पु ल. समगर्तेला व्यापणारा कलावंत ---–------------------------------------------- प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९०) पुलं उर्फ पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे म्हणजे महाराष्ट्राच्या साहित्य, संगीत, चित्रपट, दूरदर्शन ,संस्कृती,दातृत्व अशा विविध क्षेत्रातील एक अष्टपैलू कलावंत. ” महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व “ही उपाधी जनतेने त्याला दिली होती. ८ नोव्हेंबर १९१९ रोजी जन्मलेले पुलं १२ जून २००० रोजी कालवश झाले. शेवटची काही वर्षे त्यांना कंपवाताच्या आजाराने घेरले होते. त्यांना जाऊन एकवीस वर्षे झाली तरीही त्यांच साहित्य सांस्कृतिक क्षेत्रातील गारुड अद्याप ओसरलेल नाही.त्यांच्यावर दोन भागात चित्रपट काढावा लागणे हे त्याचे द्योतक आहे. ‘ ‘ ‘ ‘ समाजाच्या समग्र संस्कृतीला व्यापुन उरणारा कलावंत’ अशा शब्दात त्यांचा गौरव केला गेला होता. पुलंचे वडील हे नाट्य – संगीत प्रेमी होते. तर त्यांच्या आईचे वडील म्हणजे पुलंचे आजोबा वामन मंगेश दुभाषी हे लेखक होते. पुलंचे प्राथमिक ,माध्यमिक शिक्षण मुंबईत झाले.तर इस्माईल युसुफ कॉलेज (मुंबई), फर्ग्युसन कॉलेज ( पुणे) आणि विलिंग्डन महाविद्यालय (सांगली )याठिकाणी