२६ जानेवारी

 भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त आपणास सर्वांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.. 💐💐

उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला...

 नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडविला..

भारत भूमीच्या रक्षणासाठी आपल्या प्राणाची आहुती देणार्‍या सर्व वीर पराक्रमी जवानांना, हुतात्म्यांना सलाम..

🇮🇳🇮🇳 जय हिंद..जय भारत..वंदे मातरम 🇮🇳🇮🇳🙏🙏


आपणास माहितीसाठी..

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 🇮🇳

15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी मधील  मुख्य फरक ...                                   

15 ऑगस्टला पंतप्रधान यांच्या हस्ते  ध्वजारोहण केले जाते तर ...  

26 जानेवारीला राष्ट्रपती यांच्या हस्ते ध्वज फडकवला जातो . कारण देश 15 ऑगस्टला स्वतंत्र झाला तेंव्हा राष्ट्रपती पद अस्तित्वातच आलेलं नव्हतं.                     

******* ******                                                                      


15 ऑगस्टला झेंडा हा उघडलेल्या अवस्थेत दोरीने  वर चढवला जातो. त्याला ध्वजारोहण (flag hoiating) म्हणतात तर...

26 जानेवारीला झेंड्याची बंद घडी करून सरकफासाची दोरीची गाठ बांधून झेंडा अगोदरच वर नेलेला असतो. फक्त दोरी ओढून झेंडा फडकवला जातो. त्याला (flag unfurling)  म्हणतात. 

************   

15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झाल्यावर इंग्रजांचा झेंडा खाली उतरला व भारताचा झेंडा वर चढला. म्हणून त्याला *ध्वजारोहण* म्हणतात. तर...

26 जानेवारी 1950 ला भारताचा झेंडा तयार होताच पण स्वातंत्र्या नंतरही स्वतःची राज्यघटना अस्तित्वात येईपर्यंत अडीच वर्षे इंग्रजांच्या कायद्यानेच राज्य चालले. याचे प्रतीक म्हणून झेंडा बंद घडीत बांधून वर नेउन दोरी ओढीत वरच्या वर गाठ सुटून झेंडा हवेत मोकळा केला जातो, म्हणून त्याला झेंडा फडकवणे म्हणतात.     

***************    


15 ऑगस्टला लाल किल्ल्यावर ध्वजारोहण होते तर...

26 जानेवारीला राष्ट्रपती भवनासमोर राजपथावर झेंडा फडकवला जातो. 

आपण ज्या देशाचे नागरिक आहोत त्या देशाच्या इतिहासाबाबत काही महत्त्वाच्या गोष्टी माहीत असणे आवश्यक आहे जय हिंद जय भारत...

🙏🇳🇪🇳🇪🇳🇪🙏

Comments

Popular posts from this blog

Syllabus B.SC.I.(2024-2025)

Syllabus BCA II (2025-26)