पिंपळाची पिल्ले ठाण्यात आमच्या सोसायटी पासून पाव ते अर्ध्या किमी इतक्या कमी अंतरावर मखमली, सिद्धेश्वर व कचराळी हे तीन तलाव आहेत. इमारतीच्या मागच्या कंपाऊंडला लागून नाला आहे. जो पावसाळयात येऊर पासून उतारावरून वहात येणाऱ्या पाण्याने खुप फुगतो. या सगळ्यामुळे आमच्या परिसरांत खुप विवीध झाडे आहेत. पिंपळ आहेत. इतरही बरीच झाडे आहेत. जांभळाची, आंब्याची, जंगली बदामाची आहेत. वड, उंबर आहेत. शहिद उद्यानात ताडाची खुप आहेत.भरपूर ताडगोळे काढतात सिझनमधे इथले स्थानिक. नव्याने लावलेले सोनंमोहोर, रेन ट्री आहेत. साग, सप्तपर्णी, करंज आहेत. या सगळ्या झाडांमुळे या भागात कावळे, चिमण्या, कबुतरे, बुलबुल आहेत. सकाळी व संध्याकाळी शेकडो पोपट येतात अन जातात. साळुंक्या आहेत. दयाळ, नाचण नियमित हजेरी लावतात. फुलचुखे येत असतात. तांबटाची टुकटुक ऐकू येते दिवसभर. वसंतात कोकीळेची साद नेहमी कानी पडते. मागच्या ओढ्यामुळे त्याच्याकाठी गायबगळे, पाॅंड हेराॅन, नाईट हेराॅन यांचा रोजचा वावर असतो. इथे दोन तीन पाणकोंबड्यांच्या जोड्या देखील आहेत. ओढ्याच्या भिंतीतल्या पाईपांमधे खंड्याची घरटी आहेत. त्यांची पिल्ले नाल्या काठच्या फ...
2023034182
ReplyDelete2023033244
ReplyDelete2023034182
ReplyDelete9763180577
ReplyDelete