Posts

शाहु महाराज जयंती ( 150)

Image
 जन्म : २६ जुन १८७४ मृत्यु : ६ मे १९२२ न भूतो ना भविष्यती असा हा राजा होऊन गेला. लोककल्याणासाठी जे कार्य महाराजांनी केले, त्याला खरंच तोड नाही. भल्याभल्यांना जे जमलं नाही, त्या काळात ते काम या अवलियाने करून दाखवले. लोककल्याणकारी राजा शाहू महाराजांना म्हटले जाते, ते असेच नाही. इतर राजे इतिहासजमा झाले, पण हा राजा शिवरायांच्या नंतर आजसुद्धा लोकांच्या हृदयात खोलवर रुतून बसला आहे. आणि येणाऱ्या शेकडो वर्षांपर्यंत महाराजांचे स्थान कायम हृदयात असेल. जोगत्या-मुरळी प्रतिबंधक कायदा, आंतरजातीय विवाह कायदा, राखीव जागा ठेवण्याचा कायदा, पुनर्विवाहसंबंधी कायदा, काडीमोडसंबंधी कायदा, आणि इत्यादी वेगवेगळे कायदे त्यांनी आपल्या प्रांतात केले होते. या सोबत सक्तीचे मोफत शिक्षण, दलितांना शिक्षण, वसतिगृहाचे निर्माण, आरक्षणाची तरतूद, जातीभेद निर्मूलनासाठी प्रयत्न, शेती, पाणीपुरवठा, उद्योगधंदे निर्माण करणे आणि इत्यादी असंख्य समाज उपयोगी कार्य या राजाने त्या काळी करून ठेवले होते. जे आजसुद्धा असंख्यांना करायला जमत नाही. त्यांच्या महान विचारांची गरज आज आपल्या समाजाला आहे. विषमता पेरणाऱ्या युगात समता पेरणारा हा ...

Shivaji University Syllabus

   Shivaji University Syllabus  https://www.unishivaji.ac.in/bos/default.aspx

Research Fund ( Agrani)

Image
        अग्रणी महाविद्यालय अंतर्गत ग्रंथालय, हिंदी आणि मराठी विभागांतर्गत रीडिंग थेरपी उपक्रमास १००००/- संशोधनासाठी मिळाले.

National Reading Day

*राष्ट्रीय वाचन दिन* (National Reading Day)  भारतात 19 जून रोजी राष्ट्रीय वाचन दिन साजरा करण्यात येतो. हा दिवस भारताच्या ग्रंथालय चळवळीचे जनक पीएन पैनिकर यांच्या पुण्यतिथिनिमित्त साजरा केला जातो. आताच्या मोबाईलच्या युगात वाचनाची आवड लागावी यासाठी या दिवशी शाळांमध्येही विविध वाचनाचे उपक्रम राबविले जातात. पैनिकर यांना केरळमधील ग्रंथालय आणि साक्षरता चळवळीचे जनक म्हटले जाते. पैनिकर यांनी सुमारे 6,000 ग्रंथालये त्यांच्या नेटवर्कमध्ये आणण्यात यश मिळवले.        पीएन पैनिकर यांचे 19 जून रोजी केरळमध्ये निधन झाले. आपल्या गावी शिक्षक म्हणून पैनिकर यांनी 1926 मध्ये सनातन धर्म ग्रंथालय सुरू केले. त्यांच्या या योगदानाबद्दल श्रद्धांजली म्हणून त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशभरात राष्ट्रीय वाचन दिवस साजरा केला जातो. पीएन पैनिकर यांचे 19 जून 1995 रोजी निधन झाले. 2017 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 19 जून हा राष्ट्रीय वाचन दिवस म्हणून घोषित केला. तेव्हापासून दरवर्षी 19 जून रोजी हा दिवस साजरा केला जातो.  या वाचन दिवसाच्या निमीत्ताने आपण *खालील दिलेल्या लिंक* च्या सहाय्याने ...

महात्मा बसवेश्वर Work is Worship

Image
                                           महात्मा बसवेश्वर यांची आज ( १०मे २०२४) जयंती  कर्नाटकाच्या धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक इतिहासात महात्मा बसवेश्वरांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे मानले गेले आहे. आद्य समाज सुधारक तसेच कर्माचे श्रेष्ठत्व सांगणारे आणि वीरशैव धर्माचे पुनरूज्जीवन करणारी थोर विभुती म्हणून महात्मा बसवेश्वर यांच्याकडे पाहिले जाते. वैशाख शुद्ध तृतीया म्हणजेच अक्षय्य तृतीया दिनी इ.स. ११०५ मध्ये बसवेश्वर यांचा जन्म झाला. धर्म, समाज, तत्त्वज्ञान, वाङ्‍‍मय, राजकारण अशा क्षेत्रांतील त्यांचे कार्य क्रांतिकारक स्वरूपाचे आहे. भारताच्या धार्मिक, सांस्कृतिक, साहित्यिक, शैक्षणिक, राजकीय व सामाजिक जीवनातील ज्येष्ठ समाज परिवर्तनवादी युगपुरुष म्हणून महात्मा बसवेश्वर यांच्याकडे पाहिले जाते. महाराष्ट्रातील सोलापूर येथील मंगळवेढा येथे त्यांनी तब्बल ३१ वर्षे वास्तव्य केले होते. बसवेश्वरांनी मंगळवेढ्यातूनच लिंगायत धर्माची स्थापना केली, असे सांगितले जाते. आपल्या ज...

डॉ. आंबेडकर महापरिनिर्वाण दिन

Image
    ०६ डिसेंबर  भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो.०६ डिसेंबर १९५६ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे निधन झालं त्यामुळे त्या दिवसाला महापरिनिर्वाण दिन असं म्हटलं जात.              डॉ. आंबेडकर हे जगातील सर्वश्रेष्ठ वाचकांपैकी एक होते. इंग्लंडमध्ये शिकत असताना  ब्रिटिश म्युझियममध्ये वाचण्यासाठी ते जात असत. या ठिकाणी घडलेला सँडविच किस्सा सर्वांना परिचित आहे.काहीही न खाता दुपारी १२ तास वाचन करित असत.ज्ञानाची भूक  भागवण्यासाठी डॉ. आंबेडकर यांनी अशा प्रकारे पोटाची भूक मारून टाकली. भीमरावमध्ये वाचनाचा व्यासंग  निर्माण करून तो टिकवण्याचा पुरेपूर प्रयत्न वडील रामजी सकपाळ यांनी केला. घरची परिस्थिती अतिशय विदारक आणि दयनीय असताना आंबेडकरांनी मागितलेले पुस्तक पुरवण्याचे काम वडिलांनी केले.आंबेडकरांनी जे पुस्तक मागितले ते मिळाले नाही असं कधी झालं नाही.त्यांच्या मुंबईत राहत असलेल्या बहिणीने त्यांना पुस्तक विकत घेण्यासाठी अनेक वेळा मदत केली.काहीवेळा त्यांनी भावाच्या वाचनाच्या व्य...

डॉ. आंबेडकर महापरिनिर्वाण दिन

Image
 ०६ डिसेंबर  भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो.०६ डिसेंबर १९५६ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे निधन झालं त्यामुळे त्या दिवसाला महापरिनिर्वाण दिन असं म्हटलं जात.              डॉ. आंबेडकर हे जगातील सर्वश्रेष्ठ वाचकांपैकी एक होते. इंग्लंडमध्ये शिकत असताना  ब्रिटिश म्युझियममध्ये वाचण्यासाठी ते जात असत. या ठिकाणी घडलेला सँडविच किस्सा सर्वांना परिचित आहे.काहीही न खाता दुपारी १२ तास वाचन करित असत.ज्ञानाची भूक  भागवण्यासाठी डॉ. आंबेडकर यांनी अशा प्रकारे पोटाची भूक मारून टाकली. भीमरावमध्ये वाचनाचा व्यासंग  निर्माण करून तो टिकवण्याचा पुरेपूर प्रयत्न वडील रामजी सकपाळ यांनी केला. घरची परिस्थिती अतिशय विदारक आणि दयनीय असताना आंबेडकरांनी मागितलेले पुस्तक पुरवण्याचे काम वडिलांनी केले.आंबेडकरांनी जे पुस्तक मागितले ते मिळाले नाही असं कधी झालं नाही.त्यांच्या मुंबईत राहत असलेल्या बहिणीने त्यांना पुस्तक विकत घेण्यासाठी अनेक वेळा मदत केली.काहीवेळा त्यांनी भावाच्या वाचनाच्या व्यासंगासाठ...