महात्मा गांधी जयंती

 भारतीय स्वातंत्र्याचे शिल्पकार असे महात्मा गांधी यांना म्हणता येईल. म्हणूनच त्यांना राष्ट्रपिता असा दर्जा देण्यात आला आहे. आपल्या अहिंसात्मक आंदोलनाच्या माध्यमातून या देशाला स्वातंत्र्य मिळवून देणार्‍या महात्माजींचा जन्म ०२ ऑक्टोबर १८६९ रोजी गुजरातमधील पोरबंदर येथे झाला.

१९१५ पासून ते महात्मा म्हणून विख्यात झाले. १९१७ मध्ये त्यांनी चंपारण येथील शेतकर्‍यांच्या हक्कांसाठी आंदोलन केले. पुढे १९२०-२२ मध्ये अहिंसक असहकार आंदोलन, १९३०-३२ दरम्यान दांडी येथील मीठाचा सत्याग्रह आणि सविनय कायदेभंग येथे नेतृत्व  दिसून आले.
९ ऑगस्ट १९४२ ला त्यांनी मुंबईत करा किंवा मरा असे आवाहन जनतेला केले. त्यानंतर त्यांना अटक झाली. त्यांना पुण्यात आगाखान पॅलेस येथे ठेवण्यात आले. तेथे सहा मे १९४४ ला त्यांना सोडणअयात आले. त्यांनी अनेकदा उपोषणाचा मार्ग अवलंबून ब्रिटिश सरकारला जेरीला आणले. त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन अखेर पंधरा ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. पण त्यावेळी हा महात्मा नोआखालीत सुरू असेलली जातीय दंगल विझवण्यासाठी काम करीत होता. लोकांसाठी आयुष्याचा होम करणार्‍या महात्मा गांधींना एका असंतुष्टाने ३० जानेवारी १९४८ मध्ये गोळी घातली. त्यातच त्यांचे निधन झाले.

Comments

Popular posts from this blog

Syllabus B.SC.I.(2024-2025)

Syllabus BCA II (2025-26)