शाहु महाराज जयंती ( 150)
जन्म : २६ जुन १८७४ मृत्यु : ६ मे १९२२ न भूतो ना भविष्यती असा हा राजा होऊन गेला. लोककल्याणासाठी जे कार्य महाराजांनी केले, त्याला खरंच तोड नाही. भल्याभल्यांना जे जमलं नाही, त्या काळात ते काम या अवलियाने करून दाखवले. लोककल्याणकारी राजा शाहू महाराजांना म्हटले जाते, ते असेच नाही. इतर राजे इतिहासजमा झाले, पण हा राजा शिवरायांच्या नंतर आजसुद्धा लोकांच्या हृदयात खोलवर रुतून बसला आहे. आणि येणाऱ्या शेकडो वर्षांपर्यंत महाराजांचे स्थान कायम हृदयात असेल. जोगत्या-मुरळी प्रतिबंधक कायदा, आंतरजातीय विवाह कायदा, राखीव जागा ठेवण्याचा कायदा, पुनर्विवाहसंबंधी कायदा, काडीमोडसंबंधी कायदा, आणि इत्यादी वेगवेगळे कायदे त्यांनी आपल्या प्रांतात केले होते. या सोबत सक्तीचे मोफत शिक्षण, दलितांना शिक्षण, वसतिगृहाचे निर्माण, आरक्षणाची तरतूद, जातीभेद निर्मूलनासाठी प्रयत्न, शेती, पाणीपुरवठा, उद्योगधंदे निर्माण करणे आणि इत्यादी असंख्य समाज उपयोगी कार्य या राजाने त्या काळी करून ठेवले होते. जे आजसुद्धा असंख्यांना करायला जमत नाही. त्यांच्या महान विचारांची गरज आज आपल्या समाजाला आहे. विषमता पेरणाऱ्या युगात समता पेरणारा हा ...