कथा-अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी..
#...अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी..#
...अखेर कोर्टाने निर्णय दिला... दोघांना डिव्होर्स हवा होता तो... निकालाची प्रत हाती पडली... मागची तीन काळी कुट्ट वर्षावर पडदा पडला... गुंता झाला पण गुंतवून घेण्याआधीच तो सुटला... सुटला कि तोडला.. आता काही म्हटले तरी त्यात काय फरक पडणार म्हणा... एक बरं होतं गुंतायला इश्यू कुठं होता... इश्यू.. तेच तर कारण होतंना याचं... हे ..हे कारण कसं असेल...हे ट्रम कार्ड नव्हते ना त्याच्या जवळ ... नाहीतर डिव्होर्स मिळणं जरा गुंतागुंतीच होउन बसलं असतं.... पण पण आता कशाला या गोष्टीचा विचार आपण करतोय... झालाना सोक्षमोक्ष कायमचा... आता मोकळा श्वास घ्यायचा आणि पुढं चालायचं... जणू काही मागं घडलचं नाही अशा आर्विभावात... निकालाची प्रत तर तेच सांगतेय कि तू स्वतंत्र झाली आहेस... आता कुणाचीही पत्नी नाहीस... तु तुझा पुढील निर्णय घेण्यास मुक्त आहे....पाठीमागचे कुठलेच पाश नाहीत... माणूस म्हणून तुला जगण्याचा हक्क मिळाला आहे... तसंच तू जग.. आता कुणाचीही तू गुलाम होऊ नकोस... पुढचा निर्णय घेशील तेव्हा हि गोष्ट विसरू नकोस... आर्थिक स्वातंत्र आहे... सक्षम आहेस.. तेव्हा येथून पुढचे निर्णय कठोरपणे घे... भावनेच्या आहारी जाऊ नको...... "हॅलो!कशी आहेस... झालं का समाधान... तुझ्या मना सारखं झालना...एक विचारू असं कोणतं घरं आहे की तिथं भांडयाला भांडं कधी लागतच नाही... आणि ते लागलंच तर घर लगेच तुटन गेलंय... शांतपणे विचार करून बघ... शब्दांने शब्द वाढला... राग उफाळून आला ...पण अहंकार मात्र मागे हटला नाही ... विवेक उरला नाही... आततायीचं पाउल कायद्याच्या कडे वळले... विचार पटत नाही म्हणून अलग केले.. पण प्रश्नाचं उत्तर दिलं नाही... पर्याय म्हणून निर्णय दिला...स्विकारला..
... "महाशय.. आता बोलून काय फायदा... माणूस संपला आणि पशू जागा झाला... मारझोड झाली... अत्याचार सहन करण्याची सीमा संपली... लग्न केलं होतं एका माणसानं दुसऱ्या माणसाशी.... गुलाम म्हणून नांदायला आले नव्हते... आणि आता फोन करून पुन्हा त्रास नको...
... विसरता येईल का ते सारं... चांगलं आठवणार नाही एकवेळ पण दुःखाचा सल मात्र राहिलं ना टोचत मनात कुठंतरी... होतील कि डोळे ओले... मनात कढ येईलच कि... ओठांवर शब्दांची थरथर होईल... मग म्हणू नकोस... हेच होतं का तुझं माझ्यावर जीवापाड प्रेमं... आणि मी मात्र शोधत राहिनं रुसलेलं पण तितकंच प्रेमानं ओथंबलेलं तुझं मन....
... मिळू देशील का त्या उष्ण आसवांच्या गंगा जमुना ना एकमेकांत... पुसली जाऊदे ती काळी अक्षरे डिव्होर्सच्या निर्णयाची कायमची....
....अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी..
...लाख चुका असतील केल्या, केली पण प्रीती...
(C) नंदकुमार वडेर.
99209 78470
Comments
Post a Comment