National Reading Day
*राष्ट्रीय वाचन दिन* (National Reading Day)
भारतात 19 जून रोजी
राष्ट्रीय वाचन दिन साजरा करण्यात येतो. हा दिवस भारताच्या ग्रंथालय चळवळीचे जनक पीएन पैनिकर यांच्या पुण्यतिथिनिमित्त साजरा केला जातो. आताच्या मोबाईलच्या युगात वाचनाची आवड लागावी यासाठी या दिवशी शाळांमध्येही विविध वाचनाचे उपक्रम राबविले जातात. पैनिकर यांना केरळमधील ग्रंथालय आणि साक्षरता चळवळीचे जनक म्हटले जाते. पैनिकर यांनी सुमारे 6,000 ग्रंथालये त्यांच्या नेटवर्कमध्ये आणण्यात यश मिळवले.
पीएन पैनिकर यांचे 19 जून रोजी केरळमध्ये निधन झाले. आपल्या गावी शिक्षक म्हणून पैनिकर यांनी 1926 मध्ये सनातन धर्म ग्रंथालय सुरू केले. त्यांच्या या योगदानाबद्दल श्रद्धांजली म्हणून त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशभरात राष्ट्रीय वाचन दिवस साजरा केला जातो. पीएन पैनिकर यांचे 19 जून 1995 रोजी निधन झाले. 2017 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 19 जून हा राष्ट्रीय वाचन दिवस म्हणून घोषित केला. तेव्हापासून दरवर्षी 19 जून रोजी हा दिवस साजरा केला जातो.
या वाचन दिवसाच्या निमीत्ताने आपण *खालील दिलेल्या लिंक* च्या सहाय्याने वाचनाची शपथ घेऊया.
https://pledge.mygov.in/reading-pledge/
Sanika Kumar Chougule
ReplyDeleteDurga Vishwas Patil
ReplyDeleteSanika kumar chougule
ReplyDelete20233005
ReplyDelete