जागतिक महिला दिन

जागतिक महिला दिन दरवर्षी ०८ मार्च रोजी साजरा केला जातो. महिलांना त्यांच्या अधिकाराविषयी जागरूक करणे हा या दिवसाचा मुख्य हेतु आहे.
 दरवर्षी विविध  थिमच्या आधारावर महिला दिनाचे आयोजन केले जाते.या वर्षीचा महिला दिन एका खास थीम वर साजरा केला जात आहे.Gender equality today for a sustainble tomorrow. ही यंदाची महिला दिनाची थीम आहे. अर्थात समाजात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून चालणारी स्त्री अजुनही समाजात काही ठिकाणी केवळ लिंगभेद करून समान संधीपासुन दुर ठेवली जाते. त्यामुळे Break the Biasम्हणूस हाच लिंगभेद मोडण्यासाठी महिला दिन साजरा होतो.

जागतिक महिला दिन कधी सुरु:

आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा उदय एका कामगार आंदोलनातून झाला . 1908 साली याची पहिली ठिणगी पडली होती. 15हजार महिलांनी न्यूयॉर्क शहराच्या रस्त्यावर  मोर्चा काढून कामाचे तास कमी करण्याची मागणी केली होती .या आंदोलनाच्या वर्षभरानंतर अमेरिकेतील सोशालिस्ट पक्षाने 8 मार्च हा राष्ट्रीय महिला दिवस म्हणून घोषित केला.

आंतरराष्ट्रीय दिवस :

ही कल्पना एका स्त्रीची होती. क्लारा जेटकीन यांनी 1910 साली कोपनहेगनमध्ये झालेल्या काम करणान्या महिला साठीच्या एका आंतरराष्ट्रीय परिषदेत जागतिक महिला दिन साजरा करण्याचा प्रस्ताव
मांडला.
त्या परिषदेत 17 देशांच्या 100 महिला सहभागी झाल्या होत्या.
सर्वप्रथम 1991 साली ऑष्ट्रीया, डेन्मार्क, जर्मनी आणि स्वित्झरलँडमध्ये जागतिक महिला दिन साजरा  करण्यात आला होता. 1975 मध्ये  संयुक्त राष्ट्रांनी एक वार्षिक उत्सव म्हणून थिमसह साजरा करायला सुरवात केली.
 त्यावेळी या जागतिक महिला दिनाला
अधिकृत मान्यता मिळाली.
१९९६   मध्ये पहिली महिला दि नाची थीम ठरवण्यात आली. 

celebrating the past planning for the future (भूतकाळाचा आनंद,
 भविष्यासाठी योजना)

1917 साली युद्धा दरम्यान रशिमांच्या महिलांनी ब्रेड आणि पीस (भाकरी आणि शांतता)  अशी मागणी केली .महिलांनी केलेल्या काम बंद आंदोलनाने सम्राट निकोसला पद सोडायला भाग  पाडले आणि त्यानंतर आलेल्या हंगामी सरकारने महिला ना मतदानाचाअधिकार दिला.

त्यावेळी राशियामध्ये ज्युलियन कैलेंडर वापरल जायच त्या दिवशी महिलानी  कामबंद आंदोलन पुकारले ती तारीख  23 फेब्रुवारी, ग्रेगरियन कॅलेंडरनुसार  हा दिवस 8 मार्च हो ता. आणि त्यामुळेच आंतरराष्ट्रीय महिला दिन  08 मार्च.रोजी साजरा केला जातो.




Comments

Popular posts from this blog

Syllabus B.SC.I.(2024-2025)

Syllabus BCA II (2025-26)