महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते कि,B.Sc.I. सर्व विषयाचा अभ्यासक्रम पाहण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा. https://drive.google.com/drive/folders/1Yr8VEtE8CqKZqHBC0BQF-eWIMq00b-Od?usp=drive_link
अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन आणि सर्वांना खूप खुप शुभेच्छा 💙 कामगार,कष्टकरी,शेतकरी,श्रमिक,मजूर,दलित/वंचित आणि दिनदुबळ्यांचे प्रश्न आणि कष्टमय जीवन आपल्या साहित्यातून मांडणारे अण्णाभाऊ साठे हे अनेक बाबतीत महान ठरतात.फक्त दीड दिवसाची शाळा शिकलेल्या अण्णांभाऊंनी ३५ कादंबऱ्या,१३ कथासंग्रह,८ पटकथा,१ प्रवासवर्णन,३ नाटके,१० पोवाडे व १४ लोकनाट्ये आणि १२ उपहासात्मक लेख एवढं भरमसाठ लिखाण करून समाजाला आरसा दाखवण्याचं काम केलंय..अण्णाभाऊ साठे यांचे जीवन एकंदरीत खूपच संघर्षमय/कष्टमय होते.संघर्षाचे दुसरे नावच अण्णाभाऊ साठे होते असे आपण म्हणू शकतो कारण त्यांच्या वाटेला आलेला संघर्ष हा शब्दांत मांडता येण्यासारखा नाही अथवा दुःख जणू त्यांच्या पाचवीलाच पुजलेला होता..दुःखाची सुद्धा एक मर्यादा असते पण अण्णाभाऊच्या आयुष्यात ही म्हण अजिबात लागू होत नाही जन्मापासून तर मृत्यूपर्यंत त्यांच्या मागे दुःख हे लागलेलेच होते.संघर्ष हेच त्यांच्या जीवनाचे सूत्र होते.त्यांचे एकंदरीत जीवन हे जीवन नसून मरणच अधिक होते..त्यांचे दुःख हे त्यांच्या मृत्यूसोबतच संपले !! आयुष्यात कधीही संघर्षाची जाणीव ...
साने गुरूजी ११जून हा सानेगुरुजी यांचा स्मृतीदिन. महाराष्ट्रात ज्यांना ' आपले ' म्हणावे असे हे थोर व्यक्तिमत्व . आईच काळीज घेऊन आयुष्यभर परिव तयाव्यतिरिक्तर्तनवादी चळवळीत राहणारा हा एक सच्चा ' माणूस ' . प्रबोधनाची ' साधना ' आयुष्यभर करणारा हा एक प्रबोधनपुरूष. आई जशी आपल्या पिलांना सदैव छातीशी धरते तसेच गुरूजीनी सामान्य जणांना छातीशी धरले. आईची ऊब , बापाची वत्सलता , मित्राचे प्रेम , स्नेहीजणांचा आधार , एका चांगल्या माणसाची सह्रदयता अशा विविध अंगाने हा समाज आपल्या जवळ केला. दिनदुबळ्या माणसांना आशेचा किरण दाखवला..त्यासाठी मनापासून प्रामाणिकपणे कार्य केले. कुठेही दांभिक जगणे नाही , कुठेही अहंकार नाही , कुठेही श्रेष्ठत्वाची मिजास नाही असा हा तुमच्या आमच्या काळजाला हात घालणारा माणूस. समाजवाद...या जीवन मुल्यावर अपार निष्ठा . अहिंसा हा सर्वोच्च गुण....साहित्य हा आवडिचा प्रकार....गांधीवाद हे आवडते तत्व....साधी राहणी हा आवडता आचार....समाजाप्रती डोळे भरून वाहणारी ममता हे कायमचे दर्शन ....जगाला प्रेम अर्पावे हा सर्वोत्तम विचार .....अस विविधांगी गुण जोपासणारे हे थोर व...
Comments
Post a Comment