कथा - पहिला चहा - श्री. नंदकुमार वडेर

                             * पहिला चहा *
... परवा म्हणे मातृदिनचा ईव्हेंट साजरा होऊन गेला... असा असतोच म्हणतात तो दरवर्षाला... मग त्या दिवशी  झुंबडच उडते सगळया डिजिटल माध्यमावर ... आई या विषयावर स्तुतीसुमनांची खैरात होते... हळवे शब्द पिळवटून टाकते हृदयाला नि डोळे वाहतात घळा घळा... मग ती आई कुणाची का असेना तन वेगळे असले तरी मायेची भावना एकच असतेना... म्हणतात ना घार हिंडते आकाशी परी चित्त तिचे तिच्या पिलापाशी...
... पण पण खरं सांगू मला तर आई रोजच आठवते.. किंबहुना मला ती दिसते .. माझ्याशी बोलते... लहान असताना लाडावून ठेवलेला मला आता ती कान उघाडणी करते... माझं लेकरू लहान आहे मोठं झाल्यावर त्याला भरपूर काम आहे... घरचं काम  करायला आताच नको सांगायला.. ते त्याची बायकोच बघून घेईल त्याला... शिकवून मोठा सायेब होईल..नि गरीब आईचं पांग फेडील...
... साहेब मी झालो खरा.. पण आईनंच खाल्ल्या होत्या खस्ता साऱ्या... पण पांग फेडण्यासाठी आई कुठे राहिली जवळी ..ती तर केव्हाच होती दूर गेली...  त्यानंतर आसवांचे मोती ओघळतच राहिले... आईची छबी नि शब्द मनात गुंजले... मी असेन अवतीभवती सदोदित तुझ्या जवळी...मन सावररे.. मन बावरे..
... मला एक सांगावस वाटत.. एकटा होतो तेव्हा ठिक होतं मी तिची आणि ती माझी आठवणीत होती... पण नंतर माझ्या आईची आठवण माझ्या पेक्षा जास्त येते  माझ्या बायकोला ... असा कसा माठ आणि ऐतोबा मुलगा आईने लाडावून ठेवला...एक वळण ते कसलं लावलं नाही त्याला... आळशीपणाचा तर कहरच झाला आणि हात लावत नाही कुठल्या कामाला... साहेब आहे त्याचा तोरा भारी.. असा माणूस विरळाच घरीदारी...माऊलीचं घेते नाव उठता बसता...कसलं असेल माय लेकराचं प्रेम म्हणून काय विचारता...
... म्हणून रोजच असतो मदर डे आमच्या घरी... ऊद्धाराविना दिवस रात्र ना सरी... कानात माझ्या आता ती सांगते कळली ना किंमत आईची... लावून घे त्या सवयीनां बायको आहे ना वळणाची...आता तरी तू सुधारशील हेच पांग तू फेडावेस... माझ्या सुनबाई ला तू प्रेमाने जपावेस...
(C) नंदकुमार वडेर.
    99209 78470.

Comments

Popular posts from this blog

Syllabus B.SC.I.(2024-2025)

Syllabus BCA II (2025-26)