शाहू महाराज - आरक्षणाची नीती

 आजच्या दिवशी  दि. *२६ जुलै १९०२* रोजी 

 *राजर्षी छत्रपति शाहू महाराजांनी* आपल्या करवीर कोल्हापूर संस्थानात *Policy of Reservation* अर्थात, *आरक्षणाची* नीती किंव्हा धोरण सुरु केले होते.......

••••••••••••••

वास्तविक पाहता *Idea of Reservation* म्हणजे 

*आरक्षणाची* कल्पना ही *महात्मा ज्योतिराव फुलें यांची होती. ही कल्पना त्यांनी *प्रथम १८६९ ला आणि नंतर १८८२ ला इंग्रज सरकारपुढे मांडली.


*Implimentation of Riservation*

अर्थात *आरक्षणाची अंमलबजावणी* भारताच्या आधुनिक काळात सर्वांत प्रथम *राजर्षी छत्रपति शाहू महाराजांनी* आपल्या करवीर अर्थात *कोल्हापूर संस्थानात* दि. *२६ जुलै १९०२* पासून सुरु केली.


Policy of Reservation अर्थात,

*आरक्षणाची* नीती किंव्हा धोरण *डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी* भारतीय *संविधानाच्या* माध्यमातुन

*२६ जानेवारी १९५०* पासून निश्चित केले


राजर्षी छत्रपति शाहू महाराजांनी जे *५०% आरक्षण घोषित केले त्यातुन केवळ चारच जाती वगळल्या.*

*१)* ब्राह्मण,

*२)* शेणवी,

*३)* प्रभू,

*४)* पारशी.

या चार पुढारलेल्या जाती वगळून बाकी सर्व जातींना अर्थात, ब्राह्मणेत्तरांना म्हणजेच *मूळनिवासी बहुजन* समाजाला *आरक्षण* अर्थात *प्रतिनिधित्व* घोषित केले याला म्हणतात


राजर्षी छत्रपति शाहू महाराजांनी आरक्षण का दिले.

महाराजांनी अगोदर पाहणी केली. या पाहणीत त्यांच्या लक्षात आले की, सर्व मोक्याच्या व मा-याच्या जागा माधव बर्वे या चितपावन ब्राह्मणाने आपल्याच जातीतील लोकांना नोक-या दिलेल्या आहात.

सरकारी दरबारी *७१ पैकी ६० ब्राह्मण* उच्च पदाच्या नोक-यावर होते. व *११ ब्राह्मणेत्तर होते.* तसेच *खाजगीत ५२* पैकी *४५ ब्राह्मण* नोकरीत होते व *७ ब्राह्मणेत्तर* होते. हा प्रशासनातील *असमतोल* दूर करण्यासाठी राजर्षी छत्रपति शाहू महाराजांनी सर्व *ब्राह्मणेत्तरांसाठी ५०%* आरक्षणाची घोषणा केली.


राजर्षी छत्रपति शाहू महाराजांच्या या बहुजन उद्धारक निर्णयाला खालील लोकांनी कडाडून विरोध केला.

त्यामध्ये

*१)* न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे,

*२)* रघुनाथ व्यकाजी सबनीस,

*३)* गोपाळ कृष्ण गोखले,

*४)* शि.म. परांजपे

*५)*नरहरी चिंतामण केळकर,

*६)* दादासाहेब खापर्डे,

*७)* बाळ गंगाधर टिळक,

*८)* अँड. गणपतराव अभ्यंकर (सांगली) यांचा समावेश आहे.


खरे तर राजर्षी छत्रपति शाहू महाराज स्वत: राजे होते, व स्वत:च्या संस्थानात आरक्षण देणार होते.   *अॅड. गणपतराव अभ्यंकर* हे सांगलीच्या संस्थानात मध्ये नोकरीस होता.. हे पटवर्धन म्हणजे तुम्ही हिंदी चित्रपट पाहिला असेल चित्रपटाचे नांव होते *"मैने प्यार किया"* या सिनेमातिल सलमान खानची नायिका *भाग्यश्री* त्या भाग्यश्री चे अजोबा हे गणपतराव अभ्यंकर.....

अँड. गणपतराव अभ्यंकर सांगलीवरुन कोल्हापूरला आले व राजर्षी छत्रपति शाहू महाराजांची भेट घेऊन

*१)* जातवार स्कॉलरशिप व 

*२)* जातवार नोक-या देण्याच्या निर्णयाला विरोध करु लागले. त्यांच्या मते लायकी पाहूनच स्कॉलरशिप व नोक-या द्यायला पाहिजेत.


*आरक्षणासंबंधी अभ्यंकराला वाईट का वाटत होते ?

कारण त्यामुळे कोल्हापूर संस्थानातील ब्राह्मणांना मिळ्णार्या नोकर्यांचे प्रमाण कमी होणार होते आणि ते होऊ नये म्हणून सांगली संस्थानातील हे कोल्हापूरला आले व छत्रपति शाहू महाराजांना असे आरक्षण देऊ नये असा सल्ला दिला.


अँड गणपतराव अभ्यकरांनी आरक्षणाला विरोध केला.

राजर्षी छत्रपति शाहू महाराज हे *कर्ते सुधारक* होते,

नुसते *बोलके सुधारक* नव्हते. शिवाय ते *फॉरीन रिटर्न* होते. गणपत अभ्यंकरांचा आरक्षण विरोध त्यांच्या लक्षात आला.


राजर्षी छत्रपति शाहू महाराजांनी गणपत अभ्यंकरांना आपल्या घोड्याच्या पागेत (तबेल्यात) नेले. त्या ठिकाणी खुप घोडी होती. सर्व घोडी आरामाने आपल्या स्वताच्या हिस्याचे तोब-यात(पिशवीत) दिलेले चंदी (हरबरे-चने) खात होती.


राजर्षी छत्रपति शाहू महाराज व गणपत अभ्यंकर हे सर्व पहात होते. तेव्हड्यात राजर्षी छत्रपति शाहू महाराजांनी तेथील मोतद्दारांना घोड्याच्या तोंडाचे तोबरे सोडून त्यातील चने/हरबरे खाली सतरंजीवर टाकायला सांगीतले. नंतर सर्व घोडी मोकळी सोडायला सांगीतले.

हे प्रात्यक्षिक अँड गणपत अभ्यंकर निमूटपणे पहात होते.


जसेही मोतद्दारांनी सर्व घोडी मोकळ्या सोडून दिल्या,

तेव्हा जी तगडी घोडी होती, *शक्तिशाली घोडी* होती, 

धडधाकट निरोगी घोडी होती, मोठी घोडी होती...

ती सर्व घोडी सतरंजीवर सर्वांसाठी ठेवलेल्या 

चने/हरब-यावर तुटून पडली आणि जी *कमजोर घोडी* होती, आजारी कुपोशीत घोडी होती.....

ती *लांबच उभी* होती आणि पाहत होती.

मोठी ताकतवान घोडी तगडी मस्तवाल घोडी खाताना सुद्धा व्यवस्थीत खात नव्हती. ती *तोंडाने हरबरे खायची* व *मागच्या पायाने लाथा झाडायची* (मारायची) जेनेकरुन *कमजोर,कुपोशीत घोड्यांने यात घुसू नये.* त्यामुळे *कमजोर लहान घोड्यांनी* त्या तगड्या घोड्याच्या गर्दीत *न घुसण्याचा* विचार केला.

कारण त्या तगड्या मस्तवाल घोड्यांच्या गर्दीत घुसलो तर, *हरब-या ऐवजी लाथाच खाव्या लागतील.*

असा विचार करुन बिचारी गरीब, अशक्त, कुपोषीत घोडी आपल्या हिस्याचे चने-हरबरे मोठी तगडी घोडी खात इतरस्थ पसरविताना निमूटपने पहात होती.


तेव्हा राजर्षी छत्रपति शाहू महाराज *त्या कमजोर घोड्यांकडे* बोट दाखवून अँड गणपत अभ्यंकराला म्हणाले,

"अभ्यंकर या कमजोर घोड्याचे काय करु ?

त्यांना गोळ्या घालू काय ? हे असं होणार हे मला अगोदरच माहीत होते. म्हणून मी *प्रत्येकाचा वाटा प्रत्येकाच्या तोडाला बांधला होता.*

जेणे करुन दुसरे कोणी *कमजोर गरीब कुपोषीतांच्या हिस्यातील खाद्यामधे तोंड घालणार नाही ".*

यालाच म्हणतात *आरक्षण.*


यावर *गणपत अभ्यंकराने* मान खाली घातली. त्यांना त्याच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले. त्यानंतर राजर्षी छत्रपति शाहू महाराज अभ्यंकराला म्हणाले,

अभ्यंकर .. *जाती मानसात नसतात,जनावरात असतात*

परंतु तुम्ही ( *ब्राह्मणांनी*)  *जनावरांची व्यवस्था माणसाला लागू केली आणि मी मानसाची व्यवस्था जनावरांना लागू केली."* यावर अभ्यंकर चिडीचूप झाले.


                      संदर्भ :- जयसिंगराव पवार लिखित 

" लोकराजा-राजर्षी छत्रपति शाहू महाराज " समग्र ग्रंथ 

••••••••••••••••

Comments

Popular posts from this blog

अण्णा भाऊ साठे जयंती

महात्मा बसवेश्वर Work is Worship