वाचन प्रेरणा दिन

 आधुनिक  स्फुर्तीकथा   :  श्रुती  पानसे                                            







                                    

डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या बाबतीत तरी  हे नक्की म्हणता येईल की ,बालपणातील स्वप्न आयुष्यात खरी होतात !

डॉ.अब्दुल कलाम यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 रोजी रामेश्वरम येथे झाला. या गावाचे वैशिष्ट्य म्हणजे इथला समुद्रकिनारा.गावातील सगळी लहान मुलं या समुद्राच्या अंगा - खांद्यावर वाढतात.कलाम यांच्या वडिलांचा व्यवसाय मासेमारी करणं आणि नावा चालवणं हा होता त्यामुळे लहानपणी वडिलांसोबत  ते समुद्रावर असायचे. वाळूत खेळणे आणि शिंपले गोळा करणं हा त्यांचा छंद होता. या  किनाऱ्यावर नेहमी सीगल पक्षी यायचे .या पक्षांचे निरीक्षण करणे त्यांना फार आवडायचं. एकदा त्यांना वडिलांकडून कळलं की हे पक्षी कितीतरी मैलांचा प्रवास करून येथे आलेले आहेत तेव्हा त्यांना सीगलविषयी  फारच कुतूहल वाटायला लागलं.हे पक्षी न  थकता एवढा प्रचंड अंतर कसे पार करतात ? आपल्यालाही असं उडता येईल का? त्यासाठी काय करावे लागेल? असे अनेक प्रश्न त्यांना पडायचे आपणही असंच आकाशात संचार करावा असं त्यांना वाटायचं हेच त्यांच्या लहानपणाचा पहिलं स्वप्न. आपण विमानाचा पायलट  व्हावा, विमानात बसणारा रामेश्वरममधला पहिला मुलगा आपणच असावं, असं स्वप्न  ते पाहत होते.

घर गरीब ; संस्कार श्रीमंत

कलाम यांच्या घरची परिस्थिती मात्र हे स्वप्न पूर्ण करता येण्याजोगा नव्हती त्यांचे आई-वडील दोघेही अशिक्षित होते . पण व्यवसाय पारंपारिक ज्ञान त्यांच्याकडे होते त्यामुळे आणि अनुभवाच्या शिदोरीत होऊन आपल्या मुलाला भरपूर शिकवलं आणि जैनुलब्दीन यांचा हा मुलगा मुळातच हुशार असल्यामुळे त्यांच्याकडून खूप काही शिकला प्रामाणिकपणा स्वयंशिस्त मूल्य जपणा-या गोष्टी त्यांनी लहान वयातच आई-वडिलांकडून घेतल्या.

कलाम यांचे प्राथमिक शिक्षण झालं ते रामेश्वरम मधल्या शाळेत. लहानपणी त्यांचे वडील आणि वडिलांचे मित्र रामेश्वर मंदिराचे प्रमुख पुजारी लक्ष्मणशास्त्री या दोघांच्यात अध्यात्म तत्त्वज्ञान या विषयावर चर्चा व्हायच्या .या चर्चा मधला  गाभिर्य कलाम यांना कळत होते.

शिक्षण  मिळत  गेलं

रामेश्वर मध्ये एक प्राथमिक शिक्षणाची सोय होती. माध्यमिक शिक्षणासाठी कलामना दुसऱ्या गावात रामनाथ पुरला जावेत जायला लागणार होतं तिथल्या शिक्षकांनी गणित आणि शास्त्र या विषयांची गोडी लावली .माध्यमिक शाळेतील शिक्षण संपल्यावर कलाम यांनी महाविद्यालयात प्रवेश घेतला त्यांची इच्छा होती पायलट होण्याची पण त्यासाठी कोणत्या प्रकारचे शिक्षण घ्यायला हवी हे त्यांना माहीत नव्हतं त्यांना हे मार्गदर्शन देणाराही कोणी नव्हतं .त्यामुळे बी.एस्सी. झाल्यावर विमान चालवायला मिळाल्यास या उद्देशाने त्यांनी अभियांत्रिकीला प्रवेश घेतला पण कॉलेजची फी भरायला त्यांच्याकडे हजार रुपये नव्हते. शेवटी बहिणीने दागिने गहाण ठेवून पैसे उभे केले .हे पैसे घेताना तिचे दागिने लवकरात लवकर सोडून आणायचं ठरवलं होतं त्याप्रमाणे त्यांनी प्रचंड मेहनत करून स्कॉलरशिप मिळवली आणि तिचे दागिने सोडवून आणले.

शिक्षण पूर्ण झाल्यावर कलाम नोकरी शोधू लागले जी नोकरी विमान चालवण्याची संधी देईल ती नोकरी करायची हे पक्क होते. त्यामुळे त्यांनी हवाई दलात नोकरी मिळण्यासाठी अर्ज केला संरक्षण खात्यात एका विशेष विभागात त्यांनी अर्ज करून ठेवला दोन्हीकडे नोकरी मिळण्याची दाट शक्यता होती पण कलामंच ओढा हवाईदलाच्या तिकडे जास्त होता पण त्यांना येथे नोकरी मिळाली नाही हवाई दलात आठ जागा होत्या त्यांच्या नवा नंबर आला. त्यांची निराशा झाली मात्र आता त्यांना नोकरी मिळाली की ते त्यांना प्रत्यक्ष विमान उडताना नव्हतं पण काम होतं विमानाच्या कानपूर येथे वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी म्हणून ते रुजू झाले

कानपूर नंतर कलाम यांची बदली झाली ती बंगलोरला येथे त्यांना स्वतःची क्षमता आजमावण्याची संधी मिळाली .हवाई दलासाठी संपूर्ण देशी बनावटीचे  हवरक्राफ्ट बनवण्याचं काम वरिष्ठांनी त्यांच्यावर सोपवली आहे. कलाम यांनी आपले संपूर्ण ज्ञान पणाला लावलं हातात घेतलेले काम पूर्ण होत नाही तोपर्यंत काही सुचत नसायचं काम करण्याची त्यांची इच्छा असणाऱ्यांनी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बघितले हे गुण बघून त्यांना इंडियन स्पेस रिसर्च मध्ये रॉकेट इंजिनीअरिंग नोकरीसाठी केलेला हा त्यांचा मोठा सन्मानच होता. पुढे त्यांना केरळमधल्या थुंबा अवकाश संशोधन केंद्रात नियुक्त केलेले काम जास्त होतं. अशा पद्धतीने त्यांच्यावर आणि कामाची जबाबदारी टाकण्यात आली खरोखरच महत्व आणि देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प होता स्वदेशी बनावटीची वेगळा प्रकल्प शेपणास्त्रा बनवायची म्हणजे तंत्रज्ञान तर आपला हवेत तसेच कच्चामाल आपल्याला हवा अशा सगळ्या पातळ्यांवर जोरदार तयारी सुरू झाली कलाम यांनी या प्रतिष्ठेच्या कामासाठी देशभरातील योग्य गुणवंत ची माणसं निवडली . या प्रकल्पासाठी सुमारे 40 संस्था आणि पाचशे इंजिनियर नेमले गेले.  हे सर्व लोक देशभरात विविध ठिकाणी काम करू लागले. हे काम सांभाळणाऱ्या सर्वांच्या कामाचा आराखडा ठरवला .त्यांना लागेल ती मदत करणं त्यांच्या पर्यंत नवीन तंत्रज्ञान पोहोचवणं कोणालाही कुठेही काही कमी पडणार नाही याची काळजी घेणे  अशी कितीतरी कामं होती हा सर्व पसारा कलाम  यांनी पेलला .लवकरच कामातून हवी तशी क्षेपणास्त्र तयार होऊ लागली सर्वात आधी जमिनीवर वरून जमिनीवर मारा करणारे पृथ्वी क्षेपणास्त्र तयार झालं 25 फेब्रुवारी 1988 या दिवशी चाचणी करायचं ठरलं ही चाचणी यशस्वी होणं हे कलाम यांच्या दृष्टीने महत्त्वाचं होतं आणि झालंही तसंच त्यांच्या अथक परिश्रमाचे फळ मिळालं पृथ्वी यशस्वी ठरेल ृथ्वी पाठोपाठ अगणित त्रिशूळ आकाश नाग क्षेपणास्त्र तयार झाली व बघता बघता देशी भाषांच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला देशाच्या 44 वा स्वातंत्र्यदिन अवकाशाची चाचणी करून साजरा झाला त्यामुळे आपला देश क्षेपणास्त्र असणारा जगातल्या मोजकाच राष्ट्रांमध्ये सामील झाला अशा रीतीने देशाला मिळवून देण्याच्या कामगिरीत कलाम आणि त्यांचे सहकारी यशस्वी झाली ही त्यांच्या आणि सहकार्‍यांच्या आयुष्यातील देशाच्या इतिहासातील एक सर्वोच्च कामगिरी ठरली

या सर्वोच्च कामगिरीमुळे अनेक मानसन्मान आणि कलाम यांना गौरवण्यात आलं .१९९०  मध्ये विद्यापीठाने त्यांना डॉक्‍टर ऑफ सायन्सची पदवी बहाल केली .या समारंभात डॉक्टर नेल्सन मंडेला यांना देखील डॉक्टरेट पदवी दिली गेली. अब्दुल कलाम यांनी लिहून ठेवले आहे मंडेला यांच्या सारख्या महान व्यक्ती सोबत ही पदवी स्वीकारताना मला संकोचल्यासारखं झालं होतं त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला साधेपणा या वाक्यामुळे दिसून येतो.

डॉक्टर कलाम यांच्या व्यक्तिमत्वाचे असे कितीतरी पैलू आहेत अशा जगावेगळ्या गुणांमुळेच आयुष्यात त्यांना अनेक मानसन्मान मिळाले. त्यातला सर्वोच्च सन्मान होता तो अर्थातच देशाचं राष्ट्रपतीपद भूषवलं याचा . त्यापूर्वी भारत सरकारने त्यांना भारतरत्न हा देशातील सर्वोच्च पुरस्कार देऊन  गौरवल  होते .प्रत्येक माणसाचे आयुष्य ही अडथळ्यांची शर्यत असते पण सर्वसामान्य माणूस एकदा पोटापाण्याला लागली की नाद सोडतात. जरा अवघड रस्ता बदलतात .जी माणसं कठीण अडथळे पार करत जगण्याचा मार्ग स्वीकारतात तीच मोठी होतात. असामान्य ठरतात अब्दुल कलाम या दुसऱ्या प्रकारात प्रकारातले आहेत.तरी प्रत्येक अडचणीवर मात करण्याची जिद्द त्यांनी सोडली नाही त्यांचा मोठेपणा या सतत संघर्ष करण्याच्या वृतीतच आहे .मोठ्या पुरस्कारामुळे आणि पदामुळे माणसांचा गौरव होतो खरा पण त्याच मोठेपण त्या पुरस्कारामुळे नसते तर वृत्तीमुळे असतं त्याला आयुष्यात काहीतरी घडवून दाखवायचा आहे त्या प्रत्येकाने डॉक्टर कलाम यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे.

 

 

 

 

Comments

Popular posts from this blog

Syllabus B.SC.I.(2024-2025)

Syllabus BCA II (2025-26)