यांची रत्न माणिक मोती पण गवसत होती होती समुद्र तळावरील खोल जखमा लुटलेल्या,भोगलेल्या अन अर्ध्यातच खुडलेल्या अनेक कळ्यांची प्रेत. ज्यामधून परंपरेची दुर्गंधी वाहत होती. ती निराश झाली गढुळ झालेल्या पाण्याला किती तरी वेळ निरखू लागली. सारी निराशाच तिच्या चेहऱ्यावर गडद झाली. मला आनंद झाला कारण आता पुन्हा ती माणिक मोती यांचा आग्रह धरणार नव्हती. कदाचित ती समुद्राला विसरून जाईल आणि आपल्या खेळातून मुक्त होईल. आपल्या गढुळ झालेल्या समुद्राकडे ती बराच वेळ पाहत बसली. तिने पुन्हा काहीतरी विचार केला आणि मग पुढच्या क्षणी तिचा सारा समुद्र तिने पालथा केला. अचानक समुद्राला भरती यावी, धरणाचा बांध फुटावा तसा सरा निचरा तिच्या पायात पसरला. गढूळ पाण्याबरोबरच परंपरेचा सारा चिखल, माती तिने हाताने खरडून काढली. मला वाटलं कदाचित हा समुद्र बनवण्याचा, माणिक मोती शोधण्याचा तिचा खेळ थांबला असावा परंतु पुन्हा माझी पापणी लवते न लवते तोपर्यंत पुन्हा तो निळा प्लास्टिकचा टप तिने नळाखाली लावला, आता पुन्हा ती आपला नवीन समुद्र तयार करणार होती पुन्हा तिला तीच नविन क्षितिज निश्चित करायचं होतं पण या वेळी ती नळाच्या श्रोता कडे नजर ठेऊन होती.कदचित ती नदीतून उलट पोहत जाणार असावी.पण नव्या समुद्रासाठी एकदा जुना गढूळ समुद्रही तिच्या हाताखालून ढवळून निघणं गरजेचं होतं.
डॉ सूरज चौगुले,
इस्लामपूर9371456928

Comments
Post a Comment