रंगनाथन.एस.आर.जयंती
शियाळि रामामृत रंगनाथन् : जन्म १२ ऑगेस्त १८९२ - मृत्यू २७ सप्टेंबर १९७२ हे एक भारतीय गणितज्ञ आणि पुस्तकालयतज्ञ होते.भारतीयांमध्ये वाचनसंस्कृती अधिकाधिक रुजावी यासाठी डॉ. रंगनाथन् यांनी ग्रंथालयशास्त्र आणि त्याच्या विकासात मोलाचे योगदान दिले.
डॉ.रंगनाथन् यांचा जन्म मद्रास प्रांतातील (सध्याचे चेन्नई) तंजावर जिल्ह्यातील शियाली या छोट्याशा गावात 12 ऑगस्ट 1892 साली झाला. त्याचे प्राथमिक शिक्षण शियाली येथील हिंदू हायस्कूलमध्ये झाले. विद्यार्थीदशेपासून त्यांनी संस्कृत वाङ्मयाचे अध्ययन सुरु केले होते. नंतर मद्रास येथील ख्रिश्चन कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन इंग्रजी विषयात बी.ए.ची पदवी प्राप्त केली.
शिक्षण मिळविणे सोपे आहे, पण शिक्षण देणे हे एक शास्त्र आहे, हे लक्षात आल्यानंतर त्या शास्त्राचा अभ्यास करण्याचे ठरवून अध्यापनशास्त्राची ‘एल. टी.’परीक्षा उत्तीर्ण केली आणि गणिताचे प्राध्यापक झाले. नंतर प्राध्यापकाची नोकरी सोडून ते मद्रास विद्यापीठात ग्रंथपाल म्हणून काम पाहू लागले.
सुसंस्कृत समाजनिर्मितीसाठी शालेय शिक्षणासोबतच निरंतर शिक्षणदेखील किती आवश्यक असते, याची महत्त्व डॉ. रंगनाथन् यांनी सर्वप्रथम पटवून दिले. त्याकरिता ग्रंथालयांचा विकास, प्रसार होऊन देशातील सर्वसामान्याना ज्ञानाची कवाडं विनामूल्य खुली करून द्यायला हवी, यासोबत वाचनसंस्कृती रुजवण्यासाठी जनतेला करण्याकरिता प्रवृत्त केले पाहिजे, हा विचार डॉ. रंगनाथन् यांनीच सर्वप्रथम देशात रुजवला.
आधुनिक भारतातील ग्रंथालयांच्या विकासात डॉ. रंगनाथन् ह्यांचा फार मोठा वाटा आहे. देशातील सर्वसामान्यांना ज्ञानाची कवाडं विनामूल्य खुली करण्याचा विचार सर्वप्रथम डॉ. रंगनाथन् ह्यांनीच रूजवला. नंतर तो जोपासण्यासाठीही आपले संपूर्ण आयुष्य झिजवले. डॉ. रंगनाथन् ह्यांनी मांडलेले ग्रंथालयशास्त्राचे पाच सिद्धांत हे भारतीय ग्रंथालयशासत्राचा पाया समजला जातो. डॉ. रंगनाथन् ह्यांचा जन्मदिन भारतात ग्रंथपाल दिन म्हणून साजरा केला जातो.
Comments
Post a Comment