महात्मा गांधी आणि तीन माकडे

 महात्मा गांधी आणि तीन माकडे हे पुस्तक आवर्जून वाचायला हवे...🌼♥️

जो बदल तुम्हाला या जगात पाहायला आवडेल, तो बदल तुम्ही स्वत:त घडवला पाहिजे! `मी काय करु शकतो? मी तर सामान्य माणूस!` अशा प्रकारचे उद्गार गांधीजींनी कधीच काढले नाहीत; ते नेहमी म्हणत, `हळुवारपणानेही तुम्ही जग बदलू शकता!` आणि त्यांनी तसे केले. आपल्या विचाराने आणि कृतीने गांधीजींनी लाखो भारतीयांना प्रेरित केले आणि एका सामर्थ्यशाली साम्राज्याला स्वत:च्या स्वप्नापुढे झुकायला भाग पाडले. `स्वतंत्र भारत` या एकाच स्वप्नाने त्यांना असामान्य बनविले, लाखो भारतीयांचा अद्वितीय नेता बनविले. त्यांच्या पश्चात इतक्या दशकांनंतर आजही त्यांचे विचार आणि कार्य तितकेच प्रेरणादायी आहे. गांधीजींच्या आयुष्यात घडलेल्या ज्या प्रसंगांनी त्यांचे जीवन घडवले, अशा प्रसंगांचे व त्यावरील गांधीजींच्या विचारांचे एकत्रिकरण या पुस्तकात केलेले आहे. या पुस्तकाला श्री. अनुपम खेर यांची प्रस्तावना लाभली आहे. हे पुस्तक वाचून आपणही थोडंसं शिकू या

गुजरातमधील पोरबंदरचे दिवाण व पुतळीबाई यांचा मुलगा मोहनदास करमचंद गांधी हा काही हुशार विद्यार्थी नव्हता. त्याचे हस्ताक्षरही वाईट होते; पण तो शाळेत खूप अभ्यास करत असे. त्या काळात मुलामुलींचे लग्न खूप लवकर करत असत, त्यामुळे केवळ १३व्या वर्षी त्याचे कस्तुरबाईशी लग्न झाले. लग्नामुळे त्याचे शालेय शिक्षणाचे एक वर्ष बुडाले असते. ते वाचावे म्हणून त्याच्या शिक्षकांनी त्याला एक वर्षाचा अभ्यासक्रम सहा महिन्यांत संपवण्यास सांगितले. अशा प्रकारे अर्धे वर्ष तिसरीत बसल्यानंतर त्याला चौथीत ढकलण्यात आले.

अभ्यासाच्या नवीन विषयांच्या ओझ्याने तो दबून गेला. त्याला इंग्लिश अवघड जाऊ लागले आणि भूमितीत त्याचा गोंधळ उडू लागला, पण भूमितीत प्रावीण्य मिळवण्यासाठी त्याने कंबर कसली. बऱ्याच प्रयत्नांनी अखेर त्याला युक्लिडचे तेरावे प्रमेय समजले. त्या वेळी त्याच्या लक्षात आले की, यासाठी साधा-सरळ तर्कसंगत विचार करण्याची गरज होती. यानंतर त्याला हा विषय सोपाही जाऊ लागला आणि आवडूही लागला.

गांधीजींना ज्या प्रकारे शिकावे लागले त्यामुळे त्यांची शिक्षणाविषयीची मते तयार झाली. तीसेक वर्षांनंतर, जेव्हा ते दक्षिण आफ्रिकेत वकिली करत होते, त्या वेळी त्यांनी 'टॉलस्टॉय फार्म' उभारला. ट्रान्सवाल परगण्यातील जोहान्सबर्गजवळील एका शेतावरील ही एक वस्ती होती. त्या काळी दक्षिण आफ्रिकेतील भारतीयांना वाईट वागणूक दिली जात असे. त्याविरुद्ध गांधीजींनी मोहीम सुरू केली होती. ही वस्ती म्हणजे तिचे मुख्यालय ठरली. हर्मन कॅलनबॅक नावाचे जर्मन आर्किटेक्ट गांधीजींच्या तत्त्वांचे पुरस्कर्ते होते. त्यांनी ही शेतजमीन गांधीजींना भेट म्हणून दिली होती. लिओ टॉलस्टॉय यांच्या 'माय कन्फेशन' (माझा कबुलीजबाब) या पुस्तकामुळे कॅलनबॅक हेलावून गेले होते, म्हणून त्यांनी या वस्तीसाठी 'टॉलस्टॉय फार्म' हे नाव सुचवले. 

"मी जेव्हा एखाद्याशी बोलत असतो, तेव्हा काहीतरी शिकतही असतो. मी त्याला जेवढे देतो त्यापेक्षा जास्त मी त्याच्याकडून घेतो. अशा प्रकारे खरा शिक्षक आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांचा विद्यार्थी म्हणवतो.

"ज्यांना चिंतन करता येते त्यांना शिक्षकाची आवश्यकता नसते."

"शिक्षण म्हणजे नेमके काय याचीच लोकांना कल्पना नसते, हीच खरी अडचण आहे. जमीनजुमला किंवा स्टॉक एक्स्चेंज मार्केटमधील शेअर्सची किंमत केल्यासारखी आपण शिक्षणाची किंमत करतो. विद्यार्थ्याला चांगली कमाई करता येईल असलेच शिक्षण त्याला द्यायची आपली इच्छा असते. त्याची नैतिक जडणघडण चांगली व्हावी म्हणून आपण काहीच विचार करत नाही. मुलींनी अर्थार्जन करण्याची आवश्यकता नसते, असे आपण म्हणतो, तर मग त्यांना शिक्षण कशाला द्यायचे? जोवर अशा समजुती चालू राहतील तोपर्यंत शिक्षणाची खरी किंमत आपल्याला कळणार नाही."

"केवळ साक्षरता म्हणजे शिक्षण नव्हे."

"खरे शिक्षण तुमच्यातील उत्तम गुणांना वाव देते, विकसित करते. माणुसकीच्या पुस्तकापेक्षा चांगले कुठले पुस्तक असेल का?"

"साक्षर होणे म्हणजे शिक्षणाची पूर्तता नाही अथवा सुरुवातही नाही."

"आपल्या सभोवतालच्या परिस्थितीला अनुसरून दिलेले शिक्षण म्हणजे खरे शिक्षण अन्यथा त्याने आपली निरोगी वाढ होत नाही."

"लोकशाही व्यवस्थित चालण्यासाठी वस्तुस्थितीबद्दल माहिती असून भागत नाही. त्यासाठी खरेतर योग्य शिक्षण हवे.

अजरामर धडे । ५

"मुलाचे शरीर, मन व आत्मा यांसंबंधीच्या सर्व गोष्टी उत्तमरीत्या घडविणे यालाच मी शिक्षण देणे म्हणेन.'

"आत्मिक प्रशिक्षण म्हणजे मला हृदयाचे शिक्षण अभिप्रेत आहे."

"विद्वत्ता मिळवण्याबरोबरच तुम्ही स्वतःची नीतिमत्ता घडवली नाही आणि आपले विचार अन् कृती यांवर ताबा मिळवला नाही, तर तुमची विद्वत्ता वाया जाईल."

"चांगले हस्ताक्षर हे शिक्षणाचे एक आवश्यक अंग आहे. मुलांना मुळाक्षरे लिहायला शिकवण्यापूर्वी त्यांना चित्रकला शिकवली पाहिजे असे आता माझे मत झाले आहे. मुले जशी बघून बघून फुले, पक्षी वगैरे विविध गोष्टी शिकतात, त्याचप्रमाणे बघून बघून त्यांना अक्षरे शिकू द्यावी. त्यांना चित्रे काढता येऊ लागल्यानंतरच अक्षरे लिहायला शिकवावीत."

"राष्ट्रीय शिक्षणात देशाच्या सद्यः परिस्थितीचे प्रतिबिंब पडत असेल, तरच ते खरे 'राष्ट्रीय' शिक्षण!" BookGanga.com

"मी लेखनाला एक हस्तकला मानतो. मुलाला शिकवण्याची आपली सुरुवात म्हणजे अक्षरे लिहिण्याची बळजबरी आणि अशाने आपण त्या कलेचा जीव घेतो."

"ज्याप्रमाणे कसदार जमिनीत पेरलेले बियाणे भरघोस पीक देते त्याप्रमाणेच लोकशाही पद्धतीत शिक्षणाचा प्रसार करण्यास गुंतवलेला पैसा दसपट परतावा देतो."

"चिकाटीने प्रश्न विचारणे आणि निरोगी चौकसवृत्ती या कुठल्याही प्रकारचे शिक्षण मिळवण्यासाठीच्या प्राथमिक गरजा आहेत."

"या किडीने समाजाला इतके कुरतडले आहे की, बरेचदा शिक्षणाचा अर्थ इंग्रजीचे ज्ञान असाच घेतला जातो.🌼🤍

©️We read 🤍

Comments

Popular posts from this blog

Syllabus B.SC.I.(2024-2025)

Syllabus B.C.A.III.(2026-2027)

Syllabus B.Sc.II.(2025-26)