महात्मा बसवेश्वर जयंती
महात्मा बसवेश्वर जयंती
वैशाख शुद्ध तृतीया म्हणजेच अक्षय तृतीया बसवेश्वरांचा जन्म इ.स. ११०५ मध्ये कर्नाटक राज्यातील विजापूर जिल्ह्यात बागेवाडी नावाच्या तालुक्याच्या गावी इंगळेश्वर बागेवाडी येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव मादिराजा .बागेवाडी हे गाव अग्रहार म्हणून प्रसिद्ध होते बसवेश्वरांचे वडील या आग्रहाचे प्रमुख होते .ते पाचशे ब्राह्मणांचे प्रमुख होते .म्हणजेच बसवेश्वरांचे घराणे वेदशास्त्रसंपन्न आणि विद्वान आराध्य दैवत ब्राह्मणांचे होते .लहान वयातच बसवेश्वरांना वेदरचना पाठ झालेल्या होत्या त्यामुळे आपला वारसा पुढे चालवावा असे त्यांच्या वडिलांना वाटे .पण प्रत्यक्षात काही वेगळेच घडले अर्थ हीन पाठांत पेक्षा अर्थ जाणून घ्यावा व त्याप्रमाणे आपले आचरण करावे असे बसवेश्वरांना वाटत होते. वेदांचा अर्थ न समजता उच्चारण करणे म्हणजे कापडाची ओझी वाहणारी गाढवे होत असे त्यांना वाटे. लहानपणापासून बालपणापासून ते प्रत्येक बाबीकडे चिकित्सक पद्धतीने पाहत असत. प्रथेप्रमाणे त्यांच्या वडिलांनी वयाच्या आठव्या वर्षी उपनयन संस्काराचा विचार करण्यास प्रारंभ केला. या गोष्टीला बसवेश्र्वरांनी विरोध केला वयाच्या सोळाव्या वर्षी कुडलसंगम या गावी आले .या कुडल संगम येथील वास्तव्याने बसवेश्वरांच्या व्यक्तिमत्वाला एक प्रकारची प्रखरता तेज आणि सर्वसमावेशकता प्राप्त झाली. कुडलसंगम येथे त्यांनी अनेक ग्रंथांचे वाचन चिंतन व मनन केले. अनेक तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला. त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास झाला व ते प्रगल्भ झाले. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या प्रभावाने अनेकां नी लक्ष वेधून घेतले याच काळात ते समाजाची सूक्ष्म निरीक्षण करत होते.कुडल संगम येथे एक तपाचा काल व्यतीत केला . त्यांची अध्यात्मिक प्रगती झाली .जगात सार्वभौम सर्वश्रेष्ठ असा एकच ईश्वर आहे तो परिपूर्ण सर्वशक्तिमान सर्वव्यापी सर्वज्ञ सर्वत्र आहे तो एकाच वेळी अनेक रुपात वावरत असतो .समाजात आमूलाग्र बदल होण्यासाठी भक्तीचा मार्ग हाच एक उपाय असल्याचे त्यांना जाणवले. मग ते कोणत्याही जातीचे धर्माचे,
व्यवसायाची असोत त्यांच्यात कोणीही लहानथोर नाही सर्वजण समान आहेत असे त्यांना वाटे. माणूस जन्माने किंवा जातीने लहान-मोठा ठरविला जातो पण ते योग्य नाही . मोठेपण त्याच्या कामावर म्हणजे प्रत्यक्ष कार्यावर असावे .आपला देह हेच मंदिर आहे .आपले काम हे प्रामाणिकपणे निष्ठेने आणि श्रद्धापूर्वक करणे हीच ईश्वराची खरी पूजा होय .लोकांचे मतपरिवर्तन आणि मन परिवर्तन करण्याची शक्तीच त्यांना प्राप्त झाली होती बाराव्या शतकात विविध क्षेत्रात सकारात्मक परिवर्तन आकारात आणले. लिंगायत धर्माला गतिमान करणे हे त्यांच्यापुढे आव्हान होते त्यासाठी त्यांनी या समाजाला एकीकडे वैचारिक धक्के दिले तर दुसरीकडे नवीन विचारांना वास्तवात उतरवले. नवीन मूल्यांची प्रस्थापना केली. लोकचळवळ उभारली व समाजमनात नवचैतन्य निर्माण केले .प्रत्येक नवीन कल्पना समाजात रुजवल्या आणि समाजाला गतिमान केले. त्याच वेळी कायक आणि दासोह या दोन अभिनव आणि क्रांतिकारी कशा संकल्पनांचा समावेश केला.
कायक म्हणजे काम,श्रम काया या संस्कृत शब्दापासून कायक शब्दाची व्युत्पत्ती झाली .काया म्हणजे देह ,शरीर आणि कायक म्हणजे व्यवसाय-धंदा रोजगार कर्तव्य ,काम ,कार्य आणि उपजीविकेसाठी केलेले कष्ट होय. कोणत्याही व्यवसायात प्रामाणिकपणे कष्ट मेहनत श्रम यांचा समावेश असावा .बाराव्या शतकात श्रमाला कवडीमोल समजणाऱ्या समाजात श्रमाला प्रतिष्ठा मिळवून देण्याचे योगदान यांनी केले .काम कोणतेही कसल्याही प्रकारचे असो ते जर निष्ठेने आणि प्रामाणिकपणे, फळाची अपेक्षा न धरता केले तर ईश्वर पूजा ही संकल्पना सामान्य माणसात रुजवली .आपल्या कामात इतके तल्लीन व्हावे की आपल्याला जगाचा विसर पडावा. त्यांचे सर्व तत्त्वज्ञान समाजनिष्ठ होते प्रपंचाला टाळून परमार्थ साधता येत नाही तसेच संन्यास घेऊन जीवनापासून पलायन करणे त्यांना अमान्य होते तर माणसाने संसारात प्रामाणिकपणे कष्ट करून जगणे मोलाचे वाटते. त्यांचे विचार प्रत्यक्ष जगण्याशी संबंधित होते .जो माणूस आपल्या श्रमाने घामाने काळी माती भिजवतो त्यासाठी परिश्रम करतो तीच खरी शिवपूजा. श्रमिकांच्या झोपडीला कैलास मानतो तोच खरा शिवभक्त. मातीतून पिकवले जाणारे धान्य हेच पूजेचे साधन होय आजही आपल्याला कायक वगैरे अशी संकल्पना आठवते कारण समाजात काम टाळण्याची प्रवृत्ती आणि जबाबदारी दुसऱ्याला ढकलण्यात प्रावीण्य प्राप्त केलेले लोक समाजात आढळतात. कैलास म्हणजे मानवी जीवन सुंदर असून माणसाने आनंदाने जगले पाहिजे या जगला या जगातच कैलास आहे .
प्रत्येकाने आपल्या कामाचा योग्य मोबदला घेतला पाहिजे तसेच योग्य मोबदला पेक्षा जास्त किंवा कमी मोबदला घेणे हे पाप आहे असे समाजामध्ये रुजवण्यासाठी प्रयत्न केले. त्याचप्रमाणे आपण केलेली काम आणि त्याचा मोबदला एकट्या पुरता मर्यादित नसून समाजा चा आहे .आपल्या कमाईतील काहीसा समाजासाठी राखून ठेवणे म्हणजेच दासहो ही संकल्पना जनमानसात बसपाने रुजवली .लिंगायत धर्मात प्रत्येकाने कोणते ना कोणते काम केलेच पाहिजे असता दंड क ठरवला होता त्यामुळे माणसे आळशी न राहता कष्टाचे जीवन स्वीकारू लागली समाजातील सामान्य माणूस जंगम गुरु आणि भक्त या सर्वांनी उदरनिर्वाहासाठी काम करणे बंधनकारक ठरले. आपण स्वकष्टाने कमावलेले धन केवळ स्वतःसाठी न वापरता त्याचा हिस्सा समाजासाठी वापरावा ही संकल्पना त्यावेळी समाजात रुजवली.समता, लोकशाही, विचारस्वातंत्र्य आणि मुक्त चर्चेत सर्वांना स्थान या मूल्यांचा पुरस्कार केला. प्रतिकूल परिस्थितीत समाज परिवर्तनासाठी मोलाचे सहकार्य केले आहे.
YouTube link:
डॉ. सुरज चौगुले
प्रा.राजा माळगी
पुष्पा वाळके
Comments
Post a Comment