आपण साऱ्या सुग्रणी - उपवासाचे पदार्थ

)साबुदाण्याची खिचडी

साहित्य – २ वाटया साबुदाणा, १ वाटी दाण्याचे कूट, ४-५ हिरव्या, एका बटाटयाच्या फोडी, १ डाव ताक, मीठ, १/२ चमचा साखर, तूप.

कृती – साबुदाणा २ तास अगोदर धुवून ठेवावा. नंतर त्यात दाण्याचे कूट व मीठ कालवून ठेवावा. नंतर तूपाची जिरे घालून फोडणी करावी. त्यात मिरच्यांचे तुकडे व बटाटयाच्या फोडी घालून ढवळावे. झाकण ठेवावे व वाफ आणावी. बटाटे शिजले की त्यात साबूदाणा घालावा. थोडे ताक घालावे व थोडी वाफ येऊ द्यावी. मधून मधून हलवावे. साबुदाणा शिजला की खाली उतरावे.


२)sabudana-vadaसाहित्य – १ वाटी साबुदाणा (भिजवून अडीचपट होतो), दाण्याचे कूट भिजलेल्या साबुदाण्याइतके, १ चमचा जिरे, वर्‍याचे तांदूळ बारीक करून वाटून, १ मोठी वाटी रिफाइन्ड तेल, चवीप्रमाणे मीठ, लाल मिखट १ चमचा.

कृती – साबुदाणा चोळून पीठ बाजूला करावे. वडे करण्याच्या आधी ३-४ तास साबुदाणा भिजवावा. साबुदाणा भिजला की त्यात दाण्याचे कूट, तिखट, मीठ, जिरे मिसळून एकजीव करावे. पाणी न लावता मिश्रण मळावे. मग त्यावर तसराळे पालथे ठेवावे व घट्ट पिळलेले ओले फडके पसरावे. नंतर प्रत्येक वडा पाण्याच्या हाताने शक्य तितका पातळ थापावा व तळण्सीत सोडावा. कडेपर्यंत फुगला पाहिजे. फुगला नाहीतर आणखी कूट मिसळून पुन्हा घट्ट मळावे व वडे करावेत. वडयाच्या मिश्रणात मिरच्या, साखर, कोथिंबीर, नारळ घातल्यास किंवा मिश्रण अधिक पाणी घालून सैल केल्यास किंवा कूट कमी घातल्यास किंवा रिफाइन्ड तेलात न तळल्यास वडे मऊ होतात. मळताना मिश्रणात पाणी घालू नये. थंड पाण्यात हात घालून मळावे म्हणजे वडे सैल होणार नाहीत.
३)उपवासाची मिसळ

साहित्य – साबुदाण्याची खिचडी (वाटीभर साबुदाणा असेल तर ३/४ वाटी उकडलेल्या बटाटयाच्या फोडी या प्रमाणात करावे. शेवटी लिंबाचा रस मिसळावा) १ लहान वाटी नॉयलॉन साबुदाणा तळून घेणे, काकडी किंवा कोशिंबीर, खारे दाणे १ लहान वाटी, साखर, कोथिंबीर, १ मोठी वाटी दही.

कृती – हे सर्व पदार्थ तयार करून ठेवावे. प्रत्येकाच्या बशीत खिचडी घालून ती बशीत पसरावी. त्यावर २-४ चमचे खारे दाणे, त्यावर तितकाच तळलेला साबुदाणा, त्यावर तितकाच बटाटयाचा कीस, त्यावर डावभर दही, त्यावर ३-४ चमचे काकडी चव, कोथिंबीर हे सर्व पदार्थ पेरावेत. चवीपुरती साखर पेरावी. खाणार्‍याने आपल्या आवडीप्रमाणे हे सर्व मिसळून घ्यावेत. वरील पदार्थांचे प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे कमी-जास्त करावे.

४)साबुदाण्याची लापशी

साहित्य – १ टेबल चमचा साबुदाणा, १ कप दूध, २ चमचे साखर.

कृती – साबुदाणा थोडावेळ धुऊन ठेवावा, नंतर १/२ कप पाण्यात साबुदाणा शिजवून घ्यावा. वाटल्यास थोडेसे आणखी पाणी घालावे. नंतर त्यात दूध व साखर घालून थोडा वेळ शिजवावे. मग खालती उतरवून गार किंवा गरम आवडी प्रमाणे द्यावी. आयत्यावेळी त्यात चिमूटभर मीठ घातल्यास ही लापशी चांगली लागते.

5) बटाटयाचा कीस

साहित्य – बटाटे, दाण्याचे कूट, मीठ, मिरच्या, तूप जिरे.

कृती – बटाटे स्वच्छ धुवून, साले काढून किसून घ्यावेत, नंतर किसही पाणी घालून स्वच्छ धुवावा व पिळून ठेवावा. जिरे घालून तूपाची फोडणी करावी. त्यावर मिरच्यांचे तुकडे व बटाटयाचा किस घालून परतावे, नंतर त्यात दाण्याचे कूट व मीठ घालून चांगले ढवळून झाकण ठेवावे. मधून मधून कीस हलवावा. शिजला की उतरवावा. गरमच खायला द्यावा. असाच रताळयाचा कीस करावा.

6) पंचांमृत 
साहित्य – १-२ चमचे दाण्याचे कूट, मिरच्या, जिरे, मीठ, साखर किंवा गूळ, तूप, चिंच.

कृती – तूप जिरे यांची फोडणी त्यावर मिरचीचे तुकडे टाकावेत व एक कपभर पाणी फोडणीस घालावे. पाणी उकळले की त्यात दाण्याचे कूट घालून ढवळावे. नंतर त्यात चिंच कोळून घालावी. मीठ व गूळ चवी पुरते घालावे. थोडे घट्ट झाले की खाली उतरवावे. हे पंचामृत ३-४ दिवस टिकते.
[29/06, 4:32 PM] +91 94230 36755: *उपवासाचा 7) ढोकळा

साहित्य- पाव किलो भगर, पाव वाटी साबुदाणा, दही किंवा ताक, आलं, मिरची, कोथिंबीर, जिरे, एक चमचा दाण्याचा कूट, कढीपत्ता, पाव चमचा सोडा, फोडणीसाठी तूप

कृती- प्रथम भगर आणि साबुदाणे थोडेसे गरम करुन घ्यावेत. नंतर मिक्सरच्या भांड्यात त्याचं सुकंच सरबरीत पीठ करून घ्यावं. हे तयार पीठ ताकात घालून ढवळून घ्यावं. नंतर ते पंधरा ते वीस मिनिटं तसंच झाकून ठेवावं. तयार मिश्रणात मीठ, आलं-मिरचीची पेस्ट, दाण्याचा कूट घालावा. नंतर सोडा टाकून मिश्रण एकजीव करुन घ्यावं. नंतर ते कुकरच्या भांड्यात घालून छान वाफवून घ्यावं. थंड झाल्यावर त्याच्या चौकोनी वड्या कापाव्यात. दुसरीकडे कढईत तूप गरम करावं. त्यात जिरे, कढीपत्ता आणि उभे कापलेले मिरच्यांचे तुकडे घालून कडक फोडणी तयार करावी. ही तयार फोडणी वड्यांवर पसरुन ओतावी. वरतून कोथिंबीर आणि ओलं खोबरं पसरवावं. हा उपवासाचा ढोकळा ओल्या खोबऱ्याची चटणी किंवा दाण्याची चटणी किंवा फोडणीच्या दह्यासोबत सर्व्ह करावं.
[29/06, 4:32 PM] +91 94230 36755: *रत्याळाची 8) पोळी
साहित्य – रताळी, कणीक, गुळ वेलदोडे, थोडे मीठ, दोन – तीन चमचे तेल, तांदळाची पिठी.

कृती – रताळी शिजवून, सोलून वाटून घ्यावी. एक वाटी रत्याळाचा गोळा घेतल्यास एक वाटी गुळ घ्यावा. दोन्ही एकत्र करून चांगले शिजवून घ्यावे. चवीला वेलदोड्यांची पूड घालावी. एक वाटी कणीक घेऊन सैलसर भिजवून घ्यावी. कणकेचा छोटा उंडा घेऊन, लाटून, वाटीचा आकार करुन रताळ्याचे सारण त्यात भरावे व पोळी लाटावी.गरम असतांनाच साजूक तूप लावून ठेवावी.
 10) बटाटे

साहित्य – एक किलो बटाटे (कमी पाण्यात उकडावेत. सालं काढून त्याचे मोठे चौकोनी तुकडे करावेत), एक ते दीड कप साधारणं आंबट दही, अर्धा कप भाजलेले तीळ, एक टीस्पून तेल आणि चवीनुसार मीठ.

कृती – भाजलेले तीळ आणि मिरच्यांचं वाटण करून घ्यावं. या वाटणात दही घालावं. हे मिश्रण एकजीव करून बाजूला ठेवावं. मध्यम आचेवर एक नॉन-स्टिक पॅन मध्ये अर्धा चमचा तेल घालाव. त्यात हे वाटण घालावं. थोडावेळ परतल्यावर त्यात मीठ घालावं. आता त्यात बटाटे घालावेत. बटाट्यांना वाटण नीट लागेपर्यंत परतावं. पाणी निघून जाईपर्यंत परतावं.

Comments

Popular posts from this blog

Syllabus B.SC.I.(2024-2025)

Syllabus BCA II (2025-26)