Current affairs
A)करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोणत्या राज्याने टीम – ११ नावाच्या आंतरविभागीय समितीची स्थापना केली होती? ( उत्तर प्रदेश) B)आरोग्य मंत्रालयाच्या अलीकडील घोषणेनुसार सुमारे ५० कोटी लोक कोणत्या योजनेंतर्गत मोफत COVID-19 तपासणी आणि उपचारांसाठी पात्र असतील?
उत्तर – आयुष्मान भारत – पंतप्रधान जनआरोग्य योजना
C) भारत सरकारने करोना व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी लोकांच्या जनजागृतीसाठी कोणता अॅप लाँच केला आहे? -आरोग्यसेतु
D)ऑपरेशन संजीवनीअंतर्गत भारताने कोणत्या देशाला आवश्यक औषधे आणि अन्नाचा पुरवठा केला?
उत्तर –मालदीव
E)RBI च्या अधिसूचनेनुसार, कॉर्पोरेट बाँडमध्ये विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीची नवी मर्यादा काय आहे?
उत्तर –१५ टक्के
F)कोणत्या कंपनीने केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि MyGov सोबत आपल्या मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर एक COVID-19 चॅटबोट लाँच केला आहे?
उत्तर –फेसबुक
G)अलीकडेच ए. रामचंद्रन यांचे निधन झाले. ते कोणत्या व्यवसायाशी संबंधित होते?
उत्तर –वैज्ञानिक
H)बेनी प्रसाद वर्मा यांचे अलीकडेच निधन झाले, ते कोणत्या राजकीय पक्षाचे संस्थापक सदस्य होते?
उत्तर – समाजवादी पार्टी
I)इंडिया रेटिंग्ज (Ind-Ra) नुसार आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये भारताचा जीडीपी विकास दर किती राहील?
उत्तर –३.६ टक्के
J)कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने लॉकडाऊनकाळात देशात फसलेल्या परदेशी पर्यटकांच्या मदतीसाठी ‘Stranded in India’ पोर्टल सुरू केलं आहे?
उत्तर –पर्यटन मंत्रालय
Comments
Post a Comment