जागतिक पुस्तक दिन
जागतिक पुस्तक दिन आणि स्वामित्व हक्क दिन
जागतिक पुस्तक दिन
पुस्तकांची सफर ✈️Click here..
कोरोनाच्या गडद आणि भीतीदायक सावटाखाली जगभरातील शंभरहून अधिक राष्ट्रे 23 एप्रिल ला जागतिक पुस्तक दिन साजरा करीत आहेत. वाचन, प्रकाशन, कॉपी-राइट या विषयांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी यूनेस्कोला २३ एप्रिल १९९५ ला पॅरिस येथे सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेतला. भारतात २००१ पासून हा दिवस साजरा होतो. प्रसिद्ध नाटककार विल्यम शेक्सपियर, स्पेनमधील सर्वेंटेश, गार्सिल सो डे ला डेगा या लेखकांचा २३ एप्रिल हा मृत्युदिन. शेक्सपियरचा जन्म व मृत्यूदिन २३ एप्रिलच आहे. या पूर्वी स्पेनमध्ये २३ एप्रिलला रोज डे साजरा होई. पण सर्वेंटीसच्या मृत्यूनंतर गुलाबा ऐवजी पुस्तके भेट द्यायला सुरुवात झाली. इंग्लंडमध्ये मार्च महिन्याच्या पहिल्या गुरुवारी हा दिवस साजरा होतो. दरवर्षी जागतिक पुस्तक राजधानी निवडण्यात येते. २०१६ ला व्रोकलॉ (पोलंड), २००३ (दिल्ली), २०१९ (शारजाह), २०२० (कोलांलपूर, मलेशिया) ही काही जागतिक पुस्तक राजधानीची ठिकाणे होत. हा दिवस पुस्तक व लेखकांना समर्पित आहे. दरवर्षी काही पोस्टर्स, theme विषयी वाक्ये तयार होतात. कथेत सहभागी व्हा, वाचन माझा अधिकार, जग वाचा, पुस्तके वाचा, बुद्धिमान बना, पुस्तके आणि अनुवाद, लेखनापासून डिजिटल पर्यन्त, संस्कृती / भाषेचे आंतरराष्ट्रीय वर्ष, आनंदाचे तास, या घोष वाक्यावरुन पुस्तक दिनानिमित्त वाचना विषयी जाणीव जागृतीचा प्रयत्न दिसून येतो. मराठी भाषेत दरवर्षी पाच हजारच्या दरम्यान पुस्तके प्रकाशित होतात. मात्र मराठी ग्रंथ व्यवहारात पुस्तक रखडणे हा नियम आणि चालणे हा अपवाद ठरतो आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पुस्तके नीट ठेवता येतील असे घर बांधले होते. उत्तम लेखक हा उत्तम वाचक असतोच असतो. सतत वाचन करणाराची पावले हमखासपणे लेखनाकडे वळतात आपली वाचन संस्कृती परंपरागत मौखिक परंपरा आणि इंटरनेटमुळे आलेली ई-बुक्स यांच्या दरम्यान आहे. आपल्याकडे चांगल ऐकण वाचनाच्या बरोबरीच मानल जात. म्हणून तर इंग्रजीतील वेलरेड (well read) या शब्दाचे भाषांतर बहुश्रुत म्हणजे उत्तम नी ऐकलेला असे आहे. वाचन प्रेरणा दिनाप्रमाणेच जागतिक पुस्तक दिन वाचन या विषयाबद्दल जाणीव जागृती निर्माण करण्यासाठी उपयुक्त ठरत आहे.
शेक्सपिअर --
सर्व नाटककार शहाणे असतात, अशा हजारो नाटककारांमधून एक महान नाटककार घडत असतो. शेकडो महान नाटककारांमधून एखादा सर्वकालीन बनतो. "जगामध्ये माणसाच्या सहजसुंदर, आश्चर्यकारक, विद्रूप आणि अनाकलनीय मनाचे मनकवडे ठरलेले फारच कमी नाटककार झाले आहेत". अशा सर्व नाटककारांचा कर्णधार म्हणून विल्यम शेक्सपियर शोभू शकतो कारण त्याने त्याच्या शोकांतिकांमध्ये निर्माण केलेली पात्रे कालातीत ठरत नाहीत... ती.. जगतायत.. अजून ही.. या ऐलतटावर किंवा त्या पैलतटावर... म्हातारपणात खोकत बसलेले कितीतरी रिटायर्ड किंग लियर तुम्हाला आढळतील, कोणत्या ना कोणत्या तरी सूड भावनेने पेटून उठलेला हॅम्लेट तुमच्या अवतीभवती दिसेल, सच्छिल स्वभावाच्या बायकोवर संशय घेऊन तिच्या डोक्यात दगड घालणारा झोपडपट्टी मधल्या एखाद्या ऑथेल्लो बद्दल तूम्ही ऐकलं असेल. खेडेगावातील फुकाच्या राजकारणातल्या महत्वकांक्षेने पोखरलेला एखादा मॅकबेथ तुम्हाला सापडेल. प्रेमात वेडे झालेले रोमियो आणि गच्ची - गच्चीवर केसांच्या बटींशी खेळणाऱ्या ज्युलिएट यांची तर गणतीच नाही.. आज 23 एप्रिल... विल्यम शेक्सपियर चा जन्मदिवस आणि मृत्युदिन सुद्धा.. हाच दिवस "जागतिक ग्रंथ दिन म्हणून ओळखला जातो"
📖📕📗📘📙📖
*सर्वांना पुस्तक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!*
Comments
Post a Comment