अर्थसंकल्प


अर्थसंकल्पातील प्रमुख मुद्दे आणि घोषणा 
* केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज मंगळवारी अर्थसंकल्प सादर केला - त्यामध्ये देशातील जनतेसाठी कोणत्या महत्त्वाच्या सुविधा आणि योजनांची घोषणा करण्यात आली आहे 

🌾 *अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काय ?*

● देशात तेलबियांचे उत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणार, तसेच पिकांवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर करणार

● जलसिंचन योजनेच्या माध्यमातून 9 लाख हेक्टर जमीन पाण्याखाली येणार, त्यासाठी नवीन योजना राबविणार

● 1 कोटी 63 लाख शेतकऱ्यांकडून विक्रमी धान्य खरेदी केली जाणार, 2.37 लाख करोड रुपये MSP Value शेतकऱ्यांच्या खात्यात जाणार

● देशात प्रचंड प्रमाणावर तेलबिया आयात केल्या जाणार, तेलबियांचे उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न करणार, शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणार

● नैसर्गीक शेतीसाठी झिरो बजेट शेतीला प्रोत्साहन देऊन नियोजन करण्यासाठी योजना राबविणार तसेच नाबार्डच्या माध्यमातून स्टार्टअपना मदत करणार

● ग्रामीण विकासासाठी प्रयत्न करणार, कृषी आधारीत स्टार्टअपसाठी प्रोत्साहन देणार, युवकांना मदत करण्यासाठी नाबार्डच्या माध्यमातून भांडवल पुरवणार
*उद्योगासाठी काय ?*

● सौरऊर्जा निर्मितीसाठी 19,500 कोटी रुपयांची तरतूद, देशात सौरऊर्जेसाठी सौर पॅनेल आधारित ऊर्जा प्रकल्प विकसित करण्यावर भर

● तसेच इलेक्ट्रिक वाहनांसाठी नवीन चार्जिंग स्टेशन्स बसवण्यात येणार, बॅटरी अदलाबदली म्हणजेच बॅटरी स्वॅपिंग पॉलिसी लागू करणार

● सरकारकडून संरक्षण क्षेत्रात संशोधनासाठी 25 टक्के बजेटची तरतूद केली जाणार

● पोस्ट ऑफिसमध्ये एटीएम सेवा सुरू होणार

● पुढील आर्थिक वर्षात 25 हजार किमी राष्ट्रीय महामार्ग बनवले जाणार
***क्रिप्टो करन्सीबाबत मोठा निर्णय*

● पुढील वर्षी भारताचे स्वतःचे डिजिटल चलन लॉन्च करण्याची घोषणा केली - हे चलन रिझर्व्ह बँक स्वतः आणणार असून, ते Blockchain तंत्रज्ञानावर आधारित असेल

● त्यामुळे डिजीटल करन्सीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या तरुण वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे

● याव्यतिरिक्त क्रिप्टोकरन्सीवरील कमाईवर 30% कर लागणार.      
*रेल्वे*
● 3 वर्षात 400 नवीन वंदे भारत ट्रेन्स उभारणार

● टपाल आणि रेल्वे नेटवर्कच्या एकत्रीकरणात पुढाकार घेतला जाणार; एक स्टेशन, एक उत्पादन ही संकल्पना राबवली जाणार

● ऊर्जा, वाहतूक, विपणन यावर भर दिला जाणार

● यंदाच्या वर्षांपासून देशात ई-पासपोर्ट सेवा सुरू होणार

**शेअर मार्केट आणि इतर*

● सरकारी टेंडरचे नियम बदलणार, संपूर्ण प्रक्रिया डिजिटल होणार

● कॉर्पोरेट टॅक्स 18% वरून 15% वर, सहकार क्षेत्राला मोठा दिलासा

● एलआयसीचा आयपीओ लवकरच बाजारात आणणार

● सलग सहाव्या वर्षी आयकारात कोणताही बदल नाही, आयटीआर मधील विसंगती सुधारण्यासाठी 2 वर्षांचा कालावधी दिला जाणार       दरम्यान हा अर्थसंकल्प 2047 पर्यंतचा ब्लूप्रिंट असणार - अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली .

Comments

Popular posts from this blog

Syllabus B.SC.I.(2024-2025)

Syllabus BCA II (2025-26)