कथा- पहिला चहा

                              #  पहिला चहा  #

                      मला पूर्वी चे  चाळीत राहायला असतानांचे ते दिवस आठवले... तो सामायिक व्हरांडा आणि त्याच्या समोर अकरा खोल्यांची उघडी दारं.. तळमजला आणि पहिला मजला बस इतकंच.. खाली अकरा आणि वरही अकराच... लाकडी जिना एका बाजूला भिंती ला पाली सारखा चिकटलेला... इतर चाळी सारखीच काही महत्त्वाच्या गोष्टी सामायिक होत्याच... मालकि हककाची ती भाडेकरु चाळ... ब्रिटीश कालीन ऐतिहासिक वास्तू... अजूनही दणकट... हं आता कुठे कुठे प्लॅस्टर निम्या हुन निखळले असल्याने भिंतीची अब्रु उघड्यावर पडली आहे.. पण स्वातंत्रोत्तर काळातील  बिल्डर कडून थोडीफार  शंकास्पद डागडुजी मात्र दर वर्षी होतेय.. चाळीचा कायापालटच्या नावाखाली तो स्व ताची काया पालट करून घेत आलाय...
... आपला तो विषय नाही... चाळीचे जीवन कसं होतं ते सांगायचं... सगळी बिऱ्हाडं  कामगार वर्ग होता... सगळा कारभार  खुल्लम खुलला... घरोघरी मातीच्या च चुली असल्या सारखा... कोणाच्या घरी कसलाही कार्यक्रम असला तरी तेवीस घरटी आपल्या च घरातलं कार्य समजून घरात घुसत.. मदत न मागता मिळे.. काही अडतच नसायचं... किरकोळ  मतभिन्नतेचा कवडसा एकोपाच्या सूर्य प्रकाशात लाजुन राहयचा... मग तो चाळीतला सार्वजनिक सत्यनारायण असो वा घरगुती ... सगळी चाळ एकत्र... बारसे ते तेरावे तितकेच एकत्रित होई... आर्थिकतेची झोळीला छिद्र फार असली तरी मनाची , माणुसकीची गर्भश्रीमंती होती...दुखलं खुपलं तर आपुलकिचं दवापाणी हाच रामबाण उपाय... चाकरमानी विरंगुळ्यासाठी पत्ते कुटत.. पोरटोरं कॅरम, व्हरांडतला क्रिकेट ,खेळत... माता भगिनी दुपारच्या फावल्या वेळात उवा मारण्याचा राष्ट्रीय कार्यक्रम करत.. ते करत असताना तोंडी लावायला त्या विशिष्ट विषय घेत... कुणी म्हातारे कोतारे ईश्र्वर आळवणी साठी भजन करत... एकुणात सर्व आलबेल असाण्यासाठी जे हवं ते चाळी कडं होतं... काही बंद पुकारला असला तरी आमची चाळ मात्र आतून जिवंत राहत असे...एकाचा चहा दुसऱ्याचा नाष्टा तिसऱ्याकडं जेवण अशी अविभक्त कुटुंब पद्धती होती...
... संकटाला धावणारी माणुसकी तिथं होती... दारं अनेक असली तरी तुळशीचा कट्टा एकच होता... आणि काय हवं होतं....
... पण पण ते सारं गमावून बसलोय ह्या टोलेजंग इमारती च्या बंदीस्त कैदखान्यात... आतली माणुसकीची गळचेपी झाली... बाहेरच्या ला परका शिक्का बसला तो कधीच आत आला नाही... मदतीचा हात तोकडा कसा राहील हेच पाहिलं गेलं... दुःख सारखी असली तरी  मुके अश्रू कुणालाच दिसत नाही...  समोरा समोरची बंद दारं मात्र एकमेकां समोर मारबल हसत असतात... मालक मात्र ओळख करून विसरून जातात... नेहमीच्या रुटीन ला एकवेळ ठीक असतं... पण पण अचानक अशी करोना सारखी वेळ येते तेव्हा मात्र.... ती चाळ दिसते ....
... नि डोळे मात्र आठवणीने पाणावतात ....


-नंदकुमार वडेर.
 9920978470

Comments

Popular posts from this blog

Syllabus B.SC.I.(2024-2025)

Syllabus BCA II (2025-26)