अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन आणि सर्वांना खूप खुप शुभेच्छा 💙 कामगार,कष्टकरी,शेतकरी,श्रमिक,मजूर,दलित/वंचित आणि दिनदुबळ्यांचे प्रश्न आणि कष्टमय जीवन आपल्या साहित्यातून मांडणारे अण्णाभाऊ साठे हे अनेक बाबतीत महान ठरतात.फक्त दीड दिवसाची शाळा शिकलेल्या अण्णांभाऊंनी ३५ कादंबऱ्या,१३ कथासंग्रह,८ पटकथा,१ प्रवासवर्णन,३ नाटके,१० पोवाडे व १४ लोकनाट्ये आणि १२ उपहासात्मक लेख एवढं भरमसाठ लिखाण करून समाजाला आरसा दाखवण्याचं काम केलंय..अण्णाभाऊ साठे यांचे जीवन एकंदरीत खूपच संघर्षमय/कष्टमय होते.संघर्षाचे दुसरे नावच अण्णाभाऊ साठे होते असे आपण म्हणू शकतो कारण त्यांच्या वाटेला आलेला संघर्ष हा शब्दांत मांडता येण्यासारखा नाही अथवा दुःख जणू त्यांच्या पाचवीलाच पुजलेला होता..दुःखाची सुद्धा एक मर्यादा असते पण अण्णाभाऊच्या आयुष्यात ही म्हण अजिबात लागू होत नाही जन्मापासून तर मृत्यूपर्यंत त्यांच्या मागे दुःख हे लागलेलेच होते.संघर्ष हेच त्यांच्या जीवनाचे सूत्र होते.त्यांचे एकंदरीत जीवन हे जीवन नसून मरणच अधिक होते..त्यांचे दुःख हे त्यांच्या मृत्यूसोबतच संपले !! आयुष्यात कधीही संघर्षाची जाणीव ...
Comments
Post a Comment