कथा - घार - श्री. नंदकुमार वडेर


                       घार - श्री.नंदकुमार वडेर
...कुठं गेली होतीस ..रात्र वाढत चालली आहे हे तुला कळलंच नाही... आता घरट्यात तुला घेतील असं वाटतंय का... रवी अस्ता नंतर कुणी असं बाहेर पंख पसरून विहार करतंय का... सगळीकडे कसं चिडीचूप शांतता पसरली आहे... आणि तशात तुझं हे उशिरानं येणं... तुझे घरचेच काय पण तुझ्या बिरादरीतले सुद्धा सहन करणार नाहीत असलं तुझं बेताल वागणं.. बहिष्कृत करतील.. बिरादारीला कलंक लागला म्हणून तुला चोच मारून घायाळ करतील.. कदाचित तुला मुक्ती देतील... याची कशा कशाची च तुला भिती वाटली नाही....
.... हे शशांका आज मी खऱ्या अर्थाने मुक्त झालेय... मीच माझं घरदार कधीच सोडून आलेय... बिरदारीच काय घेऊन बसलास... मला त्यांच्या सारखं चार काटक्या गोळा करून सुरक्षित घरटं बांधून नरमादी सारखा चुल मुलं बोळक्याचा टुकार संसार करायचा नाही... मी एक घार स्वतंत्र पक्षी म्हणून या मोकळ्या आकाशात विहार करायचा आहे.. मनमौजी सारखं जगायचं... हि माझी दृष्टी आहे...  आता मला कुठच थांबायचं नाही.. तू फक्त माझ्यासाठी तुझ्या चंद्र प्रकाशात मला मात्र चमचमता मार्ग दाखव  सकाळी रवी येईपर्यंत.. मला माझा मुक्काम गाठायचा तोपर्यंत मी विश्रांती ती घेणार नाही... आणि हो मी विहार करताना माझी सावली सुद्धा खाली पडू देऊ नकोस... ऐकशील ना माझं एव्हढं...
(C) नंदकुमार वडेर.
   99209 78470.

Comments

Popular posts from this blog

Syllabus B.SC.I.(2024-2025)

Syllabus BCA II (2025-26)