कथा - लाँकडाऊन - सौ.शुभांगी लेले
लाँकडाऊन टीव्हीवर बातम्या सुरु होत्या.त्याबरोबरीनं बघणाऱ्यांची चर्चाही सरु होती.कुठे कुठे लाँकडाऊन उठले याची प्रत्येकालाच उत्सुकता होती. अनुनं हळूच हाँलमधे डोकावून विचारलं "अहो...कर्नाटकचं लाँकडाऊन उठलं का?त्यावर त्यानं वाईट तोंड करत नन्नाची मान डोलवली.तसं अनुनं एवढसं तोंड करुन स्वयंपाकात लक्ष घालण्याचा प्रयत्न केला.तेवढ्यात तिचा मुलगा आत येऊन म्हणाला " आज काय करतीयंस जेवायला? " तसा तिचा आवरुन धरलेला राग बाहेर पडला."रोज काय नवीन करायचं असतं?आता मलाच खा." असं म्हणत ती रागानं खोलीत निघून गेली.नवऱ्याच्या ते लगेचच लक्षांत आलं. तिच्या पाठोपाठ तोही खोलीत गेला.तशी ती भडकली.म्हणाली "सगळं करुन ठेवलंय ते खा.मला भूक नाही.जा तुम्ही.तसा तो म्हणाला " पण इतकं झालंय तरी काय? आत्तापर्यततर ठीक होतीस.हे ही खरं आहे म्हणा,छोट्या छोट्या कारणानं रुसुन बसण्यातली अनु कधीच नव्हती.डोळे पुसत पुसत अनु म्हणाली, या कोरोनालासुद्धा आत्ताच यायचं होतं का!नेमका मार्च गाठ...