कथा संग्रह - श्री.नंदकुमार वडेर

                         * पहिला चहा *
... जिंकलसं बरं का प्रमिला, इतकी वर्ष वाट पाहून  हवं तसंच बेबीला स्थळ मिळालं.. अगदी घराशेजारचं... तुझीच अट होती ती... आणि ती पूर्णत्त्वाला आली बरं का...
.. बेबीच्या लग्नात  जवळजवळ सर्वच जण प्रमिलाचं कौतुक करत होते ,बेबीचं अभिनंदन करत होते..
.. मागची पाच सहा वर्ष स्थळ बघण्याचा नि नाकारण्यातच गेली होती.. डोंबिवल्यातल्या डोंबिवलीतील च जावई प्रमिलेला हवा होता.. लाडू बाई बेबी आई पासून दूर राहायला तयार नव्हती...
... विवाह मंडळाने हात टेकले , सगेसोयरे मित्रपरिवाराने नंतर नंतर नादच सोडला स्थळ सुचवायचा... कुणी तरी  आता घरजावई च करून घेण्याचा प्रस्तावही दिला... पण प्रमिलेला आपली प्रायव्हसी हवी होती... (नवरा गिळल्यावर कसली आलीयं डोंबलाची प्रायव्हसी.. अशी चेष्टा कानावर पडून सुद्धा..) .. संसारात राहिलं होतं काय असं.. इनमीन दोघी मायलेकी तर होत्या चार खोल्यांच्या आलिशान घरात.. इंजिनिअर झालेली, रुपगर्विता ,उपवर मुली ला तिच्या पसंतीने उजवले असते तर काय बिघडले असते... पण नाही सासरी गेल्यावर बेबीने आईची काळजी घ्यायची नाही तर मग कुणी...
... कुणी तरी लॅव्हिश वृद्धाश्रमाचा  उपायही सुचवला, इतका पैसा आहेना .. मग तिथं ऐषआरामत दिवस काढायचे सोडून मुलीच्या संसार लुडबुड करत कशाला बसावं... बेबीपण ना बिनडोक... किती आईचा पुळका तो..
... चांगली चांगली चालून आलेली हातची स्थळ केवळ या हटटा पायी ... एक दोघांनी तर बेबीच्या सासर घरीच राहा असाही टोला दिला.. पण मानी प्रमिलाने तो अमान्य केला..
.. स्थळ बंद होऊ लागली तरी इकडं बेबीच वय थांबायला तयार नाही.. तिढा सुटेना.. मायलेकी सोडून बाकिच्यांनी त्यांच्या फंदात पडणे सोडून दिले... काय होईल आईसाठी मुलीने कुमारिका राहणे पसंत केले हाच शिक्का राहिलं ना... अशा आचरट मुर्खपणा वर तोडगा नव्हता...
.. आणि आणि तो दिवस उजाडला बरं ,प्रमिलाचं नशिब फळफळलं.. पलिकडच्या सोसाटीतलं  स्थळ चालून आलं.. जावई मुलगा एका जर्मन कंपनीत एजीएम होता .. .. बेबीच्या आॅफिस पासून जवळचं त्याचं आॅफिस होतं... घ्या घरही जवळ आणि आॅफिस हि आणखी काय हवं होतं.. आपण मागितलं  आणि देवानं दिलं ...
.... वरचा स्वर्गिय आनंदच आता प्रमिलेच्या घरात राहायला आला... लग्नाची धामधूम सुरू झाली.. तिथी वारं मुहूर्त साधला आणि चौघडा वाजला... बोलण्याऱ्या तोंडाचा बेंडबाजा बंद झाला... बेबीचे सासर विहिणीबाईचीं काळजी घेणारंच निघालं... प्रमिलाला अस्मान ठेंगणे झालं.. तिचे पाय जमिनीवर राहिले नाहीत... हवेत तरंगत राहू लागली...
... कार्यालय माणसांनी फुलून गेले.. शुभेच्छा घेता घेता प्रमिला थकून गेली... वरात सासरी गेली... पाणावलेल्या डोळ्यांनी प्रमिला घरी आली तेव्हा संध्याकाळचे पाच वाजले होते... शेजारच्याच सोसायटीच्या आवारात बॅंड वाजत असलेला ऐकू येत होता...
.... तोच बेबीच्या सासूबाईं तिच्याकडे येताना पाहिले.. प्रमिला चिंताक्रात झाली.. काय सांगाणार आहेत ते ऐकण्याची तिला घाई झाली...
... बेबीच्या सासू बाईंनी पेढ्याचा पुडा प्रमिलेच्या हाती दिला व म्हणाल्या, "आमची सुन मोठ्या पायगुणाची निघाली.. घरात येताच आपल्या नवऱ्याचं प्रमोशन घेऊन आली आणि जर्मनीच्या ऑफिसला निघाली... आमच्या घराण्यातल्या पहिला माणूस परदेशात निघाला.. त्याचा हा पेढ्याचा पुडा तुम्हाला द्यायला आले.. जाते बाई तिकडं लक्ष्मी पुजनासाठी सगळे खोळंबली असतील...
.... प्रमिलेच्या हाती असलेल्या त्या पेढ्याच्या पुडयावर तिचे उष्ण आसवांचे थेंब टपकत राहिले...
आपण मागितलं ते काय आणि देवानं दिलं कायं...
..(C) नंदकुमार वडेर.
          99209 78470

Comments

Popular posts from this blog

Syllabus B.SC.I.(2024-2025)

Syllabus BCA II (2025-26)