कथा - मोहराचा आंबा - डॉ.सूरज चौगुले
'मोहराचा आंबा' डॉ. सूरज चौगुले, इस्लामपूर शिवराम अण्णांचं आंब्याचं झाड म्हणजे साऱ्या गावातील मुलांसाठी माहेर घरच होतं. गावापासून काही अंतर दक्षिणेला लोणार ओढा पार करून पुढे गेलं की सुतारकीचा पांदीचा रस्ता थेट शिवराम अण्णांच्या मळ्यात पोहोचायचा. लोणार ओढ्याचं पाणी सहा महिने तरी टिकून असायचं त्यामुळे ओढ्याच्या दोन्ही बाजूंनी असलेली गर्द हिरवाई पाखरांसाठी पर्वणीच असायची, ओढ्याच्या गावाकडच्या बाजूला मराठी शाळा, शिकणारी मुलं शाळेत आणि शिकण्यासाठी म्हणून शाळेत आलेली मुलं एकतर ओढ्यात नाहीतर सुतारकीच्या पांदीतून सरळ शिवराम अण्णांच्या आंब्याखाली सर्रास दिसून येत असत. अण्णांच्या आंब्याच्या झाडाची ओढ मुलांना इतकी लागायची की रविवारचा संपूर्ण दिवस त्या झाडावर मुलांची किलबिलाट असायची, ते झाड सुद्धा तितकच लेकुरवाळ होतं लांबून पाहिलं तर काळ्याभोर धर्तीवर एखादी हिरवीगार अर्धगोलाकार डेरेदार शीला ठेवावी असा त्याचा आकार होता. लांबून झाडाचा बुंधा कधी दिसलाच नाही. सर्कशीतील तंबूप्रमाणे आकाशात उंच जाऊनही पुन्हा मातीची ओढ घेत त्याच्या फांद्या जमि...
Comments
Post a Comment