ग्रंथ परिचय डॉ. प्रकाश आमटे यांचे 'प्रकाशवाटा' 'प्रकाशवाटा' हे डॉ. प्रकाश आमटे यांचे गाजलेले पुस्तक आहे. चोहीकडे दिशा अंधारल्या असतांना वाट दावणारे आहे. प्रेरणा देणारे आहे जगण्याच्या दिशा बदलवणारे आहे. हे पुस्तक कोणालाही व्यक्तिगत आयुष्यात रममान न होता स्व-परीघापलीकडे बघायला लावणारे आहे. या पुस्तकामुळे महाराष्ट्रात अनेकांना झपाटले आहे. समाजकार्याचे छोटे मोठे प्रयोग ठिकठिकाणी उभे राहत आहेत. हेच या पुस्तकाचे मोठे यश आहे. जाणून घेऊया आज 'पुस्तकांचे जग' मध्ये 'प्रकाशवाटा' या पुस्तकाविषयी.. बाबा आमटे व्यवसायाने वकील होते. 1942 साली महात्मा गांधीजींचे विचार ऐकून ते बदलले. त्यांनी वकीली व्यवसाय सोडून कुष्ठरोग्यांसाठी काम करायला सुरुवात केली. कुष्ठरोग्यांची सेवा म्हणजे त्याकाळी साधी गोष्ट नव्हती. कारण कुष्ठरोग्यांना समाज टाकून देत होता. नाकारत होता. तिरस्कार करत होता. या रोगाबद्दल लोकांच्या मनात गैरसमज होते. बरेचसे अजूनही आहेत. अशा टाकून दिलेल्या आणि नाकारलेल्या लोकांसाठी बाबा आमटे यांनी आपले आयुष्य खर्च केले. कुष्ठरोग्यांची सेवा एवढेच त्यांच्य...