श्री.प्रसाद कुलकर्णी :राजर्षी शाहू महाराज
श्री.प्रसाद कुलकर्णी : राजर्षी शाहू महाराज शुक्रवार ता.२६ जून २०२० हा लोकराजे छत्रपती शाहूमहाराजांचा १४६ वा जन्मदिन.युगकर्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर आपल्या कार्याचा आणि विचारांचा ठसा पुढील अनेक पिढ्यांवर आजतागायत जे उमटवत राहिले आहेत त्यात लोकराजे शाहू महाराज यांचे नाव घ्यावे लागेल.सामाजिक न्यायाच्या प्रस्थापनेला अग्रक्रम देणारे ते जाणते राजे होते.’एक वेळ गादी सोडून देईन पण बहुजनोद्धाराचे कार्य सोडणार नाही असे म्हणणारे ते दुर्मिळ राजे होते. छत्रपती शाहू महाराजांना उत्तरप्रदेशातील कानपुर येथे कुर्मी समाजाने २५ एप्रिल १९१९ रोजी ‘राजर्षी ‘ही पदवी दिली.त्याला गतवर्षी शंभर वर्षे पूर्ण झाली. तसेच शाहू महाराज प्रमुख पाहुणे आणि पुढे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार व भारतरत्न ठरलेले डॉ.बाबासाहेब आंबेडकर अध्यक्ष असलेल्या ‘माणगाव ‘परिषदेचेही हे शताब्दी वर्ष झाले. शाहूरायांच्या कोल्हापूर संस्थानातील ‘माणगाव’येथे २१ व २२ मार्च १९१९ रोजी अखिल महाराष्ट्र अस्पृश्य वर्गाची परिषद झाली होती. फुले,शाहू व आंबेडकर ही विचा...
Comments
Post a Comment