*डॉ. बाबासाहेब आंबेडकर : आधुनिक भारताचे प्रमुख शिल्पकार* - प्रा. हरी नरके देशाचे उर्जामंत्री, पाटबंधारे मंत्री, सार्वजनिक बांधकाम खात्याचे व विमान वाहतूक खात्याचे मंत्री असलेले बाबासाहेब देशाला 'उर्जा साक्षरता व जल साक्षरतेची सर्वाधिक गरज आहे' असं १९४२ साली सांगत होते. देशातली पहिली १५ धरणं बांधणारे, देशातल्या मोठ्या नद्या एकमेकीला जोडून दुष्काळ हटवण्याची योजना करणारे, सारा देश हायवेंनी जोडणारे, भारताला विकास हवाय, बिजली, सडक, पाणी म्हणजेच विकास हे सूत्र ते मांडत होते. अशा महापुरुषाला फक्त अनुसूचित जातींपुरते सीमित करणारे आपण करंटेच नाही काय? शंभर वर्षांपूर्वी १९१८ साली त्यांनी शेतकर्यांच्या व्यथा, त्यांच्यापुढच्या शेतीसमस्या मांडणारं पुस्तक लिहिलं. 'स्मॉल होल्डिंग्ज इन इंडिया ॲंड देअर रेमेडिज' ( Small holdings in India and their remedies ). त्यांचे हे पुस्तक ना भक्तांना माहिती आहे, ना विरोधकांना. शेतीवरचा बोजा कमी करा. एकच मूल शेतीत ठेवा. बाकिच्यांना तिथून बाहेर काढा नि उद्योग, व्यापार, शिक्षण, सेवा क्षेत्रात घाला. शेतीमालाला योग्य बाजारभाव, सिंचन आणि शेतीला उद...