भारताचे मिसाईल मॅन डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम
भारताचे मिसाईल मॅन डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम
वास्तविक नाव (Real Name)
अब्दुल पकिर जैनुलाब्दिन अब्दुल कलाम
जन्मतिथी (Birthday)
१५ ऑक्टोबर १९३१, रामेश्वर, तमिळनाडू, ब्रिटीश भारत
वडिलांचे नाव (Father Name)
जैनुलाब्दिन मारकयार
आईचे नाव (Mother Name)
आशिमा जैनुलाब्दिन
विवाह (Wife Name)
अविवाहित
शैक्षणिक योग्यता (Education)
१९५४ मध्ये, मद्रास विश्वविद्यालयामधून,
एफिलिएटेड सेंट जोसेफ कॉलेजमधून
भौतिकशास्त्र विषयाची पदवी घेतली.
मृत्यू तिथी(Death)
२७ जुलै २०१५, शिलांग, मेघालय, भारत.-
राजकारणाशी कोणताच संबंध नसणारे देशाचे पहिले राष्ट्रपती अब्दुल कलाम
एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्म १५ ऑक्टोबर १९३१ रोजी रामेश्वरम, तामिळनाडू येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव अबुल पाकीर जैनुलाबद्दीन अब्दुल कलाम आहे. क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात केलेल्या महत्त्वपूर्ण कामांमुळे त्यांना मिसाईल मॅन म्हणूनही ओळखले जाते. ते भारतीय प्रजासत्ताकचे अकरावे निवडलेले राष्ट्रपती झाले. भारतरत्न एपीजे अब्दुल कलाम हे भारताचे माजी राष्ट्रपती, सुप्रसिद्ध वैज्ञानिक आणि अभियंता (अभियंता) म्हणून प्रख्यात आहेत.
भारताचे “मिसाइल मॅन” म्हणून जगात प्रसिद्ध असणारे अब्दुल कलाम यांनी भारताच्या “अग्नी” क्षेपणास्त्राला उडान दिले होते. तसेच त्यांनी भारताला “अणु शक्ती” च्या बाबतीत एक संपन्न राष्ट्र बनविले.विज्ञान आणि भारतीय संशोधन आणि संरक्षण क्षेत्रात त्यांच्याद्वारे देण्यात आलेल्या महत्वपूर्ण योगदानामुळे ते संपूर्ण विश्वात इतके प्रसिद्ध झाले होते.अब्दुल कलाम यांची प्रसिद्धी पाहून त्यांना सण २००२ साली NDA च्या युती सरकारने राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी त्यांना आपला उमेदवार म्हणून घोषित केले होतं, आणि विरोधी पक्षाने सुद्धा त्यांचा कुठल्याच प्रकारे विरोध न करता राष्ट्रपती पदासाठी स्वीकार केला.
अब्दुल कलाम हे भारताचे पहिले असे राष्ट्रपती झाले होते, ज्यांचा राजकारणाशी कुठल्याही प्रकारचा कसलाच संबंध नव्हता. त्याचप्रमाणे ते देशातील पहिले असे वैज्ञानिक होते जे राष्ट्रपती पदावर विराजमान झाले.भारताच्या राष्ट्रपती पदी विराजमान होणारे अब्दुल कलाम हे एक महान वैज्ञानिक असल्याने देशातील सर्वच वैज्ञानिकांची मान अभिमानाने उंचावली गेली.
अब्दुल कलाम राष्ट्रपती पदावर विराजमान असतांना सुद्धा लोकांना भेटत असत. सर्वसाधारण लोकांच्या प्रती त्यांच्या मनात खूपच भाव होता त्यामुळे ते लोकांच्या समस्येबाबत नेहमी तत्पर राहत होते.आपल्या या लाडक्या राष्ट्रपतींना जेव्हा देशातील नागरिक पत्र पाठवीत असत, त्यावेळेला ते स्वत: त्या पत्रांना उत्तर देण्यासाठी आपल्या हातांनी पत्र लिखाण करीत असत.याच कारणामुळे ते देशाच्या जनतेत लोकप्रिय होते, आणि त्यांना “लोकांचे राष्ट्रपती” (पीपुल्स प्रेसिडेंट) देखील म्हटल्या जात होतं.
अब्दुल कलाम राष्ट्रपती पदावर असतांना त्यांनी २००१ साली संसदेवर हल्ला करणाऱ्या मध्ये दोषी ठरलेल्या कश्मीरी आतंकवादी अफजल गुरु सोबतच २१ लोकांनी दयेची याचिका त्यांच्याकडे सोपवण्यात आली होती.परंतु त्यांनी २१ पैकी फक्त एकाच याचिकेवर दया दाखवल्यामुळे त्यांना लोकांच्या टीकेला सामोरे जावे लागले.
राष्ट्रपती पद सोडल्यानंतरचा प्रवास :
भारताचे महान वैज्ञानिक म्हणून ख्याती मिळविणारे डॉ. अब्दुल कलाम यांनी भारताचे ११वे राष्ट्रपती म्हणून पाच वर्ष कार्यभार सांभाळला होता. देशाच्या प्रती आपली सेवा देऊन सुद्धा ते आपल्या कामाप्रती खूपच प्रामाणिक आणि निष्ठावंत राहिले.अब्दुल कलाम यांनी गेस्ट प्राध्यापक म्हणून बऱ्याच इन्स्टिट्यूट मध्ये आपले योगदान दिल होतं, जसे की, ते अतिथी प्राध्यापक म्हणून इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, शिलांग, इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट इंदोर, इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबाद यासारख्या संस्थेशी संबंधित ते जुडले गेले होते.अब्दुल कलाम यांनी प्राध्यापक असतांना आयआयटी हैदराबाद, अण्णा विद्यापीठ आणि बनारस हिंदू विद्यापीठ (बीएचयू) येथेही त्यांनी माहिती तंत्रज्ञान शिकवले.या व्यतिरिक्त अब्दुल कलाम यांनी बंगळुरूच्या भारतीय विज्ञान संस्थानचे सहकारी म्हणून देखील काम केल होतं.तिरुअनंतपुरम मधील भारतीय अंतरिक्ष विज्ञान व तंत्रज्ञान चे कुलगुरू पद सुद्धा त्यांनी सांभाळल होतं.तसेच चेन्नई येथील अण्णा विद्यापीठा अंतर्गत येणाऱ्या एरोस्पेस अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून जीवनाच्या शेवटच्या क्षणा पर्यंत काम करत राहिले.
अब्दुल कलाम यांचे विचार खूपच प्रभाशाली होते, त्यांची आपल्या देशाबद्दल असणारी विचारशैली नेहमी सकारात्मक होती.ते आपल्या देशाच्या विकास आणि प्रगती बद्दल विचार करणारे महान व्यक्ती होते.अब्दुल कलाम यांनी आपल्या देशातील तरुणांचे भविष्य उज्वल करण्यासाठी आणि आपला भारत देश भ्रष्टाचारमुक्त बनवा या उद्देश्याने त्यांनी “व्हाट कैन आई गिव”(“मी काय देऊ शकतो”) हा उपक्रम राबवला होता.अब्दुल कलाम यांनी देशातील जनतेच्या मनात स्वत: बद्दल आदर आणि आपुलकीची भावना निर्माण केली होती. अश्या या महान नेत्याला आपल्या देशातील विद्यार्थ्यान प्रती खूपच आकर्षण होतं.
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची पुस्तके
‘इंडिया २०२०: अ विजन फॉर द न्यू मिलिनियम’,
‘इग्नाइटेड माइंडस: अनलीशिंग द पॉवर विदिन इंडिया’,
‘विंग्स ऑफ़ फायर: ऐन ऑटोबायोग्राफी’,
‘इंडोमिटेबल स्पिरिट’
‘मिशन इंडिया’
एडवांटेज इंडिया
”यू आर बोर्न टू ब्लॉसम”
‘इन्सपायरिंग थोट्स’
”माय जर्नी”
”द ल्यूमिनस स्पार्क्स”
रेइगनिटेड
अब्दुल कलाम यांना मिळालेले पुरस्कार आणि त्यांचे कर्तुत्व :
अब्दुल कलाम यांनी देशाच्या विविध क्षेत्रात आपले महत्वपूर्ण योगदान दिल आहे. त्यांनी तंत्रज्ञान आणि विज्ञान क्षेत्रा बरोबरच सामाजिक क्षेत्रात देखील तितकेच महत्वपूर्ण योगदान दिल आहे. यामुळेच त्यांना देशातील सर्वात मोठ्या असणाऱ्या “भारत रत्न” पुरस्कार देऊन गौरविण्यात आल होतं.या पुरस्कारा बरोबर त्यांना पद्म भूषण, पद्म विभूषण पुरस्कारा सारख्या अनेक पुस्काराने सन्मानित केल गेल आहे.याव्यतिरिक्त अब्दुल कलाम यांना जगातील ३५ पेक्षा जास्त विध्यापिठांनी डॉक्टरेट पदवी(मानद) देऊन त्यांना गौरविण्यात आल आहे.
वर्ष १९९७ – भारतातील सर्वोच्च पुरस्कार भारत रत्न देऊन गौरविण्यात आलं.
वर्ष १९९० – भारत सरकार मार्फत पद्म विभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं.
वर्ष १९८१ – भारत सरकारने पद्म भूषण पुरस्कार देऊन गौरविल.
वर्ष २०११ – IEEE होनोअरी मेंबरशिप(मानद सदस्यता)
वर्ष १९९७ – इंदिरा गांधी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
वर्ष १९९८ – भारत सरकार तर्फे वीर सावरकर पुरस्कार देण्यात आला.
वर्ष २००० – अलवर रिसर्च सेंटर, चेन्नईतर्फे रामानुजन पुरस्कार देण्यात आला.
वर्ष २०१५ – संयुक्त राष्ट्र संघाने कलाम जी यांची जयंती “जागतिक विद्यार्थी दिन” म्हणून मान्य केली.
अब्दुल कलाम याचे महान विचार :
“आपण करत असलेल्या कामात अपयश आल्यास पुन्हा प्रयत्न करणे कधीच थांबू नका”. या ठिकाणी FAIL ( अपयश) चा अर्थ होतो- First Attempt in Learning.
आपल्याला मिळालेल्या पहिल्या यशा नंतर आराम करण्याबाबत कधीच विचार करू नका. कारण यानंतर जर आपल्याला अपयश मिळाले तर सर्व लोक हेच म्हणतील की याच्या पहिले मिळालेले यश हे नशिबाने मिळाले असेल.
सर्जनशीलता म्हणजे एकाच गोष्टी बद्दल वेगवेगळ्याप्रकारे विचार करणे.
जर आपणास सूर्या सारखे चमकायचे असेल तर पहिले त्याच्यासारखं जळाव लागेल.
आपण आपल्या आयुष्यात हार कधीच नाही पत्कारली पहिजे, आणि जीवनात येणाऱ्या समस्यांन समोर कधीच हरू नका.
कोणतेही शिखर गाठण्यासाठी आपल्या मनात आत्मविश्वास असणे आवश्यक आहे, मग ते माउंट एवरेस्ट चे शिखर असो किंवा आपल्या व्यवसायाचे.
अब्दुल कलाम यांचे निधन :
आपल्या भारत देशाला “अणुशक्ती संपन्न” बनवणारे अब्दुल कलाम यांना विद्यार्थ्यांन सोबत वेळ घालवणे खूप आवडत असे.प्रत्येक वेळेस त्यांनी एक प्राध्यापक म्हणून विद्यार्थ्यांची जिज्ञासा शांत करण्याचा प्रयत्न करत राहिले.
25 जुलै 2015 रोजी कलाम जी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, शिलांग (आयआयएम, शिलांग) येथे आयोजित कार्यक्रमात व्याख्यान देत असतांना अचानक पणे त्यांची तब्येत खराब झाली.यानंतर त्यांना तात्काळ शिलांग येथील दवाखान्यात भरती करण्यात आलं. दवाखान्यात भरती केल्यानंतरही त्यांच्या तब्येतीत कोणत्याच प्रकारची सुधारणा होत नव्हती. परिणामी याच ठिकाणी त्यांनी आपल्या जीवनातील अंतिम श्वास घेतला.अब्दुल कलाम यांच्या सारख्या महान व्यक्तिमत्व असणाऱ्या व्यक्तीने भारतात जन्म घेणे, ही नक्कीच आपल्या देशासाठी मोठ्या अभिमानाची गोष्ट आहे.अब्दुल कलाम यांच्या जीवनातून आपल्याला खूप काही शिकण्यासारख आहे, त्यांनी त्यांच्या जीवनात केला असलेला शिक्षणासाठी चा संघर्ष आपल्याला आयुष्यात जगण्यासाठी प्रेरणा देतो."अध्यापन हा एक अतिशय उदात्त व्यवसाय आहे जो एखाद्या व्यक्तीचे चरित्र, क्षमता आणि भविष्य घडवितो. जर लोकांनी मला एक चांगला शिक्षक म्हणून लक्षात ठेवले तर ते माझ्यासाठी सर्वात मोठा सन्मान असेल." या त्यांच्या विचाराचे अवलोकनार्थ त्यांचा जन्म दिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जात आहे.
Comments
Post a Comment