कथा - सुपरवुमन - डॉ. मृदुला बेळे
" सुपरवुमन "
आपल्या सुपरवुमनच्या प्रतिमेत बायका स्वत:च इतक्या अडकतात, की माणूस म्हणून जगायलाच विसरतात.काटकोन त्रिकोण’ या नाटकातलं एक वाक्य मला फार आवडतं. ‘लग्न झाल्यावर नव्या नवरीनं तेवढंच चांगलं वागावं जितकं आयुष्यभर वागायला जमेल’ किती खरं आहे हे!
कौतुक करून घेण्यासाठी माणूस एक-दोन दिवस जास्त कष्ट करू शकतो, स्वभाव नसला तरी गोड गोड वागू शकतो.
आयुष्यभर कसं वागणार असं? त्याचा ताण यायला लागतो. शरीरावरही. मनावरही.
शिवाय बाकीच्या जबाबदाऱ्या वाढतात, वय वाढतं, तशी तब्येत ढासळते (कारण तिच्याकडे लक्ष द्यायला वेळच झालेला नसतो).
स्वत:वर पैसे किंवा वेळ खर्च करणं हा गुन्हा आहे या समजातून आपण बायका कधी बाहेर येणार आहोत?
जो माणूस आधी स्वत:ला खुश ठेवतो तो आणि तोच दुसऱ्यालाही आनंदात ठेऊ शकतो हे आम्हाला कधी कळणार *‘सुपरवुमन’* या आपल्या पदवीचा त्याग करायला हवा. आपल्या इतरांनी केलेल्या कौतुकात रमण्यापेक्षा आपल्याला काय हवंय हे आधी समजून घ्यायला हवं.
शिवाय स्वत:ला आनंदी ठेवणं ही आपली जबाबदारी आहे हेही समजून घ्यायला हवं. आधी एक तर हे स्वत: समजून घ्यायला हवं आणि मग घरातल्या मंडळींना हे प्रेमानं पण ठामपणे समजावून सांगायला हवं.
आणि मग स्वत:ला रोज थोडातरी वेळ द्यायला हवा. त्या वेळात तिनं काहीही करावं. एखादा छंद जोपासावा, व्यायाम करावा, मैत्रिणींना भेटावं किंवा अगदी डोक्यावरून पांघरूण घेऊन ताणून द्यावी.
आपल्यापैकी कितीजणी नियमितपणे मैत्रिणींबरोबर वेळ घालवतात?
मध्यंतरी एक छान लेख वाचनात आला. *'ऑक्सिटोसीन'* हे बायकांमधलं *‘लव्ह हॉर्मोन’* आहे. ते स्त्रवलं की बायकांना मस्त वाटतं, त्या खुश असतात. आणि ते सर्वात जास्त कधी स्त्रवतं माहितीये? आपल्या मैत्रिणींच्या सहवासात. मुलाबाळांच्या किंवा प्रियकराच्या सहवासात नाही तर मैत्रिणींच्या सहवासात!
जीवलग मैत्रीणींना भेटून आल्यावर खूप वेळ आपल्याला छान वाटत राहातं, ते शरीरात स्त्रवलेल्या या 'ऑक्सिटोसीन'मुळे.
मग इतक्या साध्या गोष्टीनं आपल्याला छान वाटणार असेल आणि आपण खुश राहिल्यानं सगळं घर खुश राहाणार असेल तर असे छोटे छोटे आनंद का नाकारायचे आपण स्वत:ला?
माझं एक ऐकाल, आजपासून एक पण करा की, ‘मी सुपरवुमन बनायला जाणार नाही. माझ्यावर प्रेम करायला शिकेन. स्वत:ला खुश ठेवायला शिकेन. स्वत:ला वेळ देईन आणि त्याचा गिल्ट येऊ देणार नाही.’
चला, खुश राहूया! आणि कुसुमाग्रजांच्या कवितेत थोडा बदल करून म्हणूया,
प्रेम कुणावर करावं?
तर सगळ्यात आधी ‘स्वत:वर’ करावं!😊☝🏻
डॉ. मृदुला बेळे.

Comments
Post a Comment