वाचन प्रेरणा दिन १६/१०/२०२१
मिसाईल मन म्हणून प्रसिद्ध असणारे शास्त्रज्ञ आणि भारताचे राष्ट्रपती भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा १५ ऑक्टोबर हा जन्म दिवस “वाचन प्रेरणा दिन” साजरा केला जातो.महाविद्यालयातील विद्यार्थ्याशी नेहमीच संवाद साधत असत.शनिवार दि.१६ ऑक्टोबर रोजी महाविद्यालयात मा.प्राचार्य डॉ.दिलीप पाटील यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले.ग्रंथालय विभाग प्रमुख श्रीमती सुस्मिता वाळके यांनी अग्निपंख,माझी जीवनयात्रा आणि टर्निंग पॉइंटस या पुस्तकाबद्दल माहिती दिली. विद्यार्थ्यांनी उस्फुर्तपणे डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम या विषयावर निबंध लेखन केले.या कार्यक्रमासाठी विद्यार्थी आणि प्राध्यापक उपस्थित होते.
Comments
Post a Comment