कथा - हि.अनोखी गाठ कुणी बांधली - श्री. नंदकुमार वडे र

                    हि अनोखी गाठ कुणी बांधली..
..."हॅलो! , दिपक, मी वृद्धाश्रमातून सेक्रेटरी काळे बोलतोय... आपल्या वडिलांनी इथं बराच गोंधळ घातलाय..आपण थोडा वेळ काढून लवकरच इकडे आलात तर सविस्तर बोलून काय तो निर्णय घेउया...
... आज सकाळी ते आणि त्या मिसेस अॅना मॉर्निंग वाॅकला बाहेर पडले ते वृद्धाश्रमात परत आलेच नाहीत...
आम्ही दोघांच्याही सेलवर बरेच काॅल केले... मेसेजेस पाठवले... पण तिकडून काही ही रिसपाॅन्सच नाही... फिरायला जाण्याच्या त्यांच्या वाटेवरून चांगली दोघातिघांनी शोधाशोध केली... त्यावेळी तिथे दिसणाऱ्यांच्या कडे सुद्धा विचारपुस केली... पण ठोस उत्तर मिळालं नाही... काही विपरित घडलं की काय असे सारखं वाटत आलयं.... म्हणून तुम्हाला लगोलग कळवलं... बरं पोलिस ठाण्यात तक्रार करावी म्हटलं तर तुमचा,त्यांचा आणि या वृद्धाश्रमाचा प्रतिष्ठेचा प्रश्न येतो... तो एक वेळ तुम्हाला परवडेल पण आश्रमाला परवडणारा नाही....
... त्यांच्या रुममध्ये तुमच्या नावे असलेला हा लिफाफा मिळाला....पण तुम्हाला सांगतो अलिकडे दोघांचं गुळपिठ फारच जमलेलं दिसत होतं... सगळया आश्रमातले लोक त्यांच्या कडे पाहून आनंदीत राहात होते... वयाला शोभेल असं माणसानं वागावं असं एखाद्या च्या मनात आलं सुद्धा असेल... पण आता या वयात निखळ निकोप मैत्री पलिकडे कुणीच विचार पण करत नव्हतं... असं असताना आज त्या दोघांनी आकस्मिक धक्का कि हो दिला....
... इथून पळून जाण्याइतपत मजल गेली... म्हणजे ते किती एकमेकांत गुंतलेले असतील याची कल्पना आली नाही कि राव...
... काय लिहिलंय त्या लिफाफ्यात... पासष्टीच्या वयात आम्ही दोघं सेंकड इनिंग सुरु करतोय.... मागे दोन्ही घरात कडाडून विरोध झाला .. प्रेमाचं चांदण्याला पारखं व्हावं लागलं... कालपर्यंत संसार जो झाला त्यात मनात उन्हाळेचे चटकेच सोसले... एक छोटीशी प्रेमाची सावलीची
धुसर आशा होती ... पण ती त्यावेळी पूर्ण होणार कशी... इथं आलो नि अॅनाची पुन्हा भेट झाली... एक प्रेमाची कोवळी पालवी मनात फुलली... आणि आज आम्ही तो निर्णय घेतला आहे...  व्यर्थ शोधाशोध करू नका ... आमच्या आकाशा एव्हढया आनंदाचा विरस करु नका...
... योग्य वेळी आम्ही आमचे मोबाईल सुरू करु... आमचं दार उघडच राहिलं तुमचं स्वागत करण्यासाठी... प्रश्न असेल तो तुमचा किती लवकर येताय भेटायला....
(C) नंदकुमार वडेर.
     99209 78470

Comments

Popular posts from this blog

Syllabus B.SC.I.(2024-2025)

Syllabus BCA II (2025-26)